AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तीन वेळा वेगवेगळे कोरोना रिपोर्ट, मी पॉझिटिव्ह का निगेटिव्ह? तरुणाचा उद्धव ठाकरेंना प्रश्न

मी नेमका कोरोना पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह?" असा प्रश्न त्याने पत्र लिहित मुख्यमंत्र्यांना विचारला आहे. (Ahmadnagar boy write letter to CM Uddhav Thackeray)

तीन वेळा वेगवेगळे कोरोना रिपोर्ट, मी पॉझिटिव्ह का निगेटिव्ह? तरुणाचा उद्धव ठाकरेंना प्रश्न
| Updated on: Aug 25, 2020 | 5:33 PM
Share

अहमदनगर : अहमदनगरमध्ये राहणाऱ्या एका तरुणाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं आहे. “मी नेमका कोरोना पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह?” असा प्रश्न त्याने पत्र लिहित मुख्यमंत्र्यांना विचारला आहे. महापालिका प्रशासनाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या कोरोना चाचणीच्या रिपोर्टवर शंका उपस्थित केली आहे. (Ahmadnagar boy write letter to CM Uddhav Thackeray On Corona Report)

या तरुणाने 21 ऑगस्टला भारतीय जैन संघटना, फोर्स मोटर्स, अहमदनगर जिल्हा रुग्णालयात संध्याकाळी 4 च्या दरम्यान पालिकेच्या कोरोना सेंटरमध्ये अँटीजन तपासणी केली होती. तर त्यावेळी कोरोना झाल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर तो तरुण फार घाबरला .

पण त्या ठिकाणी प्रत्येक व्यक्तीला पॉझिटिव्ह असल्याचे सांगत होते. त्यामुळे त्याच्या मनात शंका आली. त्यामुळे त्याने मित्राला फोन करत सिव्हिल रुग्णालयात चाचणी केली. त्या चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह आला.

मात्र तरीही त्याच्या मनातील शंका जात नसल्याने त्याने पुन्हा दुसऱ्या दिवशी 24 ऑगस्टला रॅपिड टेस्ट केली. तर त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. यानंतर फार गोंधळलेल्या त्या तरुणाने थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित याबाबतची तक्रार दाखल केली आहे.

तसेच मी पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह असा प्रश्नही त्या तरुणाने मुख्यमंत्र्यांना विचारला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री याबाबत नेमका काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. (Ahmadnagar boy write letter to CM Uddhav Thackeray On Corona Report)

संबंधित बातम्या : 

कोल्हापुरात कोरोना सेंटरमध्ये गणरायाचे आगमन, मंत्री हसन मुश्रीफांच्या हस्ते प्रतिष्ठापना

Mahad Building Collapse | इमारतीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे, दोषींवर तात्काळ कारवाई : एकनाथ शिंदे

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.