अभिनेत्री अंकिता लोखंडेच्या सोसायटीमध्ये ‘कोरोना’ग्रस्त, कॉम्प्लेक्स सील

कोरोनाचा संसर्ग झालेला व्यक्ती स्पेनवरुन परतली होती. काही दिवसानंतर 'कोरोना'ची लक्षणं जाणवू लागल्याने त्याची पुन्हा चाचणी करण्यात आली (Ankita Lokhande Society Corona Patient)

अभिनेत्री अंकिता लोखंडेच्या सोसायटीमध्ये 'कोरोना'ग्रस्त, कॉम्प्लेक्स सील

मुंबई : हिंदी मनोरंजन विश्वात स्वतःचा ठसा उमटवणारी मराठमोळी अभिनेत्री अंकिता लोखंडे हिच्या सोसायटीमध्ये ‘कोरोना’ग्रस्त व्यक्ती आढळली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून हा भाग सील करण्यात आला आहे. (Ankita Lokhande Society Corona Patient)

अंकिता ज्या कॉम्प्लेक्समध्ये राहते, तिथे राहणाऱ्या रहिवाशाची ‘कोरोना’ चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे निर्जंतुकीकरण करण्यासाठी आता या संपूर्ण कॉम्प्लेक्सलाच सील ठोकण्यात आलं आहे. या कॉम्प्लेक्समध्ये अंकिताप्रमाणेच मिश्कत वर्मा, अशिता धवन, नताशा शर्मा हे टीव्ही कलाकारही राहतात.

कोरोनाचा संसर्ग झालेला व्यक्ती स्पेनवरुन परतली होती. भारतात आल्यानंतर विमानतळावर त्यांची कोरोनाची चाचणी केली असता अहवाल निगेटिव्ह आला होता. मात्र काही दिवसानंतर त्याला ‘कोरोना’ची लक्षणं जाणवू लागली.

हेही वाचा : गायिका कनिका कपूरचा सहावा रिपोर्ट निगेटिव्ह

‘माझ्या विंगमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे सध्या तिला क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आलं आहे. मुंबई पोलिस आणि बीएमसीच्या सहकार्याबद्दल मनापासून आभार’ अशी प्रतिक्रिया अभिनेत्री अशिता धवनने दिली. (Ankita Lokhande Society Corona Patient)

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार अंकिताने घरात पणत्या आणि दिवे उजळवले होते. रात्री नऊ वाजता तिने नऊ मिनिटे घरातील लाईट बंद करुन दिवे लावले.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI