कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यात पुन्हा कडक निर्बंध लादले जाणार?, विजय वडेट्टीवार यांचे संकेत

राज्यात कोरोना रुग्णांचे आकडे वाढत आहेत. त्यामुळे खबरदारी घेणं महत्वाचं असल्याचं मत वडेट्टीवार यांनी व्यक्त केलं आहे. सर्वसामान्यांसाठी रेल्वे सुरु करण्याबाबत अजून निर्णय झालेला नाही. सर्व अभ्यास करुन निर्णय घेतले जातील, असंही त्यांनी सांगितलं.

  • सुनील काळे, टीव्ही 9 मराठी, मुंबई
  • Published On - 13:08 PM, 23 Nov 2020
We will discuss electricity bill issue in cabinet meeting says Vijay Wadettiwar

मुंबई: राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना पाहायला मिळत आहे. मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद अशा शहरांसह छोटी शहरं आणि ग्रामीण भागातही कोरोनारुग्णांचे आकडे वाढत आहेत. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा काही निर्बंध लादण्याचा विचार महाविकास आघाडी सरकार करत आहे. तसे संकेत मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले आहे. राज्यात कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेतला जातोय. 8 दिवस अंदाज घेऊन काही निर्बंध आणता येतील का? याचा विचार सुरु आहे. शेवटी जीव वाचवणं महत्वाचं आहे, अशी प्रतिक्रिया वडेट्टीवार यांनी दिली आहे. (The possibility of re-imposition of restrictions in the state due to the increasing prevalence of corona)

राज्यात कोरोना रुग्णांचे आकडे वाढत आहेत. त्यामुळे खबरदारी घेणं महत्वाचं असल्याचं मत वडेट्टीवार यांनी व्यक्त केलं आहे. सर्वसामान्यांसाठी रेल्वे सुरु करण्याबाबत अजून निर्णय झालेला नाही. सर्व अभ्यास करुन निर्णय घेतले जातील, असंही त्यांनी सांगितलं. मुंबई ही कॉस्मोपॉलिटीन शहर आहे. अनेक राज्यांमधून इथं लोक येतात. त्यामुळे पुढचे आठ दिवस परिस्थिती पाहिली जाईल. त्यानंतर रेल्वे आणि विमानसेवा, तसंच क्वारंटाईनबाबत काही कडक निर्बंध आणावे लागतील, असं वडेट्टीवार म्हणाले आहेत.

महाराष्ट्रात योग्य उपाययोजना- वडेट्टीवार

महाराष्ट्रात ज्या पद्धतीनं कोरोनाचा अटकाव केला गेला, तसं काम कुठेही झालं नाही. मुंबईत एवढी गर्दी असतानाही राज्य सरकारनं चांगलं काम केलं आहे. दाट वस्ती असलेल्या भागातील कामाचं केंद्र सरकारनेही कौतुक केल्याचं सांगत विजय वडेट्टीवार यांनी राज्यातील आरोग्य यंत्रणेच्या कामाचं आणि उपाययोजनेचं कौतुक केलं आहे.

‘भाजपचं आंदोलन म्हणजे ढोंगीपणा’

वीड बिलाच्या मुद्द्यावरील भाजपचं आंदोलन म्हणजे ढोंगीपणा असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला आहे. त्यांच्या सरकारच्या काळातच वीज थकबाकी वाढली. त्यामुळेच ऊर्जा विभागाची स्थिती बिकट झाल्याची वडेट्टीवार यांनी केली आहे.

देशात कोरोनाचे 44,059 नवे रुग्ण

देशात गेल्या 24 तासात तब्बल 44 हजार 59 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. मात्र, दिलासादायक म्हणजे रविवारी नोंद करण्यात आलेल्या कोरोना रुग्णांच्या आकडेवारीच्या तुलनेत 2.5 टक्क्यांनी ते कमी आहे. त्यामुळे देशातील कोरोना विषाणूचे रुग्ण 9.13 मिलियनवर पोहोचले आहेत. यामध्ये गेल्या 24 तासात 511 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. तर अ‍ॅक्टिव्ह केसेस हे 4 लाख 50 हजारांच्या खाली पोहोचले आहेत. सोमवारी देशातील अ‍ॅक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या 4 लाख 43 हजार 489 वर पोहोचले आहे. रविवारी 45 हजार 209 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 501 जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे.

संबंधित बातम्या:

Corona Update | देशात कोरोनाचे 44,059 नवे रुग्ण, दिल्लीत सर्वाधिक कोरोना बळी

कोरोनाबाबत काय उपाययोजना? महाराष्ट्र-दिल्लीकडे सर्वोच्च न्यायालयाकडून प्रतिज्ञापत्राची मागणी

Parliament Winter Session | संसदेचे हिवाळी अधिवेशन रद्द, दिल्लीतील वाढत्या कोरोना संसर्गामुळे निर्णय

The possibility of re-imposition of restrictions in the state due to the increasing prevalence of corona