’83’ मधील दीपिकाचा फर्स्ट लूक पाहिलात का?

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि अभिनेता रणवीर सिंग यांचा '83' सिनेमातील फर्स्ट लूक समोर आला आहे. या दोघांना एका फ्रेममध्ये बघून असं वाटतं की खरोखरचं ते तरुणपणातील कपिल देव आणि रोमी देव आहेत.

'83' मधील दीपिकाचा फर्स्ट लूक पाहिलात का?

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि अभिनेता रणवीर सिंग यांचा ’83’ सिनेमातील फर्स्ट लूक समोर आला आहे. या दोघांना एका फ्रेममध्ये बघून असं वाटतं की खरोखरचं ते तरुणपणातील कपिल देव आणि रोमी देव आहेत (Deepika Padukone 83 First Look). दक्षिण भारतातील सिनेसमीक्षक रमेश बाला यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर एक फोटो शेअर केला. यामध्ये दीपिका पादुकोण ही रोमी देव आणि रणवीर सिंह हा कपिल देव यांच्या लूकमध्ये दिसत आहेत. दीपिका आणि रणवीरचा हा लूक त्यांच्या चाहत्यांच्या पसंतीस पडतो आहे (Deepika Padukone 83 First Look).

दीपिका पादुकोण ही रोमी देव प्रमाणे लहान केसांमध्ये दिसत आहे. याबाबत दीपिका पादूकोणने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली. “खेळाच्या इतिहासातील सर्वात प्रतिष्ठित क्षणांपैकी एक क्षण असलेल्या सिनेमात एक छोटासा पण महत्त्वपूर्ण भूमिका साकारणे नक्कीच गौरवास्पद आहे.”

“पतीच्या व्यावसायिक आणि व्यक्तिगत आकांक्षांच्या यशासाठी पत्नी किती महत्त्वाची भूमिका निभावत असते, हे मी माझ्या आईच्या रुपात खूप जवळून पाहिलं आहे. माझ्यासाठी अनेक प्रकारे 83 त्या प्रत्येक महिलेला समर्पित आहे, जी आपल्या पतीच्या स्वप्नांना आपल्या स्वप्नांच्या पुढे ठेवते”, असं कॅप्शन देत दीपिकाने रोमी देवच्या भूमिकेतील फर्स्ट लूक शेअर केला.

“मी नेहमी दीपिकामध्ये एक अभूतपूर्व अभिनेत्रीला पाहिलं आहे. जेव्हा मी रोमी देवच्या भूमिकेसाठी कास्टिंगबाबत विचार करत होतो. तेव्हा माझ्या डोक्यात फक्त तिचच नाव आलं. रोमी यांच्याजवळ अत्यंत आकर्षक आणि सकारात्मक ऊर्जा आहे. दीपिकाने पूर्णपणे या भूमिकेसोबत न्याय केला आहे. रणवीरसोबत तिची केमिस्ट्री, कपिल देव आणि रोमी यंच्या नाताल्या दाखवण्यासाठी मदत करेल. मला आनंद आहे की दीपिका आमच्या ’83’ च्या प्रवासाचा एक अविभाज्य भाग आहे”, असं सिनेमाचे दिग्दर्शक कबीर खान यांनी सांगितलं.

’83’ या सिनेमाचं दिग्दर्शन कबीर खान करत आहेत. या सिनेमात 1983 मधील क्रिकेट विश्व चषक विजयाची कहाणी दाखवण्यात आली आहे. या चित्रपटात रणवीर सिंह, दीपिका पादुकोण, पंकज त्रिपाठी, साकीब सलीम, बोमन इराणी यांच्यासह दिग्गजांची फौज आहे. दिग्दर्शक कबीर खान यांनी चित्रपटाच्या माध्यमातून इतिहासाची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न केला आहे. हा सिनेमा येत्या 10 एप्रिल 2020 रोजी हिंदी, तामिळ आणि तेलुगू भाषेत प्रदर्शित होणार आहे.

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI