काँग्रेस आणि अरुण गवळीच्या कार्यकर्त्यांचा टीव्ही 9 मराठीच्या कार्यक्रमात गोंधळ

सचिन पाटील

| Edited By: |

Updated on: Jul 05, 2019 | 4:32 PM

जालना : टीव्ही 9 मराठीच्या लालकिल्ला एक्स्प्रेस या कार्यक्रमात कुख्यात गुंड अरुण गवळीचा पक्ष अखिल भारतीय सेना आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. अरुण गवळीचा उल्लेख फक्त अरुण गवळी असा न करता डॅडी म्हणावं, अशी या अखिल भारतीय सेनेच्या कार्यकर्त्यांची इच्छा होती. शिवाय भाजप आमदार नारायण कुचे यांच्यासाठी आक्षेपार्ह शब्दही वापरण्यात आला. गुंड अरुण गवळीचा पक्ष […]

काँग्रेस आणि अरुण गवळीच्या कार्यकर्त्यांचा टीव्ही 9 मराठीच्या कार्यक्रमात गोंधळ
Follow us

जालना : टीव्ही 9 मराठीच्या लालकिल्ला एक्स्प्रेस या कार्यक्रमात कुख्यात गुंड अरुण गवळीचा पक्ष अखिल भारतीय सेना आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. अरुण गवळीचा उल्लेख फक्त अरुण गवळी असा न करता डॅडी म्हणावं, अशी या अखिल भारतीय सेनेच्या कार्यकर्त्यांची इच्छा होती. शिवाय भाजप आमदार नारायण कुचे यांच्यासाठी आक्षेपार्ह शब्दही वापरण्यात आला.

गुंड अरुण गवळीचा पक्ष अखिल भारतीय सेना यावेळी लोकसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे त्यांनीही मोर्चेबांधणी केली आहे. अखिल भारतीय सेनेच्या नंदा पवार यांनी भाजप आमदार नारायण कुचे यांच्यासाठी आक्षेपार्ह शब्द वापरला. यानंतर भाजपचे कार्यकर्तेही चिडले आणि खुर्च्यांची फेकाफेक सुरु झाली.

या अगोदर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनीही राडा केला आणि टीव्ही 9 मराठीचा कार्यक्रम उधळून लावण्याचा प्रयत्न केला. शिवाय टीव्ही 9 मराठीचे प्रतिनिधी विलास आठवले यांना धक्काबुक्कीही केली. जालन्यातील राजकीय संस्कृतीचं दर्शनही यानिमित्ताने झालं.

काँग्रेसचा आक्षेप काय होता?

टीव्ही 9 मराठीच्या कार्यक्रमात विविध पक्षाच्या नेत्यांना चर्चेसाठी बोलावलं होतं. काँग्रेसकडून जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख हे चर्चेसाठी उपस्थित होते. पण यानंतर काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंटेल हे अचानक आले आणि व्यासपीठावर येऊन खुर्चीवर बसले. यानंतर देशमुख गटाचे कार्यकर्ते नाराज झाले आणि त्यांना गोंधळ सुरु केला. या गोंधळानंतर कार्यक्रम उधळून लावण्याचाही प्रयत्न करण्यात आला.

लालकिल्ला एक्स्प्रेस तुमच्या जिल्ह्यात

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर टीव्ही 9 मराठीची लालकिल्ला एक्स्प्रेस राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघांचा दौरा करत आहे. याचाच भाग म्हणून जालन्यातही कार्यक्रम घेण्यात आला. जालन्यानंतर लालकिल्ला एक्स्प्रेस औरंगाबादला जाणार आहे. या कार्यक्रमात विविध पक्षातील नेते आणि जनतेच्या भावना जाणून घेतल्या जात आहेत. शिवाय जनतेसाठी या नेत्यांचं व्हिजन काय आहे, जनतेच्या अपेक्षा काय आहेत त्याची चर्चा या कार्यक्रमांमध्ये केली जाते. टीव्ही 9 मराठीवर दररोज रात्री 8.30 वाजता हा कार्यक्रम लाईव्ह दाखवला जातो.

Non Stop LIVE Update

Related Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI