मराठा, ओबीसी, धनगर समाज सर्वांना न्याय देईन, मुख्यमंत्री म्हणून वचन : उद्धव ठाकरे

दसरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सध्या राज्यात सुरु असलेल्या घडामोडींवर भाष्य केलं (CM Uddhav Thackeray promise to people).

मराठा, ओबीसी, धनगर समाज सर्वांना न्याय देईन, मुख्यमंत्री म्हणून वचन : उद्धव  ठाकरे
Follow us
| Updated on: Oct 25, 2020 | 8:32 PM

मुंबई : “मराठा, ओबीसी, धनगर समाज सर्वांना सांगतो, आम्ही तुमचे आहोत. हे सरकार तुमचं आहे. कोणत्याही समाजाला न्याय दिल्याशिवाय शांत राहणार नाही, हे मुख्यमंत्री म्हणून माझं तुम्हाला वचन आहे. सगळ्या समाजाला मी न्याय देईन. न्याय देताना कुणाचं काहीही काढून घेणार नाही”, असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला दिलं (CM Uddhav Thackeray promise to people).

मुंबईतील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात आज (25 ऑक्टोबर) शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सध्या राज्यात सुरु असलेल्या घडामोडींवर भाष्य केलं (CM Uddhav Thackeray promise to people).

“एक गोष्ट नक्की चांगली आहे, प्रत्येक समाज म्हणतोय, त्यांना आरक्षण द्या, हरकत नाही. पण आमचं तसंच राहू द्या. कुणाचंही आरक्षण कमी होणार नाही. आदिवासी, धनगर आणि ओबीसी आरक्षण आहे तसंच राहील. मराठा समाजाला आरक्षण देऊ”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

“फक्त एकच हात जोडून नम्र विनंती करतोय जातपात आणि समाजात जे कुणी महाराष्ट्रात द्वेशच्या भींती उभ्या करत असतील त्यांच्या कारस्थानांना बळी पडू नका. कारण तुम्ही म्हणजे महाराष्ट्र आहात. तुम्ही म्हणजे शिवरायांचे मर्द मावळे आहात. तुमच्यात फूट पडली, तोडफोड करणाऱ्यात जर ते यशस्वी झाले तर केवळ आपलेच नाही तर महाराष्ट्राचे तुकडे करायला ते मागेपुढे पाहणार नाहीत. म्हणून दसऱ्यानिमित्त महाराष्ट्राच्या एकजुटीला तडा जाईल, असं मी काही करणार नाही, अशी शपथ घेऊया”, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं.

संबंधित बातम्या :

संघमुक्त भारत म्हणणाऱ्या नितीशकुमारांच्या गळ्यात गळे कसे?, उद्धव ठाकरेंचा भाजपला सवाल

काळी टोपी घालणाऱ्यांनो, सरसंघचालक हिंदुत्वाबाबत काय म्हणतात ते समजून घ्या; उद्धव ठाकरेंचा हल्ला

CM Uddhav Thackeray Speech | हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा, उद्धव ठाकरेंचे विरोधकांना आव्हान

म्हणून मुस्लिम महिलांना बुरखा वाटले, विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर
म्हणून मुस्लिम महिलांना बुरखा वाटले, विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर.
अजितदादा गटातील माजी नगरसेवकाच्या पिस्तूलमधून चुलत भावाने केला गोळीबार
अजितदादा गटातील माजी नगरसेवकाच्या पिस्तूलमधून चुलत भावाने केला गोळीबार.
'लाडकी बहीण' योजनेत 12 'भामट्या' भावांनी भरला अर्ज , कशी झाली पोलखोल?
'लाडकी बहीण' योजनेत 12 'भामट्या' भावांनी भरला अर्ज , कशी झाली पोलखोल?.
तर खुलासा करा, राहुल गांधींच्या 'त्या' वक्तव्यानंतर मुंडेंचे आव्हान
तर खुलासा करा, राहुल गांधींच्या 'त्या' वक्तव्यानंतर मुंडेंचे आव्हान.
वादग्रस्त वक्तव्यानंतर स्पष्टीकरण, विरोधकांच्या टीकेवर राणे म्हणाले..
वादग्रस्त वक्तव्यानंतर स्पष्टीकरण, विरोधकांच्या टीकेवर राणे म्हणाले...
अजित पवार बारामतीतूनच लढणार? दादा गटाचे 20 उमेदवार ठरले, बघा यादी
अजित पवार बारामतीतूनच लढणार? दादा गटाचे 20 उमेदवार ठरले, बघा यादी.
सुषमा अंधारेंना किती शिवसेना माहिती?त्या टीकेवर यामिनी जाधवांचा पलटवार
सुषमा अंधारेंना किती शिवसेना माहिती?त्या टीकेवर यामिनी जाधवांचा पलटवार.
'भाजपात गेलो होतो, पण...'; नाराजी व्यक्त करत माजी आमदाराची घरवापसी
'भाजपात गेलो होतो, पण...'; नाराजी व्यक्त करत माजी आमदाराची घरवापसी.
पूरस्थितीवर आमदार-खासदार असंवेदनशील? पाहणीसाठी गेले अन् स्टंटबाजी
पूरस्थितीवर आमदार-खासदार असंवेदनशील? पाहणीसाठी गेले अन् स्टंटबाजी.
'राऊत भैसाटलेले, त्यांच्या बुद्धीला लकवा', भाजपच्या नेत्याचा पलटवार
'राऊत भैसाटलेले, त्यांच्या बुद्धीला लकवा', भाजपच्या नेत्याचा पलटवार.