काँग्रेसचा आणि ‘त्या’ हॅकरचा संबंध नाही : कपिल सिब्बल

मुंबई : सईद शुजा नावाच्या सायबर एक्स्पर्टने लंडनमध्ये पत्रकार परिषद घेऊन भारतातील 2014 ची निवडणूक ईव्हीएममध्ये छेडछाड करुन जिंकली असल्याचा दावा केलाय. यामुळे भारतातील राजकारण तापलंय. काँग्रेस नेते कपिल सिब्बल या पत्रकार परिषदेला उपस्थित असल्यामुळे भाजपने काँग्रेसवर देशाविरोधात षडयंत्र रचल्याचा आरोप केलाय. पण काँग्रेस आणि सईद शुजा या हॅकरचा संबंध नसल्याचं स्पष्टीकरण कपिल सिब्बल यांनी […]

काँग्रेसचा आणि 'त्या' हॅकरचा संबंध नाही : कपिल सिब्बल
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:35 PM

मुंबई : सईद शुजा नावाच्या सायबर एक्स्पर्टने लंडनमध्ये पत्रकार परिषद घेऊन भारतातील 2014 ची निवडणूक ईव्हीएममध्ये छेडछाड करुन जिंकली असल्याचा दावा केलाय. यामुळे भारतातील राजकारण तापलंय. काँग्रेस नेते कपिल सिब्बल या पत्रकार परिषदेला उपस्थित असल्यामुळे भाजपने काँग्रेसवर देशाविरोधात षडयंत्र रचल्याचा आरोप केलाय. पण काँग्रेस आणि सईद शुजा या हॅकरचा संबंध नसल्याचं स्पष्टीकरण कपिल सिब्बल यांनी पत्रकार परिषद घेऊन दिलंय.

लंडनमधील कार्यक्रमासाठी भारतीय पत्रकार संघटनेचे अध्यक्ष आशिष रे यांनी मला निमंत्रण दिलंय होतं. ते मला वैयक्तिकरित्या ओळखतात त्यामुळे त्यांनी मला मेलही केला होता. फक्त मलाच नाही, इतर पक्षांचे प्रतिनिधी आणि निवडणूक आयोगालाही या कार्यक्रमाचं निमंत्रण होतं. मी एका कामासाठी लंडनला जाणारच होतो, तर त्या कार्यक्रमालाही उपस्थित राहिलो, असं कपिल सिब्बल यांनी म्हटलंय.

रवीशंकर प्रसाद यांचा हल्लाबोल

कपिल सिब्बल यांची उपस्थिती काँग्रेसला अडचणीत आणण्याची शक्यता आहे. कारण, कपिल सिब्बल यांनी ज्या व्यक्तीचं नाव सांगितलंय, ती व्यक्ती काँग्रेसचं वृत्तपत्र नॅशनल हेराल्डमध्ये लेखक आहे. “नॅशनल हेराल्ड पुरस्कृत पत्रकार परिषद झाली. लंडनमधील हॅकरचा दावा राजकीय हेतूने प्रेरित होता. पत्रकार परिषद आयोजित करणारे आशिष रे हे राहुल गांधी यांना लंडनमध्ये भेटलेले. सोशल मीडियावर भाजपविरोधी कॅम्पेन आशिष रे चालवतात. पत्रकार परिषदेचं पूर्ण आयोजन काँग्रेसकडून आयोजित करण्यात आलं होतं.”, असा आरोप रवीशंकर प्रसाद यांनी केला.

निवडणूक आयोगाकडून गुन्हा दाखल करण्याचे आदेश

भारतीय निवडणूक आयोगाने दिल्ली पोलिसांना पत्र लिहून संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. ईव्हीएमशी छेडछाड केल्याचा आरोप करणाऱ्या सईद शुजाची सखोल चौकशी करण्यात यावी आणि गुन्हा दाखल करावा, असे निवडणूक आयोगाने पोलिसांना पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे.

Non Stop LIVE Update
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.