भिवंडीत चार लाखंच्या खंडणी प्रकरणी काँग्रेस नगरसेवकाला अटक

भिवंडीत चार लाखंच्या खंडणी प्रकरणी काँग्रेस नगरसेवकाला अटक

ठाणे : भिवंडी महानगरपालिकेतील काँग्रेस सभागृह नेता मतलुब अफजल सरदार यांना चार लाखांच्या खंडणीप्रकरणी शांतीनगर पोलिसांनी अटक केली आहे. या वृत्ताने शहरात एकच खळबळ उडाली आहे. मतलुब अफजल हे गेले वीस वर्षापासून भिवंडी महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. खंडणीप्रकरणी मतलुब यांना अटक केली असून पोलिस याचा अधिक तपास करत आहेत.

काँग्रेस नगरसेवक मतलुब अफजल सरदार यांनी भिंवडी येथील अनधिकृत इमारत नुरी अपार्टमेंट अधिकृत करण्यासाठी बिल्डरकडे पाच लाख रुपयांची मागणी केली. यावेळी पाच लाखांच्या बदली चार लाख रुपये देण्याचे ठरले. यानंतर मतलुब अफजल यांनी पैशांच्या मागणीसाठी बिल्डर सलिम अब्दुल हफिज अन्सारीकडे पैसे मागण्यासाठी तगादा लावला.

नगरसेवक मतलुब यांनी दोन टप्प्यात पैसे घेतल्यानंतर उरलेल्या पैशासाठी बिल्डरकडे सतत पैशांची मागणी केली जात होती.  मात्र वैतागलेल्या बिल्डरने पैसे दिल्यावर मोबाईलवरील संभाषणाची ऑडीओ क्लिपचा पुरावा पोलिसांकडे सादर करत नगरसेवक मतलुब यांच्याविरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

बिल्डरच्या तक्रारीनंतर पोलिसांनी सभागृह नेता मतलुब अफझल यांच्याविरोधात खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली. या बातमीनंतर शहरातील लोकप्रतिनिधी आणि काँग्रेसच्या गोटात खळबळ उडाली आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI