मुलगी सुशिक्षित असो की अशिक्षित, तुम्ही बलात्कारच करणार का? योगींवर भुजबळ कडाडले

आरोपींच्या बाजूने भाजपचे लोक एकत्र आले आहेत. मुलींना संस्कारित करा, असे भाजपचे आमदार म्हणतात.

मुलगी सुशिक्षित असो की अशिक्षित, तुम्ही बलात्कारच करणार का? योगींवर भुजबळ कडाडले
Rohit Dhamnaskar

|

Oct 06, 2020 | 5:24 PM

मुंबई: हाथरस बलात्कार प्रकरणावरून राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी भाजपवर कडाडून टीका केली आहे. हाथरस प्रकरणानंतर मोदी सरकार शांत बसले आहे. एकीकडे कंगना रानौतला वाय प्लस सुरक्षा दिली जाते. दुसरीकडे ज्या मुलीवर अत्याचार झाले तिच्या कुटुंबीयांना सुरक्षा तर सोडाच उलट त्यांची नार्को टेस्ट करण्याचा विचार सुरु आहे. हे नक्की कोणत्या डोक्याने चालतात, हे मला समजत नसल्याचे छगन भुजबळांनी म्हटले.  (Chhagan Bhujbal slams Yogi Adityanath )

ते मंगळवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. हाथरस बलात्कार प्रकरणातील गुन्हेगारांना फासावर लटकवले पाहिजे. उत्तर प्रदेश पोलीस आणि योगी सरकारने हे प्रकरण संवेदनशीलतेने हाताळण्याची गरज होती. मात्र, आता पीडितेच्या कुटुंबीयांची नार्को टेस्ट करण्याचा विचार सुरु आहे. पोलिसांनी पीडितेच्या आई-वडिलांना कोंडून ठेवले, असे भुजबळांनी सांगितले.

राहुल गांधी आणि प्रियांका गांधी पीडितेच्या कुटुंबीयांना भेटायला गेले तेव्हा त्यांनाही रोखण्यात आले. आरोपींच्या बाजूने भाजपचे लोक एकत्र आले आहेत. मुलींना संस्कारित करा, असे भाजपचे आमदार म्हणतात. मुलगी सुशिक्षित असो की अशिक्षित, तुम्ही बलात्कारच करणार का?, असा संतप्त सवाल त्यांनी भाजपला विचारला.

तसेच वाल्मिकी समाजाची मुलगी असू दे किंवा ठाकूर अथवा ब्राह्मण असू दे. ती आपल्या मुलीसारखी आहे. मागासवर्गीय समाजाचे रक्षण करण्याची जबाबदारी बहुसंख्य समाजावर असल्याचेही त्यांनी सांगितले.

‘सुशांत सिंह प्रकरणाचा वापर राज्य सरकार आणि मुंबई पोलिसांना बदनाम करण्यासाठी झाला’

अभिनेता सुशांत सिंह मृत्यूप्रकरणावरुन मुंबई पोलीस आणि शिवसेनाप्रणित सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. मुंबई पोलिसांनी दोन दिवसांत सुशांतने आत्महत्या केल्याचे सांगितले होते. मात्र, ही हत्या आहे की आत्महत्या हे समजण्यासाठी सीबीआयला दोन महिने लागले. सुशांत सिंह गेल्याचे कुणालाही दु:ख नव्हते. पण अनेकांना त्यावर राजकारण करायचे होते, अशी टीकाही यावेळी छगन भुजबळ यांनी केली.

संबंधित बातम्या:

…तर दंगली भडकल्या असत्या, हाथरस प्रकरणी यूपी सरकारचा सुप्रीम कोर्टात दावा

Sanjay Raut | नटीसाठी छाती बडवणाऱ्यांना हाथरसचं तिकीट काढून द्या, राऊतांचा टोला

योगी आदित्यनाथांना पदावर राहण्याचा अधिकार नाही, हाथरस पीडितेच्या कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी संघर्ष- बाळासाहेब थोरात

(Chhagan Bhujbal slams Yogi Adityanath )

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें