AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बाळासाहेबांना हिंदुहृदयसम्राट म्हणणं बंद केलं, उद्धव ठाकरेंना हिंदुत्व शिकवण्याचीच गरज : चंद्रकांत पाटील

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून टीका केली आहे.

बाळासाहेबांना हिंदुहृदयसम्राट म्हणणं बंद केलं, उद्धव ठाकरेंना हिंदुत्व शिकवण्याचीच गरज : चंद्रकांत पाटील
| Updated on: Oct 13, 2020 | 1:48 PM
Share

मुंबई: तुम्ही राज्यात सर्व काही सुरू केलं. दारूची दुकानंही सुरू केलीत. पण मंदिरं सुरू केली नाहीत. अशावेळी तुम्हालाच हिंदुत्व शिकवण्याची गरज नाही तर कुणाला आहे, अशा शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर पलटवार केला. (chandrakant patil slams cm uddhav thackeray over hindutva)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना एक पत्र लिहून मला हिंदुत्व शिकवण्याची गरज नसल्याचं सुनावलं आहे. मुख्यमंत्र्यांनी अत्यंत खरमरीत भाषेत हे पत्रं लिहिल्याने भाजपच्या गोटात खळबळ उडाली असून त्यावर आता प्रतिक्रिया उमटत आहेत. चंद्रकांत पाटील यांनीही मुख्यमंत्र्यांच्या या पत्रावर टीका केली आहे. मंदिरं न उघडणं हा मुख्यमंत्र्यांचा हेकेखोरपणा आहे. सर्वकाही सुरू करण्यात आले पण मंदिरं सुरू करण्यात आली नाहीत. माणसाला जशी भुकेची गरज असते, तशीच मन:शांतीचीही गरज असते. भारतातील लोक पूजा-अर्चा करतात म्हणून देशातील आत्महत्यांचं प्रमाण कमी झालं आहे, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.

तुम्हालाच हिंदुत्व शिकवावं लागेल. तुम्ही सत्तेच्या गादीवर बसला आहात. स्वातंत्र्यावीर सावरकरांवर काँग्रेसने टीका केली तेव्हा तुम्ही गप्प बसलात. त्यामुळे हिंदुत्व शिकवण्याची गरज आहे, असंही ते म्हणाले.

मंदिरात कोरोना दबा धरून बसलाय का?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं काय म्हणणं आहे? त्यांना नेमकं काय करायचं आहे? कोरोना हा मंदिरात दबा भरून बसला आहे का? मंदिरात गेलेल्या माणसावर कोरोना हल्ला करतो का?, विमानातून, एसटी आणि रेल्वेतून प्रवास करणाऱ्यांना कोरोना होत नाही का?, असा सवाल पाटील यांनी केला. (chandrakant patil slams cm uddhav thackeray over hindutva)

शिवसेनाप्रमुखांच्या नावापुढचं हिदुहृदयसम्राटही काढलं

हिंदुत्व तुम्हालाच शिकवलं पाहिजे. तुमच्या घरापासूनच सुरुवात केली पाहिजे. सत्तेवर बसताच तुमच्या भाषणातून तुम्ही शिवसेनाप्रमख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावापुढचं हिंदुहृदयसम्राट काढलं. त्याऐवजी वंदनीय बाळासाहेब ठाकरे म्हणण्यास सुरुवात केली. हिंमत असेल तर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे असा भाषणाच्या सुरुवातीला उल्लेख करा, असं आव्हानही त्यांनी दिलं.

मंदिर आणि मदिरेची तुलना करणं चुकीचं: सरनाईक

अनलॉकच्या प्रक्रियेत राज्य सरकारने केवळ दारूची दुकाने सुरू केलेली नाहीत. त्याच्याबरोबर अनेक गोष्टी सुरू केल्या आहेत. त्यामुळे भाजपकडून मंदिर आणि मदिरेची केली जाणारी तुलनाच चुकीची आहे, अशी टीका शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी केली. भाजपने आधी आपल्या भावना आणि तुलना करण्याच्या पद्धती बदलाव्यात, असा टोलाही त्यांनी लगावला. आम्हाला हिंदुत्व शिकवण्याची गरज नाही. आमचं हिंदुत्व काय आहे, हे संपूर्ण जगाला माहीत आहे, असंही ते म्हणाले.

