मुंबई पाकव्याप्त काश्मीरसारखी असेल तर हे मोदींचच अपयश; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

अभिनेत्री कंगना रनौतने मुंबई पाकव्याप्त काश्मीरसारखी वाटत असल्याचं म्हटलं होतं. त्याचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समाचार घेतला. मुंबई जर पाकव्याप्त काश्मीरसारखी वाटत असेल तर हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचच अपयश आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

मुंबई पाकव्याप्त काश्मीरसारखी असेल तर हे मोदींचच अपयश; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Follow us
| Updated on: Oct 25, 2020 | 9:15 PM

मुंबई: अभिनेत्री कंगना रनौतने मुंबई पाकव्याप्त काश्मीरसारखी वाटत असल्याचं म्हटलं होतं. त्याचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समाचार घेतला. मुंबई जर पाकव्याप्त काश्मीरसारखी वाटत असेल तर हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचच अपयश आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. (cm uddhav thackeray on kangana ranaut’s controversial statement)

मुंबईतील सावरकर स्मारकात आज शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडला. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच या रॅलीला संबोधित केलं. यावेळी त्यांनी अभिनेत्री कंगना रनौतला नाव न घेता झापलं. काही लोकांना मुंबई पाकव्याप्त काश्मीरसारखी वाटत आहे. मुंबई ही पाकिस्तान सारखी असल्याचं चित्रं उभं केलं जात आहे. जर मुंबई पाकव्याप्त काश्मीरसारखी वाटत असेल तर ते मोदींचं अपयश आहे. कारण मोदींनीच सहा वर्षापूर्वी पाकव्याप्त काश्मीर भारतात आणणार असल्याचं घोषित केलं होतं. ते पाकव्याप्त काश्मीर भारतात तर आणू शकले नाहीत. पण मुंबई जर पाकव्याप्त काश्मीर वाटत असेल तर हे मोदींचच अपयश आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

मुंबई आणि महाराष्ट्राच मीठ खायचं आणि पुन्हा महाराष्ट्राची बदनामी करायची. महाराष्ट्रात उद्योगधंदे सुरु आहेत. महाराष्ट्र पुढे जातो म्हणून बदनामी केली जात आहे, अशी टीका त्यांनी कंगनाचं नाव न घेता केली.

काश्मीरमध्ये एक इंच जमीन घेऊन दाखवा

मुंबई पाकव्याप्त काश्मीर, पाकव्याप्त काश्मीर सोडून द्या, मोदींनी २०१४ ला सांगितलं होतं की पाकव्याप्त काश्मीर भारतात आणू. ते लांब राहिलं. पण ३७० कलम काढलं आहे. त्यानंतर तुम्ही आज तरी अधिकृत एक इंच जमीन काश्मीरमध्ये घेऊन दाखवा. मग आमच्या अंगावर या, असं आव्हानही त्यांनी कंगनाला दिलं. (cm uddhav thackeray on kangana ranaut’s controversial statement)

संबंधित बातम्या:

‘देवेंद्र फडणवीसांनी लवकर बरे व्हावे; आम्हाला लढण्यासाठी समोर तगडा पैलवान पाहिजे’

मुंबईची पाकिस्तानशी तुलना; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कंगनाला नाव न घेता झापले!

इकडे गाय म्हणजे माता, पलिकडे जाऊन खाता; हे तुमचं हिंदुत्व?: उद्धव ठाकरे

(cm uddhav thackeray on kangana ranaut’s controversial statement)

आनंद आश्रमातील प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल तर काय म्हणाले शिंदे?
आनंद आश्रमातील प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल तर काय म्हणाले शिंदे?.
तो निर्णय आम्हाला मान्य, खडसेंच्या प्रवेशावर काय म्हणाले फडणवीस?
तो निर्णय आम्हाला मान्य, खडसेंच्या प्रवेशावर काय म्हणाले फडणवीस?.
देवेंद्र फडणवीसांनी नागपुरात दणक्यात वाजवला ढोल, बघा व्हिडीओ
देवेंद्र फडणवीसांनी नागपुरात दणक्यात वाजवला ढोल, बघा व्हिडीओ.
आता मराठी विषय सक्तीचा... सरकारी-खासगी शाळांना शासनाचा निर्देश काय?
आता मराठी विषय सक्तीचा... सरकारी-खासगी शाळांना शासनाचा निर्देश काय?.
दिघे असते तर... आनंद आश्रममधील घडलेल्या प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल
दिघे असते तर... आनंद आश्रममधील घडलेल्या प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल.
'तो लिंबू कापणारा चमत्कारी बाबा, त्यानं म्हातारपणात..', जरांगेंची टीका
'तो लिंबू कापणारा चमत्कारी बाबा, त्यानं म्हातारपणात..', जरांगेंची टीका.
मोदींच्या घरात खास पाहुण्याचं आगमन; नाव ऐकून तुम्हीही म्हणाल वाह!
मोदींच्या घरात खास पाहुण्याचं आगमन; नाव ऐकून तुम्हीही म्हणाल वाह!.
मुख्यमंत्र्यांनी मराठ्यांसोबत दगाफटका केला तर..., जरांगेंचा इशारा काय?
मुख्यमंत्र्यांनी मराठ्यांसोबत दगाफटका केला तर..., जरांगेंचा इशारा काय?.
'ते दिघेंच्या विचाराचे नाही तर बारमधील',ठाकरे गटातील नेत्याचा हल्लाबोल
'ते दिघेंच्या विचाराचे नाही तर बारमधील',ठाकरे गटातील नेत्याचा हल्लाबोल.
हा सर्व धर्मराव आत्राम अन् त्यांच्या मुलीचा गेम, भाजप नेता काय म्हणाला
हा सर्व धर्मराव आत्राम अन् त्यांच्या मुलीचा गेम, भाजप नेता काय म्हणाला.