एकदा लसीचा डोस घेऊन कोरोना बरा होणार नाही : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

अजून कोरोना लस हातात नाही. लस मिळाली तरी एकदा कोरोना लसीचा डोस घेऊन कोरोना बरा होणार नाही, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला.

एकदा लसीचा डोस घेऊन कोरोना बरा होणार नाही : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Follow us
| Updated on: Nov 22, 2020 | 9:41 PM

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेणारी माहिती जनतेला देतानाच अनेक सतर्कतेचे इशारे दिले आहेत. अद्याप आपल्या हातात कोरोनाची लस आलेली नाही आणि ती कधी मिळणार हेही अधांतरिच आहे. मात्र, एकदा कोरोना डोस घेऊन काम होणार नाही, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला. यावेळी त्यांनी नागरिकांना गाफिल न राहता हात धुणे, सोशल डिस्टन्सिंग ठेवणे आणि मास्क लावणे या त्रिसूत्रीचं पालन करण्याचं आवाहन केलं. ते आज (22 नोव्हेंबर) समाजमाध्यमांद्वारे जनतेशी संवाद साधत होते (CM Uddhav Thackeray comment on doses of Corona Vaccine and treatment of COVID 19).

उद्धव ठाकरे म्हणाले, “आजही कोरोनाची लस आपल्या हातात आलेली नाही. काल-परवाही मी काही लोकांशी बोललो येते-येते-येते असं म्हणतात, पण अजून हातात तर काही आलेली नाही. डिसेंबरमध्ये येईल का, जानेवारीत येईल का, फेब्रुवारीत येईल का, मार्चमध्ये येईल का? काहीच माहिती नाही. बरं डिसेंबरमध्ये आली तरी महाराष्ट्रात बारा-साडेबारा कोटी जनता आहे. या सर्वांना ही लस द्यायचं आव्हान आहे. बरं एकदा कोरोना लस देऊन बरं होणार नाही. या कंपन्यांच्या लस दोन टप्प्यात दिल्या जात आहेत. आधी साधा डोस आणि नंतर बुस्टर डोस द्यावा लागत आहे.”

“डोस आणि बुस्टर डोसचा विचार केला तर जनतेला 24-25 कोटी डोसचं लसीकरण करावं लागणार आहे. त्यामुळे पहिला डोस आणि 24 कोटीवा डोस यात मोठा काळ जाणार आहे. ही लस आपल्याकडे कधी मिळणार आहे, लस कोणत्या तापमानात ठेवावी लागणार आहे, लस कशी द्यायची हे सर्व अजूनही अधांतरी आहे. हातात काहीही नाही. औषधं तर नाहीच, पण लसही आपल्या हातात नाही. त्यामुळे मास्क घालणे, दोन हात अंतर ठेवणे आणि हात धुत राहणं हीच त्रिसूत्रीच सध्या फार महत्त्वाची आहे,” असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

“अनेकजण कोरोना झाल्यानंतर बरे होतात. अगदी सौम्य कोरोना संसर्गापासून तर गंभीर कोरोना झालेले रुग्ण बरे होत आहेत. मात्र, पोस्ट कोविड ही नवी गोष्ट समोर आली आहे. कोरोना होऊन गेल्यावर शरीरावर त्याचे गंभीर दुष्परिणाम होताना दिसत आहेत. हे दुष्परिणाम मेंदू, फुफ्फुस, किडनी, पोट आणि श्वसन संस्था यावर जास्त होत आहे,” असंही उद्धव ठाकरे यांनी नमूद केलं.

“आपण सर्व धर्मियांची प्रार्थनास्थळं उघडली आहेत. चार दिवसांवर कार्तिकी वारी येत आहे. कार्तिकीची वारी साधेपणाने पार पाडा. गर्दी न करता सण-उत्सव साजरे करा. कोरोनाचं संकट टळलेलं नाही, तरुणांनो सावध राहा. येणारी लाट आधीच्या लाटेपेक्षा अधिक उग्र असू शकते. 24-25 कोटी जनतेला आपल्याला लसीकरण करावं लागणार आहे. एकदा डोस दिला, तर पुन्हा बुस्टर डोस द्यावे लागणार आहे. डोस दिल्यावर रुग्णाला कोणत्या तापमानात ठेवायचं हे सर्व अधांतरी आहे. त्यामुळे हात धुवा, सोशल डिस्टन्सिंग ठेवा आणि मास्क लावा ही त्रिसूत्रीच पाळावी लागणार आहे.”

“मी तुमच्यावर नाराज आहे. अनेक लोक मास्क न घालता फिरत आहे. गर्दी करत आहेत. आपण शाळा उघडू शकलो नाही. निर्णय घेतला पण उघडू शकलो नाही, कारण प्रश्नांकित आहे. उद्या मुलं आजारी पडू नये याची काळजी आहे. काहीजण म्हणतात हे उघडा, ते उघडा, मात्र ते या महाराष्ट्राची जबाबदारी घेणार आहेत का?” असाही सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला.

“सर्व गोष्टी कायदे करुन होणार नाही, पण सावध राहा यानंतर येणारी कोरोनाची लाट नसून त्सुनामी असण्याची शक्यता”

उद्धव ठाकरे म्हणाले, “काही लोक मला रात्रीचा कर्फ्यू करण्याचं सूचवत आहेत. पण सर्व गोष्टी कायदे करुन होणार नाही. आपणच आपली जबाबदारी पाळली पाहिजे. दिवाळीत आपण फटाकेबंदी केली नाही, पण आपण फटाके फोडले नाहीत. त्यासाठी कायदे करण्याची गरज पडली नाही. कोरोनाचे संकट संपलेलं नाही. कोरोनाच्या आधीच्या परिस्थितीचा विचार करता आता कोरोनाची लाट, नाही तर त्सुनामी असेल की काय असं वाटत आहे.”

“आपण एका वळणावर आलेलो आहोत. पुन्हा लॉकडाऊनकडे जायचं नाही. आपण एका वळणावर असल्याने आपल्या हालचालींवर आपण नियंत्रण ठेवायला हवं. व्हॅक्सीन येईल तेव्हा येईल, सध्या आपण काळजी घ्यायला हवी,” असंही उद्धव ठाकरे यांनी नमूद केलं.

संबंधित बातम्या :

राजकारण करायचं नाही, सगळं सुरू करतो, जबाबदारी घेता का?; मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना सुनावले

CM Uddhav Thackeray | आता येणारी कोरोनाची लाट नसून त्सुनामी, काळजी घ्या : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

CM Uddhav Thackeray | कुठलीही गर्दी न करता कार्तिकी वारी साधेपणाने पार पाडा; मुख्यमंत्र्यांचं आवाहन

संबंधित व्हिडीओ :

CM Uddhav Thackeray comment on doses of Corona Vaccine and treatment of COVID 19

Non Stop LIVE Update
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?.
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ.
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात.
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश.
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप.
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?.
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?.
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?.
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं.