सांगलीतील जवानाचा पठाणकोटमध्ये अपघाती मृत्यू

सांगलीतील जवानाचा पठाणकोटमध्ये अपघाती मृत्यू

सांगली : जम्मू काश्मीरमधील पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील जवानालाही वीरमरण आल्याचं वृत्त अगोदर समोर आलं. पण सांगली जिल्ह्यातील जवान राहुल कारंडे यांचा पठाणकोटमध्ये अपघातात मृत्यू झालाय. तहसीलदारांनी याबाबत माहिती दिली. राहुल कारंडे हे विठुरायाची वाडी गावचे आहेत. सांगली जिल्ह्यावर या घटनेमुळे शोककळा पसरली आहे.

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात उरी हल्ल्यानंतरचा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला झालाय. या आत्मघातकी हल्ल्यात शहिदांचा आकडा 40 वर पोहोचल्याची माहिती आहे. तर अनेक जवान जखमी आहेत. हा हल्ला एवढा भीषण होता, की गाड्यांचे तुकडे-तुकडे झाले आहेत. ज्या गाडीचा वापर हल्ल्यासाठी करण्यात आला, त्या गाडीमध्ये 200 किलोंपेक्षा अधिक स्फोटकं होती.

केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल आणि आयबी प्रमुखांशी चर्चा केली आहे. सर्व वरिष्ठ अधिकारी परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहेत.


Published On - 8:03 pm, Thu, 14 February 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI