जगात एका दिवसातील सर्वाधिक ‘कोरोना’बळी, 24 तासात 4 हजार 883 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू

अमेरिकेतही एका दिवसातल्या सर्वाधिक 'कोरोना'बळींची नोंद झाली आहे. अमेरिकेत काल 1049 जणांचा 'कोरोना'मुळे मृत्यू झाला. (Corona Virus Updates Worldwide)

जगात एका दिवसातील सर्वाधिक 'कोरोना'बळी, 24 तासात 4 हजार 883 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू
Follow us
| Updated on: Apr 02, 2020 | 8:02 AM

मुंबई : ‘कोरोना व्हायरस’ने जगभरात घातलेले थैमान कायम आहे. कालच्या एका दिवसात (बुधवार 1 एप्रिल) आतापर्यंतचे 24 तासातील सर्वाधिक ‘कोरोना’बळी गेले आहेत. जगभरात एकाच दिवशी तब्बल 4 हजार 883 जणांना ‘कोरोना’मुळे जीव गमवावा लागला. जगात आतापर्यंत ‘कोरोना’मुळे मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांचा आकडाही 50 हजारांच्या जवळ पोहोचला आहे. (Corona Virus Updates Worldwide)

‘कोरोना’मुळे जगभर अनेक देशांची वाताहत झाली आहे. काल एका दिवशी जगात 4 हजार 883 रुग्णांचे प्राण गेले. जगात ‘कोरोना’मुळे झालेल्या मृत्यूचा आकडा 47 हजार 192 वर पोहोचला आहे. कोरोनाग्रस्तांची संख्याही 10 लाखांच्या जवळ जात आहे. कालपर्यंत जगात 9 लाख 35 हजार कोरोनाग्रस्त झाले आहेत.

अमेरिकेत एका दिवसातील सर्वाधिक ‘कोरोना’बळी

अमेरिकेतही एका दिवसातल्या सर्वाधिक ‘कोरोना’बळींची नोंद झाली आहे. अमेरिकेत काल 1049 जणांचा ‘कोरोना’मुळे मृत्यू झाला. अमेरिकेत एका दिवसात कोरोनाचे सर्वाधिक नवे रुग्ण सापडले. काल तब्बल 26 हजार 473 नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद झाली. अमेरिकेतल्या एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 लाखांच्या पार गेला आहे. यूएसएमध्ये 2 लाख 15 हजार कोरोनाग्रस्त असून मृतांचा आकडाही 5 हजार 102 वर गेला आहे.

स्पेनमध्ये एक लाखापार रुग्ण

अमेरिकेनंतर स्पेनमध्येही कोरोनाचे तांडव पाहायला मिळाले. स्पेनमध्ये काल 923 ‘कोरोना’ रुग्ण दगावले, तर 9 हजार 387 नवे रुग्ण सापडले. स्पेनमध्येही आता 1 लाख 4 हजार 118 जण कोरोनाग्रस्त आहेत. अमेरिका, इटलीनंतर स्पेनने एक लाखाचा आकडा ओलांडला.

इटलीत कोरोनामुळे बुधवारी 727 कोरोना रुग्णांनी जीव गमावला. इटलीत आतापर्यंत सर्वाधिक म्हणजे 13 हजार 155 ‘कोरोना’बळी गेले आहेत. इटलीत 1 लाख 10 हजार 574 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. (Corona Virus Updates Worldwide)

हेही वाचा : चेंबूरमध्ये 3 दिवसांच्या बाळासह आईला कोरोनाची लागण, डिलिव्हरी वॉर्डात कोरोना पेशंट, पतीचा आरोप

कोरोनामुळे काल 563 ब्रिटीश नागरिकांचा जीव गेला. ब्रिटननमध्ये आतापर्यंत कोरोनाचे 2,352 बळी गेले आहेत. ब्रिटनमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या 29 हजार 474 वर पोहोचली आहे. फ्रान्समध्येही काल 509 कोरोनामुळे मृत्युमुखी पडले, तर 4 हजार 861 नवे रुग्ण सापडले आहेत. फ्रान्समध्ये आतापर्यंत 4 हजार 32 रुग्ण दगावले आहेत.

भारतात ‘कोरोना’ पसरतोय…

दरम्यान, भारतातही कोरोना हातपाय पसरु लागला आहे. ‘कोरोना’मुळे काल एकाच दिवशी देशात 12 बळी गेले, त्यामुळे एकूण मृतांचा आकडा 58 वर पोहोचला आहे. कोरोनाबाधितांची संख्या 1 हजार 998 वर गेली आहे. कालही 300 हून अधिक नवे रुग्ण समोर आले.

महाराष्ट्रात कोरोनाबळींची संख्या 16 वर गेली असून कोरोनाबाधितांची संख्याही 335 वर पोहोचली आहे. काल महाराष्ट्रात कोरोनाचे 33 नवे रुग्ण सापडले. त्यापैकी 30 रुग्ण एकट्या मुंबईतले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे 41 रुग्णांना बरे झाल्याने काल डिस्चार्ज देण्यात आला.

विम्बल्डन स्पर्धाही रद्द

दरम्यान, कोरोनामुळे ऑलिम्पिकनंतर आता विम्बल्डन स्पर्धाही रद्द करण्यात आली आहे. 28 जूनपासून नियोजित असलेली विम्बल्डन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धा रद्द झाली आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच विम्बल्डन स्पर्धा रद्द करण्याची वेळ आली आहे.

Corona Virus Updates Worldwide

Non Stop LIVE Update
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.