CORONA UPDATE | कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय!, केंद्रीय गृहमंत्रालयाकडून नवे दिशानिर्देश, राज्य सरकार काय निर्णय घेणार?

केंद्रीय गृहमंत्रालयाने कोविड-19च्या स्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी हे दिशानिर्देश जारी केले आहेत. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राबवल्या उपाययोजनांचं पालन आणि गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्यांना सांगितलं आहे. तसंच राज्य सरकार, केंद्रशासित प्रदेश स्थानिक परिस्थितीनुसार रात्री संचारबंदीसारखे नियम लागू करु शकतात, असंही केंद्रीय गृहमंत्रालयानं राज्यांना सूचित केलं आहे.

CORONA UPDATE | कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय!, केंद्रीय गृहमंत्रालयाकडून नवे दिशानिर्देश, राज्य सरकार काय निर्णय घेणार?
एकूणच, अभ्यासात समोर आलेल्या माहितीनुसार, 83 टक्के लोकांपैकी 81 टक्के लोकांमध्ये कोरोना झाल्यामुळे त्याचा परिणाम डोळ्यांवर झाल्याचं समोर आलं.
Follow us
| Updated on: Nov 25, 2020 | 5:24 PM

नवी दिल्ली: देशात पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढताना पाहायला मिळत आहेत. दिल्ली, महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात आदी राज्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयानं नवे दिशानिर्देश जारी करण्यात आले आहेत. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्यांना कठोर पाऊल उचलण्याचे निर्देशही केंद्रीय गृहमंत्रालयाकडून देण्यात आले आहेत. हे दिशानिर्देश 1 ते 31 डिसेंबरपर्यंत लागू असणार आहेत. (Guidelines to the States from the Union Home Ministry)

केंद्रीय गृहमंत्रालयाची नवे दिशानिर्देश

  • सार्वजनिक ठिकाणी मास्क बंधनकारक
  • सामाजिक अंतर राखणं गरजेचं
  • सतत हात धुणे आवश्यक
  • चित्रपटगृहात ५० टक्के प्रेक्षकांना परवानगी
  • जलतरण तलावात एकावेळी एकाच खेळाडूला परवानगी
  • धार्मिक कार्यक्रम, खेळ यासाठी मोकळ्या मैदानात 200 जणांना परवानगी
  • बंद मोठ्या सभागृहात 100 जणांना परवानगी

केंद्रीय गृहमंत्रालयाने कोविड-19च्या स्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी हे दिशानिर्देश जारी केले आहेत. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राबवल्या उपाययोजनांचं पालन आणि गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्यांना सांगितलं आहे. तसंच राज्य सरकार, केंद्रशासित प्रदेश स्थानिक परिस्थितीनुसार रात्री संचारबंदीसारखे नियम लागू करु शकतात, असंही केंद्रीय गृहमंत्रालयानं राज्यांना सूचित केलं आहे.

पंजाबमध्ये रात्री संचारबंदीचे आदेश

पंजाबमध्येही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचं संकट उभं राहिलं आहे. त्यामुळे अमरिंदर सिंग यांनी कडक धोरण अंवलंबण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार रात्रीच्यवेळी संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच हॉटेल, रेस्टॉरंट्स, बार रात्री 9.30 वाजेपर्यंतच सुरु ठेवता येणार आहेत. तर संचारबंदी रात्री 10 ते पहाटे 5 वाजेपर्यंत लागू राहणार आहे. दुसरीकडे मास्क न वापरणाऱ्यांकडून आता 500 रुपयांऐवजी 1000 रुपये दंडाची वसूली केली जाणार आहे.

राज्यातही कडक निर्बंध लागू होण्याची शक्यता

बिनधास्त राहण्याची प्रवृत्ती वाढत असल्यानं राज्यात पुन्हा निर्बंध लावणार असून, निर्बंध लावण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही इच्छा असल्याचं राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. लॉकडाऊन नसला तरी शिथिल केलेले निर्बंध पुन्हा लावण्यात येणार असल्याचं राजेश टोपे यांनी सांगितलं. सोशल डिस्टंसिंगचं पालन होत नसल्यानं राज्य सरकार हा कठोर निर्णय घेणार आहे. यावर पुढच्या दोन दिवसांत मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर घोषणा होणार असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.

मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनीही कडक निर्बंध लादण्याचा विचार सरकार करत असल्याचं म्हटलंय. राज्यात कोरोना रुग्णांचे आकडे वाढत आहेत. त्यामुळे खबरदारी घेणं महत्वाचं असल्याचं मत वडेट्टीवार यांनी व्यक्त केलं आहे. पुढचे आठ दिवस परिस्थिती पाहिली जाईल. त्यानंतर रेल्वे आणि विमानसेवा, तसंच क्वारंटाईनबाबत काही कडक निर्बंध आणावे लागतील, असं वडेट्टीवार म्हणाले.

संबंधित बातम्या:

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यात पुन्हा कडक निर्बंध लादले जाणार?, विजय वडेट्टीवार यांचे संकेत

बिनधास्त राहण्याची प्रवृत्ती वाढली, पुन्हा निर्बंध लावणार, राजेश टोपेंचा कडक इशारा

Guidelines to the States from the Union Home Ministry

Non Stop LIVE Update
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.