चाकणमध्ये 800 पेक्षा जास्त कंपन्या सज्ज, नियम-अटी पाळून काम सुरु करणार

कोरोनाच्या संकंटात अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी (Chakan MIDC) केंद्र सरकारने देशातील उद्योगधंद्यांना परवानगी दिली आहे.

चाकणमध्ये 800 पेक्षा जास्त कंपन्या सज्ज, नियम-अटी पाळून काम सुरु करणार
Follow us
| Updated on: May 05, 2020 | 9:23 PM

पुणे : कोरोनाच्या संकंटात अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी (Chakan MIDC) केंद्र सरकारने देशातील उद्योगधंद्यांना परवानगी दिली आहे. मात्र, उद्योगधंदे सुरु करण्यासाठी सरकारने काही नियम आणि अटी लागू केल्या आहेत. केंद्र सरकारचे सर्व नियम आणि अटी पाळून चाकण औद्योगिक वसाहतीमध्ये 800 पेक्षा जास्त लहान-मोठ्या कंपन्या सुरु होणार आहेत. या कंपन्यांमध्ये आज (5 मे) साफसफाईचे काम सुरु करण्यात आलं आहे (Chakan MIDC).

“कंपनी व्यवस्थापनाकडून कामगारांच्या आरोग्याविषयी सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत. कंपनीतील कर्मचाऱ्यांमध्ये कोणत्याही प्रकारे कोरोनाचा संसर्ग होणार नाही, याची काळजी घेतली जात आहे”, अशी माहिती चाकण औद्योगिक वसाहतमधील एका कंपनी व्यवस्थापकाने ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना दिली.

केंद्र सरकारने देशातील सर्व कंपन्यांना एकूण कर्मचाऱ्यांपैकी फक्त 30 टक्के कर्मचाऱ्यांना कामावर ठेवून समूह संसर्ग होणार नाही, याची काळजी घेण्याची सूचना केली आहे. “कंपन्यांनी केंद्र सरकारच्या नियमांचे काटेकोर पालन करावे. नियमांचे उल्लंघन झाल्यास कडक कारवाई करण्यात येईल”, असादेखील इशारा सरकारकडून देण्यात आला आहे.

दरम्यान, केंद्र सरकारने देशातील सर्व कंपन्यांना काही सूचना दिल्या आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या सचिव पुण्य सलिला श्रीवास्तव यांनी आजच्या पत्रकार परिषदेत या सूचनांविषयी माहिती दिली.

केंद्र सरकारकडून कंपन्यांना देण्यात आलेल्या सूचना:

  •  कंपनीत हँडवॉश, सॅनिटायझर आणि स्वच्छता असावी.
  • काम करताना कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर मास्क असावं.
  • ऑफिसमध्ये सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन केलं जावं. कर्मचाऱ्यांमध्ये विशिष्ट अंतर असावं.
  • सर्व कर्मचाऱ्यांना एकदाच जेवणाती सुट्टी न देता टप्प्याटप्प्याने देण्यात यावी.
  • सर्व कर्मचाऱ्यांचं नावं आरोग्य सेतू अॅपवर नोंद केलेली असावीत.
  • कंपन्यांनी कोरोनावर उपचार करणाऱ्या रुग्णालयांची यादी ठेवावी.

संबंधित बातम्या :

Pune Corona : पुण्यात 24 तासात 99 नवे रुग्ण, 8 ते 10 दिवसात रुग्णांची संख्या वाढण्याची भीती

EXCLUSIVE : आरामात चौथा उमेदवार निवडून आणणार : देवेंद्र फडणवीस

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.