Ladkah | भारतीय हद्दीत चीनच्या सैनिकाला पकडले, चौकशी सुरू

भारतीय हद्दीत आलेल्या चीनच्या पब्लिक लिबरेशन आर्मीच्या (PLA) एका जवानाला पकडण्यात आले आहे.  पीएलएच्या सैनिकाला देमचोकमध्ये भारतीय सैन्यानं ताब्यात घेतले आहे. (China PLA soldier captured near demchok area of ladakh by Indian Army)

Ladkah | भारतीय हद्दीत चीनच्या सैनिकाला पकडले, चौकशी सुरू

लडाख : गलवान खोऱ्यात भारत आणि चीन सैन्यादरम्यान झालेल्या झटापटीनंतर सीमेवरिल वातावरण तणावग्रस्त आहे. भारतीय हद्दीत आलेल्या चीनच्या पब्लिक लिबरेशन आर्मीच्या (PLA) एका जवानाला पकडण्यात आले आहे.  पीएलएच्या सैनिकाला देमचोकमध्ये भारतीय सैन्यानं ताब्यात घेतले आहे. (China PLA soldier captured near demchok area of ladakh by Indian Army)

भारतीय सीमेमध्ये घुसलेल्या सैनिकाजवळ चीन सैन्याची कागदपत्रे आढळली आहेत. यामध्ये एक ओळखपत्र आढळले असून त्याने नकळत भारतीय हद्दीत प्रवेश केली की हेरगिरीसाठी आला होता याची चौकशी करण्यात येत आहे. भारतीय हद्दीतून तो सैनिक चीन सैन्यासोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती आहे.

चीनच्या सैनिकाने नकळतपणे भारतीय हद्दीत प्रवेश केला असेल तर त्याला नियमांनुसार सोडण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

तणावाची स्थिती कायम
लडाखमध्ये जून महिन्यापासून तणावाची स्थिती कायम आहे. दोन्ही देशांनी हजारो सैनिक, टँक, मिसाईल आदी सीमेजवळ तैणात केले आहे. दोन्ही देशातील लढाऊ विमाने देखील सज्ज आहेत. भारत आणि चीन दरम्यान चर्चा सुरू असून चीन चूक मान्य करण्यास तयार नाही.

भारत आणि चीनमधील सीमेवरील तणाव कमी करण्यासाठी कमांडर स्तरीय चर्चांच्या 7 फेऱ्या पार पडल्या आहेत. मात्र, यातून कोणताही तोडगा निघालेला नाही. पुढील आठवड्यात दोन्ही देशांमध्ये कमांडर स्तरीय चर्चेची 8 वी फेरी पडणार आहे.

संबंधित बातम्या :

चीन तैवानवर हल्ला करणार? वाचा ड्रॅगनचा संपूर्ण ‘गेम प्‍लॅन’

चीनमध्ये निसर्गाचं अचंबित करणारं रूप, एकाच वेळी 3 सूर्य दिसल्याने जगभरात चर्चा

(China PLA soldier captured near demchok area of ladakh by Indian Army)


Published On - 5:00 pm, Mon, 19 October 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI