पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन, भारताचा 1 जवान शहीद

जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यातील नौशेरा इथल्या एलओसी आणि पूँछच्या दिग्वार सेक्टरमध्ये सोमवारी पाकिस्तानने शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं. पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारात भारतीय लष्कराचा एक जवान शहीद झाला आहे.

पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन, भारताचा 1 जवान शहीद

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यातील नौशेरा इथल्या एलओसी आणि पूँछच्या दिग्वार सेक्टरमध्ये सोमवारी पाकिस्तानने शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं. पाकिस्तानी सैन्याने गोळीबार करत मोर्टारचा मारा केला. पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारात भारतीय लष्कराचा एक जवान शहीद झाला आहे. (ceasefire Violation By Pakistan In Nowshera)

सायंकाळी साडे सहाच्या सुमारास पाकिस्तान सैन्याने गोळीबार केला तसंच मोर्टारचा मारा केला. काहीही कारण नसताना पाकिस्ताने सैन्याने शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं ज्याला भारतीय सैन्याने चोख प्रत्युत्तर दिलं.

तत्पूर्वी, 1 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानी सैन्याने केलेल्या गोळीबारात हवालदार कुलदीप सिंग आणि रायफलमन शुभम शर्मा आणि लान्सनायक करनैल सिंग शहीद झाले होते. पाकिस्तान पाठीमागच्या काही आठवड्यांपासून शस्त्रसंधीचं उल्लंघन करत आहे.

नोव्हेंबर महिन्यात एलओसीजवळच्या बऱ्याचश्या भागात बर्फ पडण्यास सुरुवात होते. बर्फ जमा झाल्यामुळे घुसखोरांचे रास्ते बंद होतात. त्यामुळे बर्फवर्षाव होण्यापूर्वी पाकिस्तानी सैन्य, आयएसआय आणि दहशतवादी घुसखोरी करण्याचा प्रयत्न करतात. याच कारणामुळे पाकिस्तान वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन करते.

अलीकडेच लांबा सेक्टरमध्ये काही दहतवाद्यांनी घुसखोरीचा प्रयत्न केला होता परंतु बीएसएफ जवानांनी त्यांचा प्रयत्न हाणून पाडला. (ceasefire Violation By Pakistan In Nowshera)

संबंधित बातम्या

Breaking | काश्मीरच्या पंपोरमध्ये आतंकवादी हल्ला, CPRF चे दोन जवान शहीद

जम्मू-काश्मीरमधल्या पंपोरमध्ये दहशतवादी हल्ला, दोन CRPF जवान शहीद, तिघे जखमी

जम्मू काश्मीरच्या अनंतनागमध्ये दहशतवादी हल्ला, सीआरपीएफचा एक जवान शहीद

Published On - 11:49 pm, Mon, 5 October 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI