Mahad Building Collapse | इमारतीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे, दोषींवर तात्काळ कारवाई : एकनाथ शिंदे

या प्रकरणी जो कोणी दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई केली जाईल, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली. (Minister Eknath Shinde on Mahad Building Collapse)

Mahad Building Collapse |  इमारतीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे, दोषींवर तात्काळ कारवाई : एकनाथ शिंदे
Follow us
| Updated on: Aug 25, 2020 | 8:08 AM

रायगड : महाडमध्ये इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे. तर अद्याप 19 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. तर आतापर्यंत 60 जणांना बाहेर काढण्यात यश आलं आहे. दरम्यान या प्रकरणी जो कोणी दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई केली जाईल, अशी प्रतिक्रिया नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. (Minister Eknath Shinde on Mahad Building Collapse)

महाडमध्ये झालेली दुर्घटना अत्यंत दुर्दैवी आहे. ही इमारत पत्त्यासारखी कोसळली. अजूनही आत अडकलेल्या लोकांना बाहेर काढलं जात आहे. या इमारतीचे बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होते. त्यामुळे याप्रकरणी जो कोणी दोषी आहे, त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

तसेच या दुर्घटनेत जखमी किंवा मृत व्यक्तींच्या कुटुंबाला सरकारकडून योग्य ती मदत दिली जाईल. तसेच शहरात ज्या काही जुन्या इमारती आहेत. त्यांच्यासाठी क्लस्टर योजना आणली जाईल, अशी माहिती एकनाथ शिंदेंनी दिली.

नेमकी घटना काय?

महाड शहर पोलीस ठाणे हद्दीत काजलपुरा भागात 05 मजली इमारत काल सायंकाळी सातच्या सुमारास कोसळली. या इमारतीचं नाव तारीक गार्डन असं होतं. यामध्ये 45 ते 47 फ्लॅट होते. या दुर्घटनेत अनेक रहिवाशी अडकले होते. त्यानंतर प्रशासनाने युद्ध पातळीवर बचाव कार्य करण्यास सुरुवात केली. यातील जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केलं आहे.

तब्बल पाच मजली इमारत पत्त्यासारखी कोसळली. इमारतीचा पाया खचल्यामुळे ती आहे तशीच खाली बसली. एखादी इमारत तयारी करुन पाडली जाते, अगदी तसंच वाटावं, अशी ही इमारत जागच्या जागी खाली बसली. इमारतीचा राडारोडा उपसण्यासाठी दोन दिवस लागण्याची शक्यता आहे. स्थानिकांनी हा ढिगारा उपसण्याचं काम सुरु केलं आहे

इमारत कोसळल्यामुळे मोठा ढिग निर्माण झाला आहे. हा ढिग बाजूला सारायला अडचणी येत आहेत. स्थानिकांनी तातडीने जेसीबी लावून ढिगारा उपसण्याचं काम सुरु केलं. हा ढिगारा उपसायला जवळपास दीड ते दोन दिवस लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यानंतरच खरी परिस्थिती कळेल, असे सांगण्यात येत आहे. (Minister Eknath Shinde on Mahad Building Collapse)

संबंधित बातम्या : 

Mahad Building Collapse | अवघी 10 वर्षे जुनी इमारत, पत्त्याप्रमाणे कोसळली, नेमकं काय घडलं?

Mahad Building Collapse | महाडमध्ये 5 मजली इमारत कोसळली, बचाव पथकाचं काम युद्ध पातळीवर सुरु

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.