मृतदेहाला अग्नी दिला,  पण चार दिवसांनी तरुणी जिवंत परतली!  

Nupur Chilkulwar

Nupur Chilkulwar |

Updated on: Jul 05, 2019 | 4:48 PM

चंदीगड (पंजाब): पंजाबच्या पतियाळामध्ये एक विचित्र घटना घडली. आपल्या 26 वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याचं समजून जिच्यावर अंत्यसंकार केले, तीच मुलगी चार दिवसांनी जिवंत घरी परतली. या घटनेमुळे तरुणीच्या घरच्यांना आनंद झाला असला, तरी पतियाळा पोलिसांसाठी मात्र अडचण निर्माण झाली आहे. कुटुंबीयांनी ज्या मृत तरुणीला आपली मुलगी समजून तिच्यावर अंत्यसंस्कार केले, ती तरुणी कोण होती? असा प्रश्न आता पोलिसांना पडला आहे, याचा […]

मृतदेहाला अग्नी दिला,  पण चार दिवसांनी तरुणी जिवंत परतली!  

चंदीगड (पंजाब): पंजाबच्या पतियाळामध्ये एक विचित्र घटना घडली. आपल्या 26 वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याचं समजून जिच्यावर अंत्यसंकार केलेतीच मुलगी चार दिवसांनी जिवंत घरी परतली. या घटनेमुळे तरुणीच्या घरच्यांना आनंद झाला असलातरी पतियाळा पोलिसांसाठी मात्र अडचण निर्माण झाली आहे. कुटुंबीयांनी ज्या मृत तरुणीला आपली मुलगी समजून तिच्यावर अंत्यसंस्कार केलेती तरुणी कोण होतीअसा प्रश्न आता पोलिसांना पडला आहेयाचा तपास पतियाळा पोलीस करत आहेत.

काय आहे हे आगळवेगळं प्रकरण?

पंजाबच्या पतियाळा येथील 26 वर्षीय नैनाचे चमकौर साहिब येथे राहणाऱ्या तरुणाशी लग्न झाले. मात्र गेल्या आठ डिसेंबरला नैनाने तिच्या प्रियकरासोबत घरातून पळ काढला. 11 डिसेंबरला पोलिसांना पतियाळा येथील बायपास रोडवर छिन्न-विछिन्न अवस्थेत एका महिलेचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम सुरु केले. 14 डिसेंबरला नैनाच्या कुटुंबीयांनी तो मृतदेह तिचाच असल्याचा दावा केला. त्यामुळे पोलिसांनी तो मृतदेह नैनाच्या कुटुंबीयांना सोपवला. 15 डिसेंबरला त्या मृतदेहाला आपल्या मुलीचा मृतदेह समजून कुटुंबीयांनी त्यावर अंत्यसंस्कार केले.

नैना ज्या व्यक्तीसोबत घरातून पळाली होतीत्यानेच तिचा खून केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता. मात्र आता नैना सुखरुप घरी परतल्याने पोलिसांसमोर अंत्यसंस्कार झालेल्या महिलेचा शोध घेण्याचे नवे आव्हान आहे.

आम्ही मृत तरुणीचा डीएनए आणि फिगंरप्रींट सुरक्षित ठेवले आहेत. आता यावरुन ती तरुणी कोण होती याचा तपास केला जाईल”, असे पतियाळा पोलिस तपास अधिकाऱ्यांनी सांगितले.

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI