मॅजिक नाही तर लॉजिक, नोकरीनंतर शेतकऱ्याची सेकंड इनिंग, खजूर शेतीतून 8 लाखाचं उत्पन्न

निराशेच्या वातावरणात नवी उमेद देणारी नागपूर जिल्ह्यातील सेवी थंगवेल (Savi Thangavel) यांची खजूर शेती. (Dates farming in Maharashtra)

मॅजिक नाही तर लॉजिक, नोकरीनंतर शेतकऱ्याची सेकंड इनिंग, खजूर शेतीतून 8 लाखाचं उत्पन्न

नागपूर : कोरोनामुळे अवघा देश लॉकडाऊन होता, पण या संकटातही आपला बळीराजा शेतात राबराब राबत होता. त्यामुळेच घरात लॉकडाऊन असलेल्या शहरातील जनतेला फळं, भाज्या आणि दूध सहजतेनं मिळत होतं. म्हणूनच कोरोनाच्या या युद्धात शेतकरीही कोरोना योद्धा म्हणून लोकांना अत्यावश्यक बाबी पुरवत होता. (Dates farming in Maharashtra)

अशाच एका फळउत्पादन शेतकऱ्याची ही यशोगाथा आहे. (Dates farming in Maharashtra) निराशेच्या वातावरणात नवी उमेद देणारी नागपूर जिल्ह्यातील सेवी थंगवेल (Savi Thangavel) यांची खजूर शेती. (Video) कोरोनाच्या संकटातंही लाखो शेतकऱ्यांप्रमाणे ते शेतात राबले आणि आता त्यांच्या खजुराचं पीक विक्रीला आलंय. दोन एकरात आठ लाख रुपये उत्पन्नाचा विश्वास त्यांना आहे. महाराष्ट्रातील ही पहिली खजूर शेती आहे.

सेवी थंगवेल यांनी 2009 मध्ये दीड एकरात खजुराच्या 130 झाडांची लागवड केली. त्यांना चार वर्षानंतर उत्पादन सुरु झालं. दरवर्षी 8 ते 10 लाखांचे उत्पन्न अपेक्षित असून हे 70 वर्षे चालणारे पीक आहे.

हवामान बदल, कधी कोरडा तर कधी ओला दुष्काळ अशा बिकट परिस्थितीत योग्य नियोजन करुन, सेवी थंगवेल यांनी नागपुरात खजूर शेती करुन दाखवली. गेल्या अनेक वर्षांपासून या शेतीतून लाखो रुपयांचा नफा कमावला आहे.

सेवी थंगवेल यांनी नागपूरपासून जवळपास 15 किलोमीटर असलेल्या मोहगाव झिल्पी या गावात साधारण 10 वर्षापासून खजूर शेती करत आहेत. ही शेती पाहण्यासाठी अनेक शेतकरी, पर्यटक या गावाचा फेरफटका मारतात.

सेवी थंगवेल यांनी तामिळनाडूला जाऊन खजूर शेतीचा अभ्यास केला. तिकडूनच रोप मागवले आणि दीड एकरात लागवड केली. एकतर कमी पाणी आणि उष्ण हवामान खजूर पिकाला पोषक. त्यामुळेच विदर्भातील वातावरणाचा फायदा सेवी थंगवेल यांनी खजूर शेतीसाठी करुन घेतला. ठिबकने शेतीला पाणी पुरवलं आणि शेणखत दिलं. त्यामुळे सातव्या वर्षापासूनच त्यांना उत्पादन मिळण्यास सुरु झालं.

एका झाडापासून जवळपास 300 किलोपर्यंत उत्पादन सेवी थंगवेल यांच्या माहितीनुसार, खजुराच्या एका झाडापासून जवळपास 300 किलोपर्यंतचं उत्पनादन मिळतं. बाजारात सध्याच्या लॉकडाऊनच्या परिस्थिती ओल्या खजुरांचा दर 700 ते 1000 रुपये प्रतिकिलो असा आहे. त्यावरुन सेवी थंगवेल यांच्या खजूर शेतीचा अंदाज बांधता येऊ शकतो.

लागवड साधारण 25 बाय 25 अंतरावर 3 बाय 3 खड्डा खणून, त्यामध्ये शेणखत आणि माती टाकून लागवड केली जाते. त्यामुळे दोन झाडांच्या मध्ये तुम्ही अंतरपीक घेऊ शकता, असं सेवी थंगवेल सांगतात.

संबंधित बातम्या 

उचलली रिस्क, प्रॉफिट फिक्स! बीडमध्ये शतावरीचं पीक घेऊन तब्बल 10 लाखांचं उत्पन्न! 

Published On - 11:19 am, Mon, 20 July 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI