AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सासूकडून सतत टोमणे, कंटाळलेल्या सूनेकडून बॅटने हत्या

चेंबूरमध्ये सूनेने सासूची बॅट मारुन हत्या केल्याची (Daughter in law Killed Mother-in-law in Chembur) धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

सासूकडून सतत टोमणे, कंटाळलेल्या सूनेकडून बॅटने हत्या
| Updated on: Jul 19, 2020 | 8:08 PM
Share

मुंबई : मुंबईतील चेंबूरमध्ये राहणाऱ्या एका सूनेने सासूची बॅट मारुन हत्या केल्याची (Daughter in law Killed Mother-in-law in Chembur) धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी टिळकनगरमध्ये राहणाऱ्या सूनेला अटक करण्यात आली आहे.

टिळक नगर परिसरातील पेस्टम सागर कॉलनीत एस.आर ए इमारतीमध्ये सज्जा पाटील (70) नावाची महिला राहत होती. ती आपल्या दत्तक मुलगा दिनेश पाटील आणि सून अंजना हिच्यासोबत राहत होती. सज्जाबाई घाटकोपर येथील एका मंदिराबाहेर बसून भीक मागायच्या. तर दिनेश हा दैनंदिन रोजगारावर काम करत होता. त्यामुळे त्यांचे घर हे सज्जाबाई यांच्या मिळकतीतून चालत असे.

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर 

सज्जा बाई या नेहमी आपल्या सूनेला हिणवत असे. त्यामुळे सून अंजना हिचा राग अनावर झाला. त्याच रागातून सूनेने घरातील बॅटने सज्जा बाईची हत्या केली. यानंतरही आपली सासू बाथरुममध्ये घसरुन पडली असा बनाव केला.

या घटनेनंतर टिळकनगर पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनसाठी घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात नेला. त्यावेळी डॉक्टरांनी तिची हत्या झाल्याचे सांगितले.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

यानंतर पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरु केला. या प्रकरणाच्या चौकशीसाठी पोलिसांनी आधी मुलाला ताब्यात घेत त्याची चौकशी केली. पण त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही. मग सूनेला ताब्यात घेतलं आणि तिला पोलिसी हिसका दाखवला. त्यानंतर तिने सासूला बॅटने मारल्याची कबूली (Daughter in law Killed Mother-in-law in Chembur) दिली.

संबंधित बातम्या : 

हुशार चोरांनी 100 किलोची तिजोरी तलावात लपवली, तरबेज पोलिसांनी चुटकीसरशी पकडलं

नागपुरात कौटुंबिक कलाहातून निर्दयी बापाकडून 9 महिन्याच्या मुलीची पाण्यात बुडवून हत्या

Follow Us
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक आयोगाला अंतिम मुदत
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी दरम्यान बावनकुळे संतापले
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्हणाले...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत जाहीर
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं कारण काय?
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...