AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देशाचं विभाजन करण्यातून वेळ मिळाला तर वाचा, काँग्रेसकडून मोदींसाठी संविधानाची प्रत ऑर्डर

काँग्रेसने देशाच्या 71 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी भारतीय संविधानाची प्रत ऑर्डर केली आहे (Congress order Indian Constitution for PM Modi).

देशाचं विभाजन करण्यातून वेळ मिळाला तर वाचा, काँग्रेसकडून मोदींसाठी संविधानाची प्रत ऑर्डर
| Updated on: Jan 26, 2020 | 11:20 PM
Share

नवी दिल्ली : काँग्रेसने देशाच्या 71 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी भारतीय संविधानाची प्रत ऑर्डर केली आहे (Congress order Indian Constitution for PM Modi). देशाचं विभाजन करण्यातून वेळ मिळाला, तर संविधानही वाचा, असा उपरोधात्मक सल्लाही काँग्रेसनं मोदींना दिला. विशेष म्हणजे काँग्रेसने अॅमेझॉनवर संविधानाची ऑर्डर करताना चक्क ‘पे ऑन डिलिव्हरी’चा पर्याय निवडला. त्यामुळे संविधान मिळाल्यावर याचं पेमेंटही मोदींनाच करावं लागणार आहे (Congress order Indian Constitution for PM Modi).

काँग्रेसने रविवारी (26 जानेवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी संविधानाची प्रत ऑर्डर केली. काँग्रसच्या सोशल मीडिया विभागाचे प्रमुख रोहन गुप्ता यांनी ‘अॅमेझॉन’वरुन पंतप्रधानांसाठी संविधानाची प्रत ऑर्डर केली. याची किंमत 170 रुपये आहे. ही प्रत केंद्रीय सचिवालयाच्या पत्त्यावर पाठवण्यात आली आहे.

काँग्रेसने पंतप्रधान मोदींना संविधानाची प्रत पाठवल्याची पावतीही ट्विट केली आहे. या ट्विटमध्ये म्हटलं आहे, ‘प्रिय पंतप्रधान, तुमच्यापर्यंत लवकरच संविधान पोहचेल. तुम्हाला देशाचं विभाजन करण्यातून वेळ मिळाला तर कृपया ते वाचा.’

काँग्रेसने नागरिकत्व सुधारणा कायद्यावरुन (CAA) भाजपवर निशाणा साधला आहे. काँग्रेसने म्हटलं, ‘भारतीय संविधान कलम 14 नुसार सर्व नागरिकांना कायद्यासमोर समानता देते. सीएएमध्ये मात्र कायद्यासमोर सर्व समान या मुल्याचं उल्लंघन झालं आहे.’ काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी, महासचिव प्रियंका गांधी, मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला आणि अनेक इतर नेत्यांनी प्रजासत्ताक दिनाच्या देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत.

घरी आदानी येऊन गेले म्हणून पापं झाकायची का? राज ठाकरे यांचे थेट प्रत्य
घरी आदानी येऊन गेले म्हणून पापं झाकायची का? राज ठाकरे यांचे थेट प्रत्य.
तुम्ही म्हणजे मुंबई, महाराष्ट्र नाही... फडणवीस यांचा ठाकरेंवर घणाघात
तुम्ही म्हणजे मुंबई, महाराष्ट्र नाही... फडणवीस यांचा ठाकरेंवर घणाघात.
शिंदेंच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरे यांचं वादळी भाषण
शिंदेंच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरे यांचं वादळी भाषण.
पुढच्या 5 वर्षाचा प्लान सांगत शिवतीर्थावरून शिंदेंचा विरोधकांवर निशाणा
पुढच्या 5 वर्षाचा प्लान सांगत शिवतीर्थावरून शिंदेंचा विरोधकांवर निशाणा.
...त्यांना तिथेच ठोका आणि मारा, मतदारांना राज ठाकरेंचं भरसभेतून आवाहन
...त्यांना तिथेच ठोका आणि मारा, मतदारांना राज ठाकरेंचं भरसभेतून आवाहन.
राज ठाकरेंनी ५ कोटींची ऑफर नाकारणाऱ्या राजश्री नाईक यांचा केला सन्मान
राज ठाकरेंनी ५ कोटींची ऑफर नाकारणाऱ्या राजश्री नाईक यांचा केला सन्मान.
जगणं झालं छान कारण चोरला आमचा धनुष्यबाण, राऊतांची सत्ताधाऱ्यांवर टीका
जगणं झालं छान कारण चोरला आमचा धनुष्यबाण, राऊतांची सत्ताधाऱ्यांवर टीका.
अण्णामलाईंची मुक्तापळं अन् ठाकरे बंधूंनी सुनावलं, तर राऊतांनी औकात....
अण्णामलाईंची मुक्तापळं अन् ठाकरे बंधूंनी सुनावलं, तर राऊतांनी औकात.....
काल आदानींच साम्राज्य दाखवून भाजपवर टीका,आज राज ठाकरेंचा तो फोटो बाहेर
काल आदानींच साम्राज्य दाखवून भाजपवर टीका,आज राज ठाकरेंचा तो फोटो बाहेर.
ठाकरेंना अदानी नव्हे तर... राज ठाकरे यांना नितेश राणेंचं प्रत्युत्तर
ठाकरेंना अदानी नव्हे तर... राज ठाकरे यांना नितेश राणेंचं प्रत्युत्तर.