DeepVeer | ‘दीप-वीर’च्या लग्नाचा वाढदिवस, खास फोटो शेअर करत रणवीरकडून दीपिकाला शुभेच्छा!

बॉलिवूडची ‘मोस्ट रोमँटिक’ जोडी ‘दीप-वीर’ आपल्या लग्नाचा दुसरा वाढदिवस साजरा करत आहे.

DeepVeer | ‘दीप-वीर’च्या लग्नाचा वाढदिवस, खास फोटो शेअर करत रणवीरकडून दीपिकाला शुभेच्छा!
दीपिकाच्या इन्स्टा अकाउंटवरील सर्व पोस्ट डिलीट केल्या आहे, तिचे अकाउंट हॅक करण्यात आले आहे का असा प्रश्न निर्माण झाला आहे. दीपिकाच्या सर्व पोस्ट डिलीट झाल्याचे पाहून चाहत्यांना आश्चर्य वाटले.

मुंबई : बॉलिवूडची ‘मोस्ट रोमँटिक’ जोडी ‘दीप-वीर’ आपल्या लग्नाचा दुसरा वाढदिवस साजरा करत आहे. दीपिका (Deepika Padukone) आणि रणवीरच्या (Ranveer Singh) चाहत्यांसह बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटी या जोडीला शुभेच्छा देत आहेत. याच खास क्षणी रणवीरने एका विशेष अंदाजात दीपिका पदुकोणला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दीपिकानेसुद्धा रणवीरला शुभेच्छा दिल्या आहेत (Deepika Padukone and Ranveer Singh Celebrating their second wedding anniversary).

बॉलिवूडच्या या प्रसिद्ध जोडीने 2018मध्ये इटलीत लग्नगाठ बांधली होती. अनेक कार्यक्रमात नेहमीच ते दोघे एकमेकांसोबत दिसतात. ड्रग्ज प्रकरणी एनसीबी चौकशीदरम्यानदेखील रणवीरने दीपिकाला खंबीर पाठिंबा दिला होता. त्यावेळेसही तो दीपिकासोबत दिसला होता.

रणवीर सिंह ने दीपिका पदुकोण ला दिल्या शुभेच्छा

रणवीरने या खास क्षणी दीपिका सोबतची आपली सुंदर छायाचित्र सोशल मीडियावर शेअर केली आहेत. या छायाचित्रांमध्ये दीपिका आणि रणवीर सिंहची जोडी रोमँटिक अंदाजात दिसून येत आहे. दीपिकाने फुलांची डिझाईन असलेला पांढरा सलवार सूट परिधान केला आहे. तर, रणवीर सिंहने फुलांचे नक्षीकाम असलेला पांढऱ्या रंगाचा कुर्ता परिधान केलेला आहे. त्यावर सोनेरी रंगाचा जॅकेट घातलेला आहे.

दोघांचे फोटो पोस्ट करत रणवीर सिंहने लिहिले आहे की, ‘आपण दोघे एकमेकांसोबत कायमचे जोडले गेले आहोत. माझ्या ‘बाहुली’ला लग्नाच्या दुसऱ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.’ रणवीरच्या या पोस्टवर सेलिब्रिटींच्या भरपूर कमेंट येत आहेत.  या पोस्टवर सेलिब्रिटी कपलला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मिळत आहेत. रणवीर आणि दीपिकाच्या या फोटोंना तब्बल 16 लाखांहून जास्त लोकांनी लाईक केले आहे (Deepika Padukone and Ranveer Singh Celebrating their second wedding anniversary).

 

View this post on Instagram

 

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh)

दीपिकाने दिल्या रणवीरला शुभेच्छा

दीपिका पदुकोणनेसुद्धा रणवीर सोबतचे तेच फोटो शेअर केले आहेत. हे फोटो पोस्ट करत दीपिका पदुकोणने लिहिले की, ‘रणवीर सिंह तू मला खऱ्या अर्थाने मला पूर्ण करतोस’. दीप-वीर जोडी या छायाचित्रांमध्ये खूप सुंदर दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone)

इटलीमध्ये बांधली लग्नगाठ

इटलीमध्ये 14 नोव्हेंबर 2018 रोजी दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह लग्नगाठ बांधली होती. ‘रामलीला’ या चित्रपटाच्या सेटवर या दोघांचे सूत जुळले. तर, चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण यांनी एकमेकांशी लग्ना करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर तब्बल 6 वर्षे दोघे रिलेशनशिपमध्ये होते. त्यानंतर या जोडीने लग्न केले. रणवीर आणि दीपिका लवकरच कबीर खान दिग्दर्शित ‘83’ या चित्रपटात एकत्र झळकणार आहेत.

(Deepika Padukone and Ranveer Singh Celebrating their second wedding anniversary)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI