AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कंत्राटदाराचा टेंडरवरुन वाद, खुन्नस काढण्यासाठी अधिकाऱ्याच्या हत्येची सुपारी, वर्ध्यातील धक्कादायक घटना

कंत्राटावरुन वाद झाला म्हणून एका कंत्राटदाराने वर्धा पंचायत समितीचे विस्तार अधिकारी हेमंत देवतळे यांच्या हत्येची सुपारी दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली (Contractor plotted to kill officer in Wardha).

कंत्राटदाराचा टेंडरवरुन वाद, खुन्नस काढण्यासाठी अधिकाऱ्याच्या हत्येची सुपारी, वर्ध्यातील धक्कादायक घटना
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Aug 01, 2020 | 10:32 PM
Share

वर्धा : कंत्राटावरुन वाद झाला म्हणून एका कंत्राटदाराने वर्धा पंचायत समितीचे विस्तार अधिकारी हेमंत देवतळे यांच्या हत्येची सुपारी दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली. विस्तार अधिकाऱ्याला जीवे मारण्याची सुपारी देणाऱ्या कंत्राटदाराचं नाव अमोल वनकर असं आहे. दीड महिन्यांपूर्वी एका नराधमाने देवतळे यांच्यावर चाकू हल्ला केला होता. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. या हल्ल्याच्या मुख्य आरोपीस जेरबंद करण्यात पोलिसांना अखेर यश आलं आहे (Contractor plotted to kill officer in Wardha).

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना करण्यासाठी वर्धा पंचायत समितीचे विस्तार अधिकारी हेमंत देवतळे यांच्यावर अनेक जबाबदाऱ्या आहेत. कोव्हिड सेंटरवर बेडशीट, सॅनिटायझर, मास्क तसेच इतरही साहित्य पुरवठा तसेच इतर कामांसाठी कंत्राटदारांना टेंडर दिलं जातं. याबाबत कंत्राटदारांना टेंडर देण्याची जबाबदारी हेमंत देवतळे यांची आहे (Contractor plotted to kill officer in Wardha).

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर 

दरम्यान, एका टेंडरवरुन हेमंत देवतळे यांचा कंत्राटदार अमोल वनकर आणि त्याच्या सहकाऱ्यांसोबत वाद झाला. टेंडर प्रक्रियेत अडसर ठरणाऱ्या अधिकाऱ्याला भीती दाखवत शांत करण्याच्या उद्देशाने अमोल वनकरने मित्र तारीख शेखसोबत देवतळे यांच्यावर चाकू हल्ला घडवून आणला. यासाठी तारीख शेखने कुणाल इखार या इसमाला 40 हजारांची सुपारी दिली.

हल्लेखोर कुणाल इखारला रिक्षा घेण्यासाठी पैशांची गरज होती. त्यासाठी त्याने तारीख शेखकडे पैशांची मदत मागितली. त्याचवेळी अमोल वनकर आणि शेख विस्तार अधिकाऱ्याविरोधात कट रचत होते. तारीख शेखने विस्तार अधिकारी हेमंत देवतळे यांच्यावर चाकू हल्ला केल्यास 40 हजार देऊ, असं कुणाला इखारेला सांगितलं. त्यासाठी कुणाला इखार तयार झाला, असं पोलीस तपासात उघड झालं आहे.

कुणाला इखारने ठरल्याप्रमाणे अधिकारी हेमंत देवतळे यांच्या घरी जाऊन चाकू हल्ला केला. याप्रकरणाचा तपास पोलीस गेल्या दीड महिन्यांपासून करत होते. अखेर या तपासाला यश आलं. पोलिसांनी कुणाल इखार, तारीख शेख आणि कंत्राटदार अमोल वनकरला अटक केली आहे. याप्रकरणाची सध्या वर्धा जिल्ह्यात चर्चा सुरु आहे.

Follow Us
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...