AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CM Uddhav Thackeray Speech | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील 15 प्रमुख मुद्दे

उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यातील भाषणातून अनेक मुद्द्यांना हात घातला.

CM Uddhav Thackeray Speech | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील 15 प्रमुख मुद्दे
| Updated on: Oct 25, 2020 | 8:54 PM
Share

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचा दसरा मेळावा यंदा शिवतिर्थावर न घेता वीर सावरकर सभागृहामध्ये निवडक नेत्यांच्या उपस्थितीत पार पडत आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतरचा हा पहिलाच दसरा मेळावा आहे. या दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विविध मुद्द्यांना हात घातला. तसेच त्यांनी अनेक मुद्द्यांवरुन केंद्र सरकारवर टीका केली. Highlights points of Uddhav Thackeray’s speech at Dussehra melava

उद्धव ठाकरे नक्की काय म्हणाले, याबद्दल काही महत्तावाचे मुद्दे.

-बिहारच्या जनतेने प्रलोभनांना बळी न पडता मतदान करावं, कोणाला करावं हे मी सांगणार नाही, फक्त डोळे उघडे ठेवून मतदान करा- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

-तुम्ही रातोरात झाडांची कत्तल करत होता, आम्ही 808 एकर जंगल वाचवलं, एक नवा पैसाही खर्च न करता कारशेड उभारतोय- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

-आदित्य, ठाकरे कुटुंबावर चिखलफेक झाली हे भयंकर होतं. बिहारच्या सुपुत्रार चिखलफेक करणारे महाराष्ट्राच्या सुपुत्रावर चिखलफेक करतायेत- मु्ख्यमंत्री उद्धव ठाकरे

-आमच्या अंगावरती येत आहात,महाराष्ट्र द्वेष पाहिल्यानंतर मी महाराष्ट्राच्या जनतेला आवाहन करतो, सावध राहा : उद्धव ठाकरे

-इथं काम करणारी पोरं महाराष्ट्राच्या मातीतली हवी- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

-मुंबईला पाकव्याप्त काश्मीर म्हणणारा रावण आलाय, मुंबईत यायचं आणि इथल्या मातेशी नमकहरामी करायची, मुंबईला पाकव्याप्त काश्मीर म्हणणाऱ्या कंगनावर मुख्यमंत्र्यांचा प्रहार

-रावसाहेब दानवेंचा बाप दिल्लीत असेल माझा बाप भाडोत्री नाही, आमचे जीएसटीचे पैसे मिळायलाच हवेत – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

-बिहारमध्ये मोफत लस, मग आम्ही काय बांगलादेशचे?? – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

-देश संकटात आहे आणि भाजप राजकारण करतंय, हा देश म्हणजे कोणाच्या बापाची मालमत्ता नाही- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

-सर्व मुख्यमंत्र्यांनी जीएसटी रद्द करण्याची मागणी करावी, जीएसटी फेस गेली असेल तर पंतप्रधानांनी माफी मागावी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

-कोरोना आहे, संकट आहे, जीएसटी नाही, पैसे येणार कुठून, जीएसटीची प्रणाली फसली असेल तर पंतप्रधानांनी आपली चूक मान्य करावी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

-देव, मंदिर, पूजा, अर्चा हे आमचं हिंदुत्व नाही, बाळासाहेबांनी सांगितलेलं आमचं हिंदुत्व – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

-सरसंघचालकांकडून हिंदुत्व शिकून घ्या, संजयजी उद्याच्या सामनात सरसंघचालकांचं भाषणं व्यवस्थित आलं पाहिजे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

-हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा, उद्धव ठाकरेंचे विरोधकांना आव्हान

-घंटा बडवा थाळ्या बडवा हे तुमचं हिंदुत्व, आमचं हिंदुत्व असलं नाही, हिंदुत्व हे आमचं राष्ट्रीयत्व – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

-हिंदुत्वाबद्दल आम्हाला प्रश्न विचारले जातात का तर मंदिरं उघडले नाहीत म्हणून.. पण आम्हाला कोण विचारतंय… ज्यावेळी बाबरी पाडली त्यावेळी हे शेपट्या घालून बसले होते – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

-बेडकाच्या पिलाने वाघ पाहिला, वाघ पाहून तो लपला, मुख्यमंत्र्यांची राणे पिता पुत्रांवर जोरदार टीका

-महाराष्ट्राच्या हिताच्या आड येणाराला आडवा करुन गुढीपाडवा उभारण्याची महाराष्ट्राची परंपरा: उद्धव ठाकरे

– सरकार पाडण्याच्या अनेकजण तारीख पे तारीख देतात, मी आताही आव्हान देतो, सरकार पाडून दाखवाच… आम्ही खुर्चाला चिटकून बसणारे नाहीत. पण आमच्या वाटेला जाल तर मुंगळा कसा डसतो हे दाखवतो.

संबंधित बातम्या :

काळी टोपी घालणाऱ्यांनो, सरसंघचालक हिंदुत्वाबाबत काय म्हणतात ते समजून घ्या; उद्धव ठाकरेंचा हल्ला

संघमुक्त भारत म्हणणाऱ्या नितीशकुमारांच्या गळ्यात गळे कसे?, उद्धव ठाकरेंचा भाजपला सवाल

CM Uddhav Thackeray Speech | कळसूत्री बाहुल्यांचा खेळ संपवला, यापुढे राज्यात मर्द मावळ्यांचं सरकार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Highlights points of Uddhav Thackeray’s speech at Dussehra melava

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.