Pune Corona | बिबवेवाडी ते दीनानाथ रुग्णालय जाण्यासाठी 8 हजार रुपये, रुग्णवाहिकेवर गुन्हा दाखल

संजिवनी ॲम्ब्युलन्स सर्विसेसने केवळ सात किलोमीटरसाठी 8 हजार रुपये घेतले होते.

Pune Corona | बिबवेवाडी ते दीनानाथ रुग्णालय जाण्यासाठी 8 हजार रुपये, रुग्णवाहिकेवर गुन्हा दाखल

पुणे : पुण्यात कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर रुग्णांची (Case Filed Against Ambulance ) आर्थिक लूट करणाऱ्या अ‍ॅम्ब्युलन्सवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्यादा दर आकरल्याने रुग्णवाहिकेवर गुन्हा दाखल होण्याची ही पहिलीच घटना आहे. बिबवेवाडी पासून दीनानाथ रुग्णालयात जाण्यासाठी तब्बल 8 हजार रुपये घेतले होते. संजिवनी ॲम्ब्युलन्स सर्विसेसने केवळ सात किलोमीटरसाठी 8 हजार रुपये घेतले होते. याप्रकरणी संबंधित रुग्णाने जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार, गुन्हा दाखल करण्यात आला (Case Filed Against Ambulance ).

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

त्याचबरोबर संजिवनी ॲम्ब्युलन्स सर्विस मोबाईल क्लिनिक व्हॅनचा परवाना आहे. मात्र, या परवान्याचा गैरवापर करुन व्हॅनचा ॲम्ब्युलन्ससाठी वापर केला जात होता. संजिवनी ॲम्ब्युलन्स सर्विसेसवर बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. या प्रकरणी मोटार वाहन निरीक्षकांनी फिर्याद दिली.

रुग्णवाहिकेसाठी आरटीओकडून दर जाहीर करण्यात आले आहेत. ज्यादा दर घेतल्यास कारवाईचा इशारा देण्यात आला होता. ॲम्ब्युलन्स व्हण स्वरुपात असल्यास 25 किलोमीटर किंवा प्रति दोन तासासाठी 500 रुपये, तर 25 किलोमीटरच्या पुढे गेल्यावर मूळ भाड्यात प्रति किलोमीटर 11 रुपये दर निश्चित करण्यात आला आहे. त्याचबरोबर दर तासाला 100 रुपये वेटिंग दर निश्चित केला आहे (Case Filed Against Ambulance).

व्हॅनपेक्षा मोठ्या रुग्णवाहिकेसाठी 600 रुपये आणि 25 किलोमीटर पुढील अंतरासाठी प्रति किलोमीटरला 12 रुपये दर द्यावे लागतील. या रुग्णवाहिकांना तासाला सव्वाशे रुपये वेटिंगदर आहे. तर मिनीबस सारख्या रुग्णवाहिकांसाठी 900 रुपये आणि 25 किलोमीटर पुढील अंतरासाठी प्रति किलोमीटर 13 रुपये आणि तासाला 150 रुपये वेटिंगवर ठरवण्यात आला आहे. रुग्णवाहिकांचे दर पत्रक ॲम्ब्युलन्स तसेच मान्यताप्राप्त रुग्णालयाच्या दर्शनी भागात लावण्याचे आदेश आहेत.

Case Filed Against Ambulance

संबंधित बातम्या :

पुण्यातील मेट्रोचं काम रखडलं, कामगार आणण्यासाठी 4 बस रवाना

Pune Police | पुणेकरांकडून नियमांची पायमल्ली, पोलिसांकडून 4 दिवसात 2,432 कारवाया

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI