AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! शिवसेनेचा धाडसी निर्णय, बड्या नेत्याची पक्षातून हकालपट्टी; राजकीय घडामोडींना वेग

Shiv Sena : महानगरपालिका निवडणुकीला अवघे दोन दिवस शिल्लक असतानाच शिवसेनेने धाडसी निर्णय घेतला आहे. एका बड्या नेत्याची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

मोठी बातमी! शिवसेनेचा धाडसी निर्णय, बड्या नेत्याची पक्षातून हकालपट्टी; राजकीय घडामोडींना वेग
Shiv SenaImage Credit source: Google
| Updated on: Jan 12, 2026 | 11:07 PM
Share

राज्यातील 29 महानगर पालिकांच्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. कल्याण–डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीला अवघे दोन दिवस शिल्लक असतानाच पॅनल क्रमांक 18 मध्ये मोठा राजकीय वाद उफाळून आला आहे. महायुतीच्या अधिकृत पॅम्प्लेटमध्ये खोडसाळपणा करून बनावट पॅम्प्लेट सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा आरोप करण्यात एका नेत्यावर करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे मतदारांसह कार्यकर्ते आणि उमेदवारांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे. या गंभीर प्रकरणानंतर शिवसेना शिंदे गटाचे उपशहरप्रमुख तथा परिवार सभापती मनोज चौधरी यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे.

बनावट पॅम्प्लेटमुळे वाद

कल्याण–डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा वेग आला आहे. पॅनल क्रमांक 18 मध्ये भाजपची एक जागा बिनविरोध निवडून आली असून उर्वरित तीन जागांसाठी निवडणूक होत आहे. यामध्ये दोन शिवसेना आणि एक भाजपचा उमेदवार रिंगणात आहे. दरम्यान, नेतीवली परिसरात सोशल मीडियावर एक बनावट पॅम्प्लेट मोठ्या प्रमाणात व्हायरल झालं आहे. या पॅम्प्लेटवर दोन धनुष्यबाण आणि एक कपाट अशी निवडणूक चिन्ह दाखवण्यात आली आहेत. विशेष म्हणजे भाजपचे अधिकृत उमेदवार स्नेहल मोरे यांच्या जागी कमळाऐवजी शिवसेना बंडखोर अपक्ष उमेदवार प्रीती मनोज चौधरी यांचं कपाट चिन्ह दाखवण्यात आलं आहे, तर “आमचं ठरलंय” असा मजकूर टाकण्यात आला आहे.

या बनावट पॅम्प्लेटमुळे मतदारांमध्येच नाही तर भाजप–शिवसेना महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्येही संभ्रम आणि तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. या प्रकरणावर महायुतीच्या उमेदवारांनी तातडीने पत्रकार परिषद घेत तीव्र प्रतिक्रिया दिली. भाजपचे निवडणूक प्रमुख नरेंद्र सूर्यवंशी, शिवसेना उमेदवार मल्लेश शेट्टी, नवीन गवळी आणि भाजप उमेदवार स्नेहल मोरे यांनी संयुक्तपणे आरोप केला की, पराभवाच्या भीतीतूनच हा खोडसाळपणा करण्यात आला आहे. महायुती मजबूत असून अशा प्रकारांमुळे दिशाभूल होणार नाही, असं स्पष्ट करत दोषींविरोधात निवडणूक आयोग आणि पोलिसांकडे तक्रार दाखल करण्याचा इशाराही त्यांनी दिला.

मनोज चौधरी यांची पक्षातून हकालपट्टी

या संपूर्ण प्रकरणानंतर शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडून मनोज चौधरी यांची पक्षविरोधी कारवाया आणि आदेश न पाळल्याच्या कारणावरून शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. दरम्यान, मनोज चौधरी आणि अपक्ष उमेदवार प्रीती मनोज चौधरी यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. आपण किंवा आपल्या समर्थकांनी कोणत्याही प्रकारचे बनावट पॅम्प्लेट तयार केले नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. आपल्या प्रचार रॅलीला मिळालेल्या मोठ्या प्रतिसादामुळे विरोधक घाबरले असून त्यामुळेच आपल्यावर बिनबुडाचे आरोप केले जात असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी निवडणूक अधिकारी आणि पोलिसांमार्फत व्हावी, अशी मागणीही प्रीती आणि मनोज चौधरी यांनी केली आहे.एकूणच, मतदानाच्या तोंडावर पॅनल 18 मध्ये घडलेल्या या प्रकारामुळे राजकीय वातावरण तापलं असून निवडणूक आयोग आणि पोलिसांची पुढील कारवाई काय होते, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.

तुम्ही म्हणजे मुंबई, महाराष्ट्र नाही... फडणवीस यांचा ठाकरेंवर घणाघात
तुम्ही म्हणजे मुंबई, महाराष्ट्र नाही... फडणवीस यांचा ठाकरेंवर घणाघात.
शिंदेंच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरे यांचं वादळी भाषण
शिंदेंच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरे यांचं वादळी भाषण.
पुढच्या 5 वर्षाचा प्लान सांगत शिवतीर्थावरून शिंदेंचा विरोधकांवर निशाणा
पुढच्या 5 वर्षाचा प्लान सांगत शिवतीर्थावरून शिंदेंचा विरोधकांवर निशाणा.
...त्यांना तिथेच ठोका आणि मारा, मतदारांना राज ठाकरेंचं भरसभेतून आवाहन
...त्यांना तिथेच ठोका आणि मारा, मतदारांना राज ठाकरेंचं भरसभेतून आवाहन.
राज ठाकरेंनी ५ कोटींची ऑफर नाकारणाऱ्या राजश्री नाईक यांचा केला सन्मान
राज ठाकरेंनी ५ कोटींची ऑफर नाकारणाऱ्या राजश्री नाईक यांचा केला सन्मान.
जगणं झालं छान कारण चोरला आमचा धनुष्यबाण, राऊतांची सत्ताधाऱ्यांवर टीका
जगणं झालं छान कारण चोरला आमचा धनुष्यबाण, राऊतांची सत्ताधाऱ्यांवर टीका.
अण्णामलाईंची मुक्तापळं अन् ठाकरे बंधूंनी सुनावलं, तर राऊतांनी औकात....
अण्णामलाईंची मुक्तापळं अन् ठाकरे बंधूंनी सुनावलं, तर राऊतांनी औकात.....
काल आदानींच साम्राज्य दाखवून भाजपवर टीका,आज राज ठाकरेंचा तो फोटो बाहेर
काल आदानींच साम्राज्य दाखवून भाजपवर टीका,आज राज ठाकरेंचा तो फोटो बाहेर.
ठाकरेंना अदानी नव्हे तर... राज ठाकरे यांना नितेश राणेंचं प्रत्युत्तर
ठाकरेंना अदानी नव्हे तर... राज ठाकरे यांना नितेश राणेंचं प्रत्युत्तर.
संघर्ष मराठीचा की ठाकरेंच्या अस्तित्वाचा? ठाकरे बंधूंवर फडणवीसाची टीका
संघर्ष मराठीचा की ठाकरेंच्या अस्तित्वाचा? ठाकरे बंधूंवर फडणवीसाची टीका.