चाळीसगाव गोळीबार प्रकरणात खळबळजनक खुलासा, तुरुंगातील कैद्याकडूनच हत्येची सुपारी

चाळीसगाव गोळाबार प्रकरणात अटकेत असलेल्या आरोपीने खळबळजनक माहिती पोलिसांना दिली आहे.

चाळीसगाव गोळीबार प्रकरणात खळबळजनक खुलासा, तुरुंगातील कैद्याकडूनच हत्येची सुपारी

चाळीसगाव : चाळीसगाव गोळाबार प्रकरणात अटकेत असलेल्या आरोपीने खळबळजनक (Chalisgaon Firing Case) माहिती पोलिसांना दिली आहे. दंगल आणि जीवे ठार मारण्याचा कलमांतर्गत अटकेत असलेल्या आरोपीने सुपारी देवून शेख जुबेरची हत्या घडवून आणण्याचा प्रयत्न केला असल्याचं उघड झालं आहे, तशी माहिती तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सैय्यद यांनी दिली (Chalisgaon Firing Case).

जळगाव जिल्हा कारागृहात असलेला आरोपी हैदर अली आसिफ आली याचे आणि शेख जुबेर यांच्यात वाद झाला होता. याचं वादामुळे हैदर सध्या तुरुंगात आहे. त्याची आणि पोलिसांनी अटक केलेला आरोपी अरबाज दाऊद पिंजारी याची जळगाव सब जेलमध्ये भेट झाली आणि हैदरने त्याला सुपारी देऊन हुडको कॉलनीतील शेख जुबेरचा काटा काढण्यास सागितलं होतं.

जुबेर कुठे सापडेल, त्याचा काटा काढण्यासाठी लागणार हत्यार, असं सर्व साहित्य हैदरच्या माणसाने पुरेलली असल्याची कबुली जवाब अरबाज पिंजारीने पोलिसांना दिला आहे. गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल, गुन्ह्यात वापरलेलं हत्यार आणि त्याला सहकार्य करणारे हैदरचे इतर साथीदार आता पोलिसांच्या रडारवर आहेत.

पोलिसांनी ताब्यात घेतलेला आरोपी हा सुपारी किलर असल्याचे निष्पन्न झाले आहे. हैदर अली असिफ अली हा जळगाव सब जेलमध्ये भांदवी कलम 326 च्या गुन्ह्यात अटकेत आहेत. तेथे आरोपी हैदर अली आसिफ अली यांची भेट झाली आणि शेख जुबेर शेख गनी याला ठार मारण्याचा कट रचला गेला. आता या कटात कोण कोण सहभागी होते. त्यासाठी मोटर सायकल आणि गावठी पिस्तुल कोठून आणलं, मोटरसायकलवर आरोपीसोबत कोण होत?, असे अनेक प्रश्न निवृत्तरीत आहेत (Chalisgaon Firing Case).

अरबाजने गोळीबार केला. मात्र सुदैवाने गोळ्या त्याच्या पायाला लागल्या. आरोपींचा नेम चुकल्याने सुदैवाने जूबेर शेख याचे प्राण वाचले. आता आरोपीला अटक झाल्यावर त्याची ओळख परेड होणार असून इतर आरोपींचा देखील शोध पोलीस घेत आहेत.

मुख्य आरोपी हैदर अलीवर अनेक गुन्हे दाखल आहेत. काही दिवस हा तडीपार देखील होता. गांजातस्करी प्रकरणात देखील त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत.

Chalisgaon Firing Case

संबंधित बातम्या :

टिटवाळ्यात 22 वर्षीय विवाहितेवर घरात घुसून बलात्कार, नराधमांना तासाभरात अटक

लातुरात एक कोटीच्या विम्यासाठी मजुराची हत्या, आठ वर्षांनंतर पत्नीला अटक

 

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI