AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sensex Today : पहिल्यांदाच रेकॉर्ड ब्रेक 52000 पार पोहोचला सेन्सेक्स, बँकिंगमध्ये जबरदस्त वाढले शेअर्स

30 शेअर्सचे निर्देशांक सेन्सेक्स 363 अंकांच्या वाढीसह थेट 51907 वर उघडला आहे. खरंतर, आत पहिल्यांदाच सेन्सेक्सने 52000 चा आकडा ओलांडला आहे.

Sensex Today : पहिल्यांदाच रेकॉर्ड ब्रेक 52000 पार पोहोचला सेन्सेक्स, बँकिंगमध्ये जबरदस्त वाढले शेअर्स
Stock Market
| Edited By: | Updated on: Feb 15, 2021 | 10:55 AM
Share

मुंबई : आठवड्याच्या पहिल्या दिवशी शेअर बाजाराने जोरदार उसळी मारली आहे. 30 शेअर्सचे निर्देशांक सेन्सेक्स 363 अंकांच्या वाढीसह थेट 51907 वर उघडला आहे. खरंतर, आत पहिल्यांदाच सेन्सेक्सने 52000 चा आकडा ओलांडला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये शेअर बाजारा अनेक रेकॉर्ड पाहायला मिळत आहेत. आजही सकाळी 9.28 वाजता तो 485 अंकांच्या वाढीसह 52,029 वर व्यापार करत होता. इतकंच नाहीतर निफ्टीही 50 आज सकाळी 107 अंकांच्या वाढीसह 15270 वर उघडला. यावेळी 138 अंकांच्या वाढीसह 15301 च्या पातळीवर बाजार सुरु होता. (business news share market today sensex for the first time crossed 52000 level here is all details)

सध्या सेन्सेक्सचे 30 पैकी 21 शेअर्स हे ग्रीन मार्कमध्ये ट्रेड करत आहेत. यामुळे गुंतवणूकदारांनाही याचा चांगलाच नफा झाल्याचं पाहायला मिळतं. बँकिंग शेअर्समध्येही मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या इंडसइंड बँक, एचडीएफसी बँक, अ‍ॅक्सिस बँक आणि कोटक महिंद्रा बँक सगळ्यात टॉपवर आहेत. दुसरीकडे, ओएनजीसी, टेक महिंद्रा, एनटीपीसी आणि सन फार्मा या कंपन्यांचा घसरल्याचं पाहायला मिळत आहे.

विदेशी गुंतवणूकदारांची मेहराबानी, एफपीआयने फेब्रुवारीमध्ये गुंतवले 22 हजार कोटी रुपये

विदेशी गुंतवणूकदार वारंवार शेअर बाजारात गुंतवणूक करत असतात. विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी (एफपीआय) फेब्रुवारीमध्ये भारतीय बाजारात 22,038 कोटी रुपयांची भांडवली गुंतवणूक केली आहे. डिपॉझिटरीच्या आकडेवारीनुसार बोलायचं झालं तर, या काळात परदेशी गुंतवणूकदारांनी शेअर्समध्ये 20,593 कोटी रुपये आणि कर्जामध्ये 1,445 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. 1 फेब्रुवारी ते 12 फेब्रुवारी या कालावधीत निव्वळ गुंतवणूक 22,038 कोटी रुपये होती.

कोरोना काळातील सुधारणांचा फायदा

एस्कॉर्ट सिक्युरिटीचे रिसर्च हेड आसिफ इकबाल यांनी TV9 हिंदीला दिलेल्या माहितीनुसार जागतिक बाजारातील तेजी हे भारतीय सेन्सेक्समध्ये तेजी असण्याचं कारण आहे. कोरोना संसर्गाच्या काळात केंद्र सरकारनं देशाची अर्थव्यवस्था पूर्वपदावर आणण्यासाठी केलेल्या उपाययोजनांचा परिणाम दिसत आहे. जागतिक रेटिगंक संस्थांनी केंद्र सरकारनं उचलेल्या पावलांचं कौतुक केल आहे. या सर्व कारणांमुळे भारतीय शेअर बाजारावरील परकीय गुंतवणूक दारांचा विश्वास वाढल्याचं आसिफ इकबाल यांनी सांगितलं.

दरम्यान, वीएम पोर्टफोलिओचे रिसर्च हेड विवेक मित्तल यांनी परकीय गुंतवणूकदारांनी भारतात 1 जानेवरी ते 20 जानेवारीही दरम्यान 20,098 कोटी रुपयांची गुतंवणूक केल्याचं सांगितलं होतं. नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये शेअर बाजारात विक्रमी गुंतवणूक झाल्याचं मित्तल यांनी सांगतिलं. डिसेंबरमध्ये 48 हजार 223.94 कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक झाली. तर, नोव्हेंबरमध्ये 65 हजार 317.13 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली.

गुंतवणूकदारांनी काय करावं

भारतासह जगातील शेअर बाजारामध्ये तेजी पाहायला मिळेल. शेअर बाजारांचे इंडेक्स वधारणार नसले तरी मिड कॅप आणि स्मॉलकॅफ शेअर्समध्ये तेजी असेल, असा अंदाज ब्रोकरेज फर्म वर्तवत आहेत.येत्या काळात एलं अँड टी, अल्ट्राटेक सिमेंट, गोदरेज प्रॉपर्टीजमध्ये गुंतवणूक वाढू शकते. पुढील एक वर्षात निफ्टी 15 हजार ते 16 हजारादरम्यान राहील, असा अदाज वर्तवण्यात आला आहे. (business news share market today sensex for the first time crossed 52000 level here is all details)

संबंधित बातम्या – 

स्टेट बँकेचा कोट्यवधी ग्राहकांना दिलासा, नव्या योजनेअंतर्गत घरबसल्या रोख रक्कमेसह ‘या’ सुविधा मिळणार

SBI कडून अलर्ट! नोकरीच्या शोधात एक चूक पडेल महागात, फसवणुकीपासून ‘असे’ राहा सावध

तुम्ही या बँकेचे ग्राहक असाल तर लक्ष द्या, 1 मार्चपासून बँकेत होणार आहे मोठा बदल

(business news share market today sensex for the first time crossed 52000 level here is all details)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.