Live | आम्ही तुमच्यासारखे गुळाच्या ढेपाला चिकटणारे मुंगळे नाहीत, पण वाटेला जाल तर…, उद्धव ठाकरेंचा दसरा मेळाव्यात इशारा

शिवसेनेचा दसरा मेळावा यंदा स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात अगदी 50 जणांच्या उपस्थितीत मोठ्या दिमाखात पार पडत आहे (Shiv Sena Dussehra Melava Live Update).

Live | आम्ही तुमच्यासारखे गुळाच्या ढेपाला चिकटणारे मुंगळे नाहीत, पण वाटेला जाल तर..., उद्धव ठाकरेंचा दसरा मेळाव्यात इशारा
Follow us
| Updated on: Oct 25, 2020 | 8:36 PM

मुंबई : “सरकार स्थापन व्हायला एक वर्ष होत आलं. तरीही विरोधक तारीख पे तारीख देत आहेत, देऊ द्या. मी ज्यावेळेला मुख्यमंत्री म्हणून कारभाराला सुरुवात केली त्या दिवसापासून अनेकजण सरकार पडेल, असं स्वप्न बघत आहेत. हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा. आम्ही तुमच्यासारखे गुळाच्या ढेपाला चिकटणारे मुंगळे नाहीत. पण जर वाटेला जाल तर मुंगळा कसा डसतो ते दाखवल्याशिवाय राहणार नाहीत”, असा घणाघात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात केला.

शिवसेनेचा दसरा मेळावा यंदा स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात अगदी 50 जणांच्या उपस्थितीत पार पडला. कोरोना संकटामुळे दरवर्षी दसरा मेळावा शिवाजी पार्कात करण्याची परंपरा यंदा खंडित झाली. सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम पाळून सायंकाळी सातच्या मुहुर्तावर हा मेळावा सुरु झाला होता (Shiv Sena Dussehra Melava Live Update).

LIVE UPDATE:

  • <

    /li>

  • सरकार स्थापन व्हायला एक वर्ष होत आलं. तारीख पे तारीख देत आहेत, देऊ द्या. मी ज्यावेळेला मुख्यमंत्री म्हणून कारभाराला सुरुवात केली त्या दिवसापासून अनेकजण सरकार पडेल, असं स्वप्न बघत आहेत. हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा. आम्ही तुमच्यासारखे गुडाच्या ढेपाला चिटकणारे मुगळे नाहीत. पण जर वाटेल जाल तर मुगळा कसा डसतो ते दाखवल्याशिवाय राहणार नाहीत : उद्धव ठाकरे
  • महाविजयादशनी निमित्त दसऱ्याच्या शुभेच्छा.. धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या शुभेच्छा : उद्धव ठाकरे
  • उद्धव ठाकरे यांचं भाषण सुरु
  • /li>

  • संजय राऊत यांच्या भाषणाला सुरुवात
  • शाहीर नंदेश उमप यांच्या पोवाड्याने दसरा मेळाव्याला सुरुवात
  • मुख्यमंत्री सावरकर स्मारकारत पोहोचले, त्यांच्यासोबत पत्नी रश्मी ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे देखील सावरकर स्मारकारत दाखल
  • मुख्यमंत्र्यांचा ताफा शिवाजी पार्कवर दाखल, बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींना वंदन
  • उद्धव ठाकरे मातोश्रीवरुन रवाना, थोड्याच वेळात बाळासाहेब ठाकरे स्मृतिस्थळाला अभिवादन करणार
  • बाळासाहेब ठाकरे स्मारकावर शिवसैनिकांची गर्दी
  • सावरकर स्मारकात शिवसेनेचे नेते पोहोचायला सुरुवात
  • महापौर किशोरी पेडणेकर या बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळावर नतमस्तक झाल्या. त्यांनी शिवतीर्थावरील बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला. शिवसेना प्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज दोन्ही भूमिकेत दिसणार. मुख्यमंत्री सोशल मीडियाच्या माध्यमातून विरोधकांना उत्तर आणि जनतेलाही मार्गदर्शन करतील, असा विश्वास किशोरी यांनी व्यक्त केला.

दसरा मेळाव्यातील ताजी दृश्ये

दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांनी जय्यत तयारी केली आहे. दसरा मेळाव्यात छायाचित्रणासाठी बंदी घालण्यात आली आहे. मात्र, तरीदेखील शिवसेनेकडून दसरा मेळाव्यासाठी सुरु असलेल्या तयारीचे फोटो समोर आले आहेत (Shiv Sena Dussehra Melava Live Update).

शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सायंकाळी 6.30 वाजेच्या सुमारास सहपरिवार शिवाजी पार्क येथील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाला मानवंदना देतील. त्यानंतर ठीक 7 वाजता स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहातून त्यांच्या भाषणाला सुरुवात होईल. उद्धव ठाकरे प्रमुख पाहुणे म्हणून या मेळाव्याला संबोधित करतील. तसेच, शिवसेनेचे मंत्री, खासदार, आमदार, नगरसेवक आणि प्रमुख नेते यावेळी उपस्थित राहणार आहेत.

शिवसेना मेळाव्याला प्रमुख उपस्थिती

शिवसेना सचिव – अनिल देसाई, विनायक राउत, आदेश बांधेकर, मिलिंद नार्वेकर, सुरज चव्हाण

युवासेना मुंबईचे पदाधिकारी – अमोल किर्तीकर आणि वरुण सरदेसाई

लोकसभा खासदार – अरविंद सावंत आणि राहुल शेवाळे

राज्यसभा खासदार – प्रियंका चतुर्वेगी

विधानसभेचे आमदार – प्रकाश सुर्वे, सुनिल राऊत, रमेश कोरगांवकर, रविद्रं वायकर, सुनिल प्रभु, रमेश लटके, दिलीप लांडे, प्रकाश फातर्फेकर, मंगेश कुडाळकर, संजय पोतनीस, सदा सरवणकर, अजय चौधरी, यामिनी जाधव

विधानपरिषद आमदार – अनिल परब, विलास पोतनीस, मनिषा कायंदे, मंत्री नीलम गोर्हे

मुंबईच्या महापौर – किशोरी पेडणेकर

जनसंपर्कप्रमुख – हर्षल प्रधान

उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा, प्रत्येक जिल्ह्यात शिवरायांचं मंदिर उभारणार
उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा, प्रत्येक जिल्ह्यात शिवरायांचं मंदिर उभारणार.
'भाजपच्या खोडाला दाढीवाला खोड किडा आणि बोंडाला गुलाबी अळी...'
'भाजपच्या खोडाला दाढीवाला खोड किडा आणि बोंडाला गुलाबी अळी...'.
'त्यांना गाडून भगवा फडकवणार', शिवतीर्थावरून उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
'त्यांना गाडून भगवा फडकवणार', शिवतीर्थावरून उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली.
शिंदे पुरून उरला, घासून पुसून नाही ठासून...',मुख्यमंत्र्यांची फटकेबाजी
शिंदे पुरून उरला, घासून पुसून नाही ठासून...',मुख्यमंत्र्यांची फटकेबाजी.
शिवतीर्थावर देवाची आळंदी, चोरांची आळंदी तर...,राऊतांचा शिंदेंवर निशाणा
शिवतीर्थावर देवाची आळंदी, चोरांची आळंदी तर...,राऊतांचा शिंदेंवर निशाणा.
'तोपर्यंत आचारसंहिता लागणार नाही', आदित्य ठाकरेंचा भरभाषणातून घणाघात
'तोपर्यंत आचारसंहिता लागणार नाही', आदित्य ठाकरेंचा भरभाषणातून घणाघात.
तुम्ही फक्त पोस्टमन बेक्कार क्रेडीट.. सुषमा अंधारेंचा सरकारवर हल्लाबोल
तुम्ही फक्त पोस्टमन बेक्कार क्रेडीट.. सुषमा अंधारेंचा सरकारवर हल्लाबोल.
जरांगेंची तोफ धडाडली, नारायण गडावरून इशारा; 'उलथापालथ करावीच लागेल..'
जरांगेंची तोफ धडाडली, नारायण गडावरून इशारा; 'उलथापालथ करावीच लागेल..'.
'हट्ट धरू नका, एकच वचन द्या',जरांगेंनी मराठ्यांकडून कोणता मागितला शब्द
'हट्ट धरू नका, एकच वचन द्या',जरांगेंनी मराठ्यांकडून कोणता मागितला शब्द.
तर राज ठाकरेंनी सोबत यावं, शिंदेंच्या नेत्याचं मनसे अध्यक्षांना आवाहन
तर राज ठाकरेंनी सोबत यावं, शिंदेंच्या नेत्याचं मनसे अध्यक्षांना आवाहन.