AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kartik Aaryan | कार्तिक आर्यनच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! आगामी ‘सत्यनारायण की कथा’मध्ये झळकणार

बॉलिवूडचा बिनधास्त अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) सध्या खूप चर्चेत आहे. आता त्याच्या चाहत्यांसाठी एक चांगली बातमी समोर आली आहे. अभिनेत्याच्या नव्या चित्रपटाची घोषणा झाली आहे. कार्तिकने स्वत: ही माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना दिली आहे.

Kartik Aaryan | कार्तिक आर्यनच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! आगामी ‘सत्यनारायण की कथा’मध्ये झळकणार
कार्तिक आर्यन
| Edited By: | Updated on: Jun 23, 2021 | 1:33 PM
Share

मुंबई : बॉलिवूडचा बिनधास्त अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) सध्या खूप चर्चेत आहे. आता त्याच्या चाहत्यांसाठी एक चांगली बातमी समोर आली आहे. अभिनेत्याच्या नव्या चित्रपटाची घोषणा झाली आहे. कार्तिकने स्वत: ही माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना दिली आहे. कार्तिकच्या नव्या चित्रपटाचे नाव ‘सत्यनारायण की कथा’ (Satyanarayan Ki Katha) असे असणार आहे. साजिद नाडियाडवाला हा चित्रपट बनवणार आहेत (Kartik Aaryan announces new movie Satyanarayan Ki Katha).

अभिनेता कार्तिक आर्यनने बुधवारी सर्वांसमोर आपल्या ‘सत्यनारायण की कथा’ या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. कार्तिकच्या या नवीन चित्रपटात प्रेम कहाणी दाखवली जाणार आहे. तो या चित्रपट मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहे. चित्रपटाचा प्रोमो शेअर करत या अभिनेत्याने इंस्टाग्रामवर लिहिले की, ‘माझ्या हृदयाजवळील एक कथा #सत्यनारायण की कथा खास लोकांसह एक खास चित्रपट.’

कार्तिकला मिळाली साजिदची साथ

निर्माता करण जोहर याच्या ‘दोस्ताना 2’ या चित्रपटातून बाहेर पडल्यानंतर कार्तिक आर्यननेही ही मोठी घोषणा आहे. साजिद नाडियाडवाला यांनी ‘नमः पिक्चर्स’च्या संयुक्त विद्यमाने ‘सत्यनारायण की कथा’ या त्यांच्या आगामी संगीत प्रेमकथेचा प्रोमो सादर केला आहे.

सत्यनारायण की कथा या चित्रपटात अभिनेता कार्तिक आर्यन मुख्य अभिनेत्याच्या भूमिकेत दिसणार आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक समीर विध्वांस कार्तिकच्या या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. चित्रपटाच्या या खास प्रोमोत फुले विखुरलेली दिसतात, ज्यामुळे हे स्पष्ट होते की चित्रपट खूप खास असणार आहे.

पाहा पोस्ट :

सत्यनारायण की कथा ही एक महाकाव्य प्रेमकथा आहे. ‘प्यार का पंचनामा फ्रेंचायझी’, ‘सोनू के टीटू की स्वीटी’ आणि ‘पति, पत्नी और वो’सारखे चित्रपट केलेला अभिनेता कार्तिक चाहत्यांसमोर हा चित्रपट सादर करणार आहे. कार्तिकच्या कारकिर्दीतील हा सर्वात वेगळा चित्रपट असणार आहे. या चित्रपटात कोणती अभिनेत्री मुख्य भूमिकेत दिसणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

‘दोस्ताना’तून बाहेर

काही दिवसांपूर्वी कार्तिकला अचानक ‘दोस्ताना 2’ मधून बाहेर करण्यात आले होते. त्यानंतर अशी बातमी समोर आली की, सततच्या नखरेल वागण्यामुळे कार्तिकला बाहेर काढण्यात आले होते. कार्तिक याने अद्याप याबद्दल काहीही सांगितले नाही. कार्तिकचे याच मौनाचे कारण आहे की, त्याला आपल्या कामातून चाहत्यांना उत्तर द्यायचे आहे. कार्तिकचा ‘धमाका’ हा चित्रपट चाहत्यांसाठी प्रदर्शित होण्यास तयार आहे. अशा परिस्थितीत आता दुसर्‍या नव्या चित्रपटाची घोषणा ऐकून अभिनेत्याचे चाहते खूप आनंदित झाले आहेत.

(Kartik Aaryan announces new movie Satyanarayan Ki Katha)

हेही वाचा :

सुशांत सिंह राजपूतच्या वडिलांनी पुन्हा ठोठावले दिल्ली उच्च न्यायालयाचे दरवाजे, ‘न्याय’ चित्रपटाविरोधात केले अपील

मोठ्या पडद्यापासून आणखी काही काळाचा ब्रेक, लेक ‘वामिका’साठी अनुष्का शर्माने घेतले मोठे निर्णय!

29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.