Exclusive | उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राच्या मनातील बोलतील : संजय राऊत

ठोशास ठोसा असे उत्तर मिळावे अशी महाराष्ट्राची अपेक्षा आहे," असेही संजय राऊत म्हणाले.  (Sanjay Raut Exclusive Interview Before Shivsena Dasara melava)

Exclusive | उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राच्या मनातील बोलतील : संजय राऊत

मुंबई : “मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी काय बोलावे हे सांगणं माझा अधिकार नाही. ते मुख्यमंत्री आहेत. त्यांना या पदाचा शिष्टाचार पाळावा लागतो. ते नेहमी पाळतात. मात्र आज उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या मनातील बोलतील,” अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यापूर्वी दिली. (Sanjay Raut Exclusive Interview Before Shivsena Dasara melava)

“आज आम्ही गुद्द्यांचा विचार करतो. मुद्दयांवरच राजकारण सुरु असतं. मात्र गेलं वर्षभरात ज्या पद्धतीने विरोधकांनी सरकारला, शिवसेनेला महाराष्ट्राला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. नेत्यांना बदनाम केले. आमच्यावर चिखलफेक करतात. याला जशाच तसे उत्तर, ठोशास ठोसा असे उत्तर मिळावे अशी महाराष्ट्राची अपेक्षा आहे,” असेही संजय राऊत म्हणाले.

उद्धव ठाकरे हे अधूनमधून मुख्यमंत्रिपदाचा मास्क काढत असतात. नियमाच्या चौकटीत राहून ते मास्क वर-खाली करतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी राज्यपालांना पत्र लिहिलं होतं. यामुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली. ते पूर्णपणे राजकीय उत्तर होतं. तुम्ही राजकारण म्हणून आमच्या अंगावर याल तर आमची शस्त्र कधी शमीच्या झाडावर नसतात. आमची शस्त्र ही कायम आमच्या कमरेवरच असतात, असेही संजय राऊतांनी यावेळी सांगितले.

“शिवसेनेला मुख्यमंत्रीपद मिळालं असतं तर भाजपचा सन्मान राहिला असता”

“दसरा मेळावा राजकीयच असतो. तो एक ऐतिहासिक मेळावा असतो. पुढच्या वर्षी शिवसेनेचा मुख्यमंत्री असेल असं मी म्हणालो होतो. अनेकांना प्रश्न पडला. पण माझा आत्मविश्वास होता. हा आत्मविश्वास बाळासाहेबांनी दिला होता,” असेही उद्धव ठाकरेंनी यावेळी सांगितले.

“शिवसेनेला मुख्यमंत्रीपद मिळालं असतं तर भाजपचा सन्मान राहिला असता. आम्ही त्यांना भूमिका घ्या असे सांगत होतो, त्यांनी ती भूमिका बिहारमध्ये घेतली. नितीशच्या जागा कमी ती भूमिका बिहारला घेता, पण महाराष्ट्रात मात्र नाही. आम्ही निष्ठावंत जुने आहोत. नितीशकुमार हे पेईंगगेस्ट आहेत. ते जाऊन येऊन असतात. त्यांच्या बाबत मात्र सकारात्मक भूमिका घेतली,” अशी टीकाही संजय राऊतांनी केली.

“आम्ही कशाला चिटींग करु, तुम्ही चिटींग करत होतात. आम्ही ती उधळून लावली,” असेही संजय राऊतांनी यावेळी सांगितले. (Sanjay Raut Exclusive Interview Before Shivsena Dasara melava)

संबंधित बातम्या : 

मी शर्यतीत असेन आणि तोडणाऱ्यांना उत्तर देईन, पंकजा मुंडेंचा विरोधकांना इशारा

‘भाजपनं बिहारमध्ये जनाची आणि मनाचीही बाळगावी’!, दसरा मेळाव्यावरील विरोधकांच्या टीकेला राऊतांचं जोरदार प्रत्युत्तर

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI