औरंगाबादमध्ये शेततळ्यात पोहायला गेलेल्या 5 जणांचा बुडून मृत्यू

| Updated on: Apr 12, 2020 | 5:03 PM

एकिकडे कोरोना विषाणूच्या संसर्गाचं थैमान सुरु असताना औरंगाबादमधील पैठण तालुक्यात 5 मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे (Deaath due to drowning in Farm lake in Aurangabad)

औरंगाबादमध्ये शेततळ्यात पोहायला गेलेल्या 5 जणांचा बुडून मृत्यू
Follow us on

औरंगाबाद : एकिकडे कोरोना विषाणूच्या संसर्गाचं थैमान सुरु असताना औरंगाबादमधील पैठण तालुक्यात 5 मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही मुलं विवाह मांडावा येथे शेततळ्यात पोहण्यासाठी गेली होती. त्यावेळी ही घटना घडली. एकाच वेळी 5 जणांचा बुडून मृत्यू झाल्यामुळे खळबळ उडाली आहे (Deaath due to drowning in Farm lake in Aurangabad).

घटनेनंतर आसपासच्या गावकऱ्यांनी मुलांना रुग्णालयात दाखल केलं. मात्र, त्यांचा प्राण गेलेला होता. पोलिस रुग्णालयात येऊन चौकशी करत आहेत. विशेष म्हणजे ही पाचही जण एकाच कुटुंबातील होते. यात बाप-लेकासह दोन सख्ख्या भावांचाही समावेश आहे. 4 मुलं आपल्या कुटुंबातील एका सदस्यासोबत पोहायला गेले होते. लक्ष्मण निवृत्ती कोरडे (30 वर्षे), सार्थक लक्ष्मण कोरडे (5 वर्षे), अलंकार रामनाथ कोरडे (15 वर्षे), वैभव रामनाथ कोरडे (10), समर्थ ज्ञानदेव कोरडे (10 वर्षे) अशी या मृतांची नावं आहेत.

देशभरात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आला आहे. राज्यात जमावबंदी आणि संचारबंदी देखील लागू करण्यात आली आहे. असं असतानाही एकाचवेळी ही 5 जण शेततळ्यात पोहण्यासाठी गेल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. संबंधित मुलांपैकी किती जणांना पोहता येत होतं, किती जणांना नाही? याबाबत कुटुंबीयांना कल्पना होती की नाही असे अनेक प्रश्न सध्यातरी अनुत्तरीत आहेत.

हेही वाचा:

‘जी दक्षिण’मध्ये अडीचशे कोरोनाग्रस्त, मुंबईची वॉर्डनिहाय ‘कोरोना’ रुग्णसंख्या

जिथे आहे तिथेच थांबा; तुमच्या राहण्या-खाण्याची हमी आमची : अनिल देशमुख

पुण्यात विळखा घट्ट, भवानी पेठेत 56 कोरोनाग्रस्त, कोणत्या वॉर्डमध्ये किती रुग्ण?

पंजाबमध्ये पोलिसांवर हल्ला, पोलिसाचा हातच कापला, 7 जणांना अटक

Deaath due to drowning in Farm lake in Aurangabad