AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उद्धव ठाकरेंचा आज जनतेशी संवाद; अनलॉक, मराठा आरक्षण, कोरोना आणि शेतकरी आत्महत्यांविषयी काय बोलणार?

लॉकडाऊनच्या परिस्थितीला जवळपास सहा महिने उलटून गेल्यानंतर आर्थिक प्रश्न बिकट झाले आहेत.

उद्धव ठाकरेंचा आज जनतेशी संवाद; अनलॉक, मराठा आरक्षण, कोरोना आणि शेतकरी आत्महत्यांविषयी काय बोलणार?
| Updated on: Oct 11, 2020 | 12:20 PM
Share

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पुन्हा एकदा जनतेशी संवाद साधणार आहेत. आज दुपारी दीड वाजता नेहमीप्रमाणे फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून ते राज्यातील नागरिकांना संबोधित करतील. गेल्या काही दिवसांमध्ये राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आला असला तरी लॉकडाऊन पूर्णपणे शिथील न केल्यामुळे दैनंदिन व्यवहारांना म्हणावा तसा वेग आलेला नाही. तर मुंबईसारख्या शहरात जनतेकडून लोकल ट्रेन सुरु करण्याची जोरदार मागणी होत आहे. त्यामुळे या सगळ्या परिस्थितीविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज काय भूमिका मांडणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. (CM Uddhav Thackeray will address Maharashtra )

याशिवाय, गेल्या काही दिवसांत राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. यासाठी मराठा संघटनांनी आंदोलनाची हाक दिली आहे. मराठा संघटनांच्या दबावामुळे काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारकडून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (MPSC) परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. त्यामुळे मराठा आंदोलकांचे समाधान झाले असले तरी समाजाच्या इतर स्तरांमध्ये काहीसे नाराजीचे वातावरण आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे या सगळ्यावर काही निर्णायक भाष्य करणार का, हे पाहणेदेखील महत्त्वाचे ठरेल.

मार्च महिन्यात महाराष्ट्रात लॉकडाऊन झाल्यापासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वेळोवळी राज्यातील जनतेशी संवाद साधत होते. या माध्यमातून ते नागरिकांना सातत्याने राज्यातील कोरोनाची परिस्थिती, सरकारकडून करण्यात आलेल्या उपाययोजना आणि इतर गोष्टींची माहिती देत होते. अनेक लोकांकडून उद्धव ठाकरे यांच्या या कृतीचे कौतुकही करण्यात आले होते. मात्र, आता लॉकडाऊनच्या परिस्थितीला जवळपास सहा महिने उलटून गेल्यानंतर आर्थिक प्रश्न बिकट झाले आहेत. त्यामुळे राज्यातील जनतेकडून लॉकडाऊन पूर्णपणे उठवण्याची मागणी केली जात आहे. या सगळ्याला उद्धव ठाकरे कशाप्रकारे सामोरे जाणार, याकडेही अनेकांचे लक्ष आहे.

महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या, मुख्यमंत्री काय बोलणार?

सोसायट्यांचे कर्ज, कौटुंबिक आणि सामाजिक अडचणी, नापिकी, ओला आणि सुका दुष्काळ, बोगस बियाणे, शासकीय मदत न मिळणे यांसारख्या अनेक कारणांनी हैराण झालेला शेतकरी आत्महत्येसारखे गंभीर पाऊल उचलतो. एनसीबीआरच्या आकडेवारीनुसार देशात 2019 मध्ये तब्बल 10 हजार 281 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यापैकी तीन हजार 927 शेतकरी महाराष्ट्रातील आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे भाषण पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

Watch LIVE: Facebook: https://bit.ly/2TZbpTX Twitter: https://bit.ly/30RheWt YouTube: https://bit.ly/33JEnMA Instagram: https://bit.ly/3iVaE7T

संबंधित बातम्या:

तीन वेळा वेगवेगळे कोरोना रिपोर्ट, मी पॉझिटिव्ह का निगेटिव्ह? तरुणाचा उद्धव ठाकरेंना प्रश्न

(CM Uddhav Thackeray will address Maharashtra )

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.