AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अयोध्येतील राम नगरीत नवा विक्रम, पाच लाखांपेक्षा अधिक दीप प्रज्वलन

संपूर्ण देशभरात आज दिवाळी आनंद, उत्साहात साजरी करण्यात येत आहे. याच निमित्ताने उत्तर प्रदेशातील रामानगरी येथे तब्बल पाच लाखांपेक्षा अधिक दीप प्रज्वलन (Deepotsava celebration ayodhya)  करुन एक नवा विक्रम रचण्यात आला.

अयोध्येतील राम नगरीत नवा विक्रम, पाच लाखांपेक्षा अधिक दीप प्रज्वलन
| Edited By: | Updated on: Oct 27, 2019 | 11:45 AM
Share

लखनऊ : संपूर्ण देशभरात आज दिवाळी आनंद, उत्साहात साजरी करण्यात येत आहे. याच निमित्ताने उत्तर प्रदेशातील रामानगरी येथे तब्बल पाच लाखांपेक्षा अधिक दीप प्रज्वलन (Deepotsava celebration ayodhya)  करुन एक नवा विक्रम रचण्यात आला. या दीप प्रजल्वनासाठी मोठ्या प्रमाणात येथे राम भक्त उपस्थित होते. तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही उपस्थित होते. दीप प्रजल्वन (Deepotsava celebration ayodhya) केल्यामुळे रामाची नगरी प्रकाशमय झाली होती.

भारताच्या कानाकोपऱ्यातून येथे राम भक्त हजर होते. यावेळी राम भक्त समितीकडून श्रीराम आणि रामायणाचे 11 प्रसंग प्रस्तुत करण्यात आले. रामाचीनगरी येथे एकूण पाच लाख 51 हजार दीप प्रज्वलन केले होते. तसेच इतर दीड लाख दीप मठ आणि मंदीर येथे लावण्यात आले होते.

“रामाच्या परंपरेवर सर्वांना गर्व असला पाहिजे. मोदी सरकारमध्ये कोणत्याही भेदभावाशिवाय सर्वांचा विकास होत आहे. यापूर्वीचे सरकार अयोध्येच्या नावाखाली घाबरत होते. पण माझ्या कार्यकाळात मी अनेकदा येथे आलो”, असं यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले.

यावेळी योगी आदित्यनाथ यांनी 226 कोटींच्या परियोजनांचे लोकार्पण केले. तसेच मोठ्या प्रमाणात येथे लोक दीपोत्सव कार्यक्रमासाठी उपस्थित होते.

“पंतप्रधान नेरंद्र मोदी यांनी राम राज्य साकारलेले आहे. मोदी यांनी भारताची परंपरा जागतिक पातळीपर्यंत पोहचवली आहे. भारत जगात विश्वगुरुच्या रुपात स्थापन होत आहे. भारत कुणाचा नाद करत नाही, पण भारताचा कुणी नाद केला, तर त्याला सोडत नाही”, असं योगी म्हणाले.

Follow Us
मविआकडून उद्धव ठाकरेंना विधानपरिषदेची ऑफर?; संजय राऊत स्पष्टच बोलले
मविआकडून उद्धव ठाकरेंना विधानपरिषदेची ऑफर?; संजय राऊत स्पष्टच बोलले.
नागपूरमध्ये पोलिसांची अचानक धाड, लॅपटॉप, वाय-फाय जप्त, नेमकं काय घडलं?
नागपूरमध्ये पोलिसांची अचानक धाड, लॅपटॉप, वाय-फाय जप्त, नेमकं काय घडलं?.
मराठी सक्तीवर थेट बाळासाहेबांचा दाखला, राऊतांनी शिंदे गटाला घेरलं, म्ह
मराठी सक्तीवर थेट बाळासाहेबांचा दाखला, राऊतांनी शिंदे गटाला घेरलं, म्ह.
धमकी देणाऱ्या भैय्यांना धडा शिकवण्याची हीच वेळ, मनसेचा खरमरीत दम
धमकी देणाऱ्या भैय्यांना धडा शिकवण्याची हीच वेळ, मनसेचा खरमरीत दम.
भाजपच्या मोर्चात राडा करणाऱ्या महिलेविरोधात सदावर्तेची मुलगी मैदानात
भाजपच्या मोर्चात राडा करणाऱ्या महिलेविरोधात सदावर्तेची मुलगी मैदानात.
नको ती मागणी अन्... नाशिक पाठोपाठ मुंबईतही कॉर्पोरेट जिहाद? २०२४ पासून
नको ती मागणी अन्... नाशिक पाठोपाठ मुंबईतही कॉर्पोरेट जिहाद? २०२४ पासून.
जय पवारांकडून स्वत:च्याच उमेदवारीचे संकेत
जय पवारांकडून स्वत:च्याच उमेदवारीचे संकेत.
शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज, पवारांची प्रकृती....
शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज, पवारांची प्रकृती.....
गिधाड धमक्या देऊ नका, तुम्ही संप पुकारलात तर आम्हीही रस्त्यावर उतरू...
गिधाड धमक्या देऊ नका, तुम्ही संप पुकारलात तर आम्हीही रस्त्यावर उतरू....
बीड कारागृहातून धक्कादायक माहिती, आणखी एक ऑडिओ क्लिप समोर
बीड कारागृहातून धक्कादायक माहिती, आणखी एक ऑडिओ क्लिप समोर.