काँग्रेसचा शोध संपला, पृथ्वीराज चव्हाणांना पुण्यातून लोकसभेची उमेदवारी?

पुणे : युती-आघाडीच्या बैठकांचे सत्र सध्या जोरात सुरू आहेत. जागा वाटपाकडे सर्वच नेत्यांचे लक्ष लागून आहे. विशेष म्हणजे पुण्याची जागा सर्व पक्षांसाठी लक्षवेधी असणार आहे. त्यामुळे काँग्रेसकडून या जागेवर स्वच्छ प्रतिमेचा चेहरा असणारे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाची चर्चा आहे. मात्र स्थानिक पदाधिकारी पक्षाचा आदेश किती मानणार हे महत्त्वाचं आहे. राज्यासह देशाचे खरं तर […]

काँग्रेसचा शोध संपला, पृथ्वीराज चव्हाणांना पुण्यातून लोकसभेची उमेदवारी?
सचिन पाटील

| Edited By:

Jul 05, 2019 | 4:32 PM

पुणे : युती-आघाडीच्या बैठकांचे सत्र सध्या जोरात सुरू आहेत. जागा वाटपाकडे सर्वच नेत्यांचे लक्ष लागून आहे. विशेष म्हणजे पुण्याची जागा सर्व पक्षांसाठी लक्षवेधी असणार आहे. त्यामुळे काँग्रेसकडून या जागेवर स्वच्छ प्रतिमेचा चेहरा असणारे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाची चर्चा आहे. मात्र स्थानिक पदाधिकारी पक्षाचा आदेश किती मानणार हे महत्त्वाचं आहे.

राज्यासह देशाचे खरं तर पुण्याच्या जागेकडे लक्ष लागलं आहे. कारण पुण्यातूनच सर्वच पक्षांना राजकीय संदेश द्यायचा आहे. त्यामुळे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना उमेदवारी देऊन काँग्रेस मोठी राजकीय खेळी करण्याचा प्लॅन करत आहे. मात्र चव्हाण यांच्या उमेदवारीला स्थनिक काँग्रेस पदाधिकारी किती सहकार्य करतील हा महत्त्वाचा प्रश्न आहे. शिवाय विरोधक आयात उमेदवारीचा मुद्दा लावून धरणार हे निश्चित आहे.

दुसरीकडे भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडेही काँग्रेसकडून इच्छुक आहेत. मात्र काकडेंपेक्षा चव्हाण काँग्रेससाठी नक्कीच उजवे ठरतील यात शंका नाही, असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे. मात्र पृथ्वीराज चव्हाण असं काही राजकीय धाडस करतील का याबाबत राजकीय वर्तुळात साशंकता आहे. संजय काकडे उमेदवारी मिळावी यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याचं बोललं जातंय.

काँग्रेसची काही नावं जवळपास निश्चित

सोलापूर – सुशीलकुमार शिंदे यांचं नाव जिल्हा कमिटीने दिलंय.

यवतमाळ वाशिम – माणिकराव ठाकरे यांच्या नावाची शिफारस

वर्धा – चारूलत्ता टोंकस

दक्षिण मुंबई – मिलींद देवरा

काही मतदारसंघात जिल्हा काँग्रेस कमिटीने जास्त नावं दिली असून त्याचा निर्णय दिल्लीत घेतला जाईल, असं अशोक चव्हाण म्हणाले.

नागपूर – विलास मुत्तेमवार किंवा नाना पटोले

चंद्रपूर – देवतळे किंवा आशिष देशमुख

शिर्डी – भाऊसाहेब कांबळे, राजू वाघमारे

नंदुरबार – के सी पाडवी

नागपूर – गुडदे पाटील यांच्या नावावर चर्चा

(प्रत्येक लोकसभा मतदारसंघातील आढावा पाहण्यासाठी संबंधित जिल्ह्याच्या नावावर क्लिक करा)

संबंधित बातम्या

राहुल शेवाळे आणि अरविंद सावंत यांच्याविरोधात काँग्रेस उमेदवार ठरले  

भाजपच्या गोपाळ शेट्टींविरोधात निरुपमांची माघार, दुसऱ्या मतदारसंघाच्या शोधात 

दक्षिण मध्य मुंबई लोकसभा : शिवसेनेसाठी रामदास आठवले डोकेदुखी ठरणार!   

दक्षिण मुंबई लोकसभा : भाजपच्या मदतीशिवाय शिवसेना जागा राखणार?  

लोकसभेसाठी काँग्रेसच्या 9 उमेदवारांची नावं ठरली  

मुंबई उत्तर मध्य लोकसभा : युती न झाल्यास पूनम महाजनांना मोठा फटका 

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें