अवकाळी पावसाचा पिकांना फटका; शेतकरी पुन्हा एकदा संकटात

| Updated on: Nov 22, 2021 | 8:58 AM

वातावरणात झालेल्या बदलामुळे राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली. या अवकाळी पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.

अवकाळी पावसाचा पिकांना फटका; शेतकरी पुन्हा एकदा संकटात
Follow us on

पुणे – वातावरणात झालेल्या बदलामुळे राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली. या अवकाळी पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. पावसामुळे गहू, ऊस, भात या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विशेष: मावळ भागामध्ये अधिक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच गेल्या अनेक दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने पिकांवर रोगराईचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे. हरभरा पिकावर अळी पडल्याने पिक संकटात सापडले आहे.

भाज्यांची मागणी घटली

दुसरीकडे ढगाळ वातावरणामुळे पुणे जिल्ह्यातील चाकण बाजार समितीमध्ये भाज्यांची मागणी घटली आहे. मागणी घटल्याने दर कमी झाले असून, शेतकऱ्यांना आपला माल कवडीमोल भावाने विकावा लागत आहे. विक्रीतून वाहतूक खर्चही निघत नसल्याने अनेकांनी  बाजारात भाज्या नेल्याच नाहीत, तर काही शेतकऱ्यांवर बाजारात भाजीपाला फेकून देण्याची वेळ आली आहे. मागणी घटल्याने शेतकऱ्यांना फोटा आर्थिक फटका बसला आहे.

बळीराजा संकटात

दरम्यान सध्या राज्यातील शेतकरी वर्ग संकटात सापडल्याचे दिसून येत आहे. खरीप हंगामात अतिवृष्टी झाल्याने हातचे पिक गेले, सोयाबीन, बाजरी अशा सर्वच पिकांना मोठा फटका बसला. पिक पावसामुळे खराब झाल्याने बाजारात देखील त्याला योग्य किंमत मिळाली नही. या संकटातून सावरत नाही तोच आता अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांचे देखील मोठ्या प्रमाणा नुकसान झाले आहे. गहू, भात, ऊस अशा पिकांना अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. तसेच ढगाळ वातावरणामुळे पिकांवरी रोगराईचा प्रादुर्भाव वाढला आहे.

 

संबंधित बातम्या 

आघाडी सरकार हे वसुली सरकार, पोलखोल करण्यासाठी जनतेत जाणार, भाजप प्रवक्ते राम कदम यांची माहिती

बाब्बो, एकट्या जळगावात 3518 कोटींच्या वीजबिल थकबाकीचा डोंगर; महावितरणचे कंबरडे मोडले!

12 तारखेची घटना निंदनीय, पण 13ची घटना त्यापेक्षाही निंदनीय, फडणवीसांचं विधान बेजबाबदारपणाचं; यशोमती ठाकूरांचा पलटवार