अमृता फडणवीसांच्या गाण्याचा आशय सुंदर; काँग्रेसच्या यशोमती ठाकूरांकडून कौतुक

अमृता फडणवीसांच्या गाण्याचा आशय सुंदर; काँग्रेसच्या यशोमती ठाकूरांकडून कौतुक

सध्या विविध कारणांमुळे अमृता फडणवीस यांचे गाणे व्हायरल होत आहे. | Amruta Fadnavis

Rohit Dhamnaskar

| Edited By: Team Veegam

Jan 16, 2021 | 3:27 PM

मुंबई: सध्या सोशल मीडियावर गाजत असलेल्या अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांच्या ‘तिला जगू दे’ या गाण्याचे काँग्रेसच्या नेत्या आणि मंत्री यशोमती ठाकूर यांनी कौतुक केले आहे. सध्या विविध कारणांमुळे अमृता फडणवीस यांचे गाणे व्हायरल होत आहे. गाण्याचा आशय छान आहे. मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी जनजागृती महत्वाची आहे. त्यासाठी माझ्या शुभेच्छा, असे यशोमती ठाकूर यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे. (Amruta Fadnavis new song Tila Jagu Dya)

अमृता फडणवीस यांचे गायनकौशल्य संपूर्ण राज्याला परिचित आहे. यापूर्वीही त्यांची अनेक गाणी सोशल मीडियावर हिट ठरली आहेत. अमृता फडणवीस भाऊबीजेनिमित्त एक नवे गाणे रिलीज केले होते. ‘तिला जगू द्या’ या गाण्याचा एक व्हिडीओ अमृता यांनी आपल्या सोशल नेटवर्किंग अकाऊंटवरुन पोस्ट केला होता. या व्हिडीओला दोन दिवसांमध्ये दहा लाख व्ह्यूज मिळाले होते. अमृता यांनी या गाण्याला दिलेल्या प्रतिसादाबद्दल चाहत्यांचे आभार मानले असून लवकरच मी नवीन कलाकृती घेऊन येईन असंही म्हटले होते.

सध्या विविध कारणांमुळे अमृता फडणवीस यांचं हे गाणं व्हायरल आहे. गाण्याचा आशय छान आहे. मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी जनजागृती महत्वाची आहे. माझ्या शुभेच्छा !!

Posted by Adv. Yashomati Thakur on Thursday, 19 November 2020

‘तिला जगू द्या’ या गाण्याच्या माध्यमातून स्त्री शिक्षण आणि सबलीकरणाचा संदेश देण्यात आला आहे. यामध्ये अमृता फडणवीस यांनी त्यांचा आणि त्यांच्या मुलीचाही फोटो वापरण्यात आला आहे.

‘नॉटी’ पुरुषांची घाण समाजातून ‘फ्लश’ करु, पुरुष दिन आणि टॉयलेट डेनिमित्त अमृता फडणवीसांच्या भन्नाट शुभेच्छा

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी पुन्हा एकदा शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांना डिवचले आहे. अमृता फडणवीस यांनी गुरुवारी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून #InternationalMensDay2020 आणि #WorldToiletDay2020 निमित्त एक मेसेज केला. यामध्ये अमृता फडणवीस यांनी संजय राऊतांना त्यांच्याच एका आक्षेपार्ह वक्तव्यावरुन अप्रत्यक्षपणे लक्ष्य केले.

आज आंतरराष्ट्रीय पुरूष दिवस आहे आणि जागतिक शौचालय दिनही आहे. यानिमित्ताने मी देशातील सर्व राष्ट्रभक्त पुरुषांना एक सर्वसामान्य स्त्री म्हणून आवाहन करते की, आपण सगळ्यांनी एकत्र येऊन वाईट विचारांच्या काही मोजक्या ‘नॉटी’ पुरूषांच्या आचार विचारांची घाण फ्लश करून महाराष्ट्र स्वच्छ करण्यासाठी मदत करावी, असे अमृता फडणवीस यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्याचा रोख संजय राऊत यांच्या दिशेने असल्याची चर्चा आहे.

संबंधित बातम्या:

VIDEO : तिला जगू द्या… अमृता फडणवीसांचं नवं गाणं रिलीज

‘नॉटी’ पुरुषांची घाण समाजातून ‘फ्लश’ करु, पुरुष दिन आणि टॉयलेट डेनिमित्त अमृता फडणवीसांच्या भन्नाट शुभेच्छा

शिवसेनेचा ‘शवसेना’ उल्लेख, अमृता फडणवीसांचा पुन्हा बोचरा वार, बिहार योग्य ठिकाणी नेऊन ठेवल्याबद्दल आभार

(Amruta Fadnavis new song Tila Jagu Dya)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें