WPL 2026, RCB vs UPW : आरसीबीचा सलग दुसरा विजय, यूपीचा 9 विकेट्सने धुव्वा, मुंबईला झटका
Royal Challengers Bengaluru vs UP Warriorz Women Match Result : आरसीबीने स्मृती मंधाना हीच्या नेतृत्वात वूमन्स प्रीमियर लीग स्पर्धेच्या चौथ्या हंगामात विजयी घोडदौड कायम ठेवत सलग दुसरा सामना जिंकला आहे.

स्मृती मंधाना हीच्या नेतृत्वात वूमन्स प्रीमियर लीग स्पर्धेतील चौथ्या मोसमात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने सलग दुसरा विजय मिळवला आहे. आरसीबीने मोसमातील पाचव्या आणि आपल्या दुसऱ्या सामन्यात यूपी वॉरियर्सचा 9 विकेट्सने धुव्वा उडवला आहे. यूपीने नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियममध्ये आरसीबीसमोर 144 धावांचं आव्हान ठेवलं होतं. आरसीबीने हे आव्हान 47 बॉलआधी 1 विकेट गमावून पूर्ण केलं. आरसीबीने 12.1 ओव्हरमध्ये 145 धावा केल्या. आरसीबीने अशाप्रकारे सहज हा सामना जिंकला. तर युपीचा हा सलग आणि एकूण दुसरा पराभव ठरला. तसेच आरसीबीने या विजयासह पॉइंट्स टेबलमध्ये मोठी झेप घेतली.
सलामी जोडीची शतकी आणि भक्कम भागीदारी
स्मती मंधाना आणि ग्रेस हॅरीस या सलामी जोडीनेच आरसीबीचा विजय जवळपास निश्चित केला. या दोघींनी पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. आरसीबीला हा सामना 10 विकेट्सने जिंकण्याची संधी होती. मात्र सामना अखेरच्या टप्प्यात असताना यूपीला ही जोडी फोडण्यात यश आलं. यूपीने आरसीबीला विजयासाठी 7 धावांची गरज असताना पहिला झटका दिला. शिखा पांडे हीने ग्रेस हॅरीस हीला आऊट केलं. ग्रेस आऊट झाल्याने सलामी जोडी फुटली. ग्रेस आणि स्मृतीने पहिल्या विकेटसाठी 70 बॉलमध्ये 137 रन्सची पार्टनरशीप केली. ग्रेसने 40 बॉलमध्ये 85 रन्स केल्या. ग्रेसने या खेळीत 5 षटकार आणि 10 चौकार लगावले.
आरसीबाचा सलग दुसरा विजय
ग्रेसनंतर ऋचा घोष मैदानात आली. स्मृती आणि ऋचा या जोडीने उर्वरित धावा पूर्ण करुन आरसीबाला सलग दुसरा सामना जिंकून दिला. ऋचाने नाबाद 4 धावा केल्या. तर स्मृती अर्धशतकापासून काही धावांनी दूर राहिली. स्मृतीने 32 बॉलमध्ये 9 फोरसह नॉट आऊट 47 रन्स केल्या.
त्याआधी टॉस गमावून बॅटिंगसाठी आलेल्या यूपी वॉरियर्झ टीमच्या टॉप ऑर्डरने आरसीबीच्य गोलंदाजांसमोर गुडघे टेकले. आरसीबीच्या गोलंदाजांनी यूपीला ठराविक अंतराने झटके दिले. त्यामुळे यूपीच्या 100 धावा होतील की नाही? अशी स्थिती होती. मात्र अखेरच्या क्षणी दीप्ती शर्मा आणि डीएन्ड्रा डॉटीन या जोडीने किल्ला लढवला. या दोघींनी 40 पेक्षा अधिक धावा केल्या. त्यामुळे युपीला 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 143 धावांपर्यंत पोहचता आलं. दीप्तीने सर्वाधिक आणि नाबाद 45 धावांची खेळी केली. तर डीएन्ड्राने नॉट आऊट 40 रन्स केल्या. आरसीबीसाठी श्रेयांका पाटील आणि नॅडीन डी क्लर्क या दोघींनी प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या.
आरसीबीचा दणदणीत विजय
Dominant! ❤️@RCBTweets go 🔝 of the #TATAWPL 2026 points table with a clinical 9⃣-wicket victory 👏
Scorecard ▶️ https://t.co/U1cgf01ys0 #KhelEmotionKa | #RCBvUPW pic.twitter.com/kjOFG7pjiJ
— Women’s Premier League (WPL) (@wplt20) January 12, 2026
आरसीबी पहिल्या स्थानी
दरम्यान आरसीबीने या विजयासह पॉइंट्स टेबलमध्ये मोठी झेप घेतली आहे. आरसीबीने तिसऱ्या स्थानावरुन पहिल्या स्थानी उडी घेतली. आरसीबीने गुजरात जायंट्स आणि मुंबई इंडियन्सला मागे टाकलं.