तर, आपल्याकडे जत्रांना लाखोंची गर्दी होते. लोक दाटीवाटीने एकत्र येतात. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता असते. त्यामुळेच मंदिरांच्याबाबतीत अस्ते कदम जाण्याचा मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला असेल तर ते योग्यच आहे, असं राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ म्हणाले. ठाकरे घराणं हे आस्तिकच आहे. त्यांच्या प्रत्येक कामाची सुरुवात ही लोणावळ्याच्या एकवीरा देवीची पूजा करूनच होते. हे संपूर्ण जगाला माहीत आहे. त्यामुळे इथे आस्तिक-नास्तिकतेचा प्रश्नच येत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

संबंधित बातम्या:

माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही, उद्धव ठाकरे राज्यपालांवर बरसले

LIVE: भाजप नेत्यांचा सिद्धिविनायक मंदिरात घुसण्याचा प्रयत्न; पोलिसांकडून कार्यकर्त्यांची धरपकड

‘राज्य सांभाळता येत नसल्याने उद्धव ठाकरेंचा तोल सुटतोय; राज्यपालांशी अहंकाराने बोलणे शोभते का?’

(chandrakant patil slams cm uddhav thackeray over hindutva)

Follow Us
पुण्यात भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार! दैवी शक्तीच्या नावाखाली...
Pune | पुण्यात भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार! दैवी शक्तीच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचं शोषण; आरोपी फरार
चाकण एमआयडीसीतून २० उद्योगांच्या स्थलांतरावर शरद पवारांचा सरकारला सवाल
चाकण एमआयडीसीतून २० उद्योगांच्या स्थलांतरावर शरद पवारांचा सरकारला सवाल, रोजगार टिकवण्यासाठी उपाययोजनांची मागणी
भाविकांची गर्दी वाढतेय, वाहतूक कोंडी कायम! दगडूशेठ गणपती मंदिराच्या...
Pune | भाविकांची गर्दी वाढतेय, वाहतूक कोंडी कायम! दगडूशेठ गणपती मंदिराच्या विस्तारावर हिंदू महासभेचे आनंद दवे आक्रमक
फडणवीसांचे उत्तर: चाकण MIDC मधील ७६% बंद कंपन्या ‘डिफंक्ट’ होत्या
चाकण एमआयडीसीतील कंपन्या बंद: फडणवीसांनी पवारांना दिले उत्तर
MNS शहराध्यक्षांच्या गाडीची तोडफोड: मनसेचा भाजपवर आरोप
अंबरनाथमधील भाजप-मनसे राड्यावरुन मनसे नेते आक्रमक, गाडी तोडफोड करणाऱ्यांवर कारवाईची मागणी
चाकणच्या 20 कंपन्या स्थलांतराच्या तयारीत? 2 हजार रोजगारांचा प्रश्न
Sharad Pawar | चाकणच्या 20 कंपन्या स्थलांतराच्या तयारीत? 2 हजार रोजगारांचा प्रश्न; शरद पवार यांचा दावा
आमदार अपात्रता निर्णयावर राहुल नार्वेकरांचं मोठं वक्तव्य...
Rahul Narwekar | आमदार अपात्रता निर्णयावर राहुल नार्वेकरांचं मोठं वक्तव्य; सुप्रीम कोर्टात निर्णय....
फडणवीसांच्या निर्देशाने महा-आयडी; नागरिकांना मिळणार एकच डिजिटल ओळख
मुख्यमंत्री फडणवीसांच्या निर्देशाने महा-आयडी; नागरिकांना मिळणार एकच डिजिटल ओळख
पाकिस्तानचे PM शाहबाज शरीफ यांची पुन्हा भारताला धमकी
‘सिंधूचं पाणी आमची रेड लाईन’; पाकिस्तानचे PM शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
‘गावातील शाळांना सुविधा मिळेपर्यंत स्वातंत्र्याचं स्वप्न अपूर्ण'-दिपके
‘गावातील शाळांना सुविधा मिळेपर्यंत स्वातंत्र्याचं स्वप्न अपूर्ण'- अभिजीत दिपके