चंद्रपुरात पहिला ‘कोरोना’बाधित रुग्ण, 50 वर्षीय सुरक्षारक्षकाला संसर्ग

चंद्रपूर शहरात बंगाली कँप परिसरात राहणाऱ्या 50 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचं काल रात्री समोर आलं (Chandrapur First Corona Positive Patient)

चंद्रपुरात पहिला 'कोरोना'बाधित रुग्ण, 50 वर्षीय सुरक्षारक्षकाला संसर्ग

चंद्रपूर : चंद्रपुरात पहिला ‘कोरोना’ बाधित रुग्ण आढळल्याने प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत. 50 वर्षीय सुरक्षारक्षकाचा ‘कोरोना’ रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर चंद्रपूर शहरातील कृष्णनगर भाग सील करण्यात आला. (Chandrapur First Corona Positive Patient)

चंद्रपूर शहरात बंगाली कँप परिसरात राहणाऱ्या 50 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचं काल रात्री समोर आलं. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने तो राहत असलेला कृष्णनगर हा भाग सील करण्याचे ठरवले. त्यानुसार या भागातील सर्व वाहतूक रोखली गेली आहे.

संबंधित रुग्ण सिक्युरिटी गार्ड असल्याची माहिती समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी तो न्यूमोनियाने आजारी होता. 1 मे रोजी त्याचे स्त्राव नमुने घेण्यात आले होते. या रुग्णाची ट्रॅव्हल हिस्ट्री तपासली जात असून त्याच्या संपर्कात किती जण आले, याचाही माग काढला जात आहे.

हेही वाचा : भारतातही वाघाची कोरोना चाचणी; वाघिणीपासून दुरावलेल्या बछड्याची महाराष्ट्रात टेस्ट 

कृष्णनगर भागातील नागरिक आता 14 दिवस या भागातून बाहेर पडू शकणार नाहीत. अत्यावश्यक वैद्यकीय गरज असेल, तेव्हाच परवानगीने त्यांना बाहेर जाता येईल. या भागातील जीवनावश्यक गोष्टींची पूर्तता प्रशासन करणार आहे. (Chandrapur First Corona Positive Patient)

तीन राज्यांच्या सीमेवर असलेल्या चंद्रपुरात एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळलेला नव्हता. चंद्रपूरचे जिल्हाधिकारी कुणाल खेमणार आणि जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी या लढाईत आतापर्यंत बाजी मारली होती.

(Chandrapur First Corona Positive Patient)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI