AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भर विधानसभेत केजरीवालांचा संताप, कृषी कायद्यांच्या प्रती टराटरा फाडल्या

दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी तीन कृषी कायद्यांना कडाडून विरोध केला. (Arvind Kejriwal farm law)

भर विधानसभेत केजरीवालांचा संताप, कृषी कायद्यांच्या प्रती टराटरा फाडल्या
दिल्ली विधानसभेत भाषण करत असताना मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अशा प्रकारे कृषी कायद्यांच्या प्रती फाडल्या.
| Updated on: Dec 17, 2020 | 6:27 PM
Share

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे (AAP)  अध्यक्ष अरविंद केजरीवाल ( Arvind Kejriwal) यांनी केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी तीन कृषी कायद्यांना (farm laws) कडाडून विरोध केला. त्यांनी या तिन्ही कायद्यांच्या प्रती चक्क टराटरा फाडल्या. तसेच, आणखी किती शेतकऱ्यांचे जीव घेणार असा सवालही त्यांनी केंद्र सरकारला केला. दिल्ली विधानसभेच्या एकदीवसीय अधिवेशनात हा प्रकार घडला.(Delhi chief minister Arvind Kejriwal tears copies of farm laws)

केंद्र सरकारची इंग्रजांशी तुलना

दिल्ली सरकारने गुरुवारी (17 डिसेंबर) एकदिवसीय अधिवेशन आयोजित केले होते. यावेळी भाषण करताना त्यांनी कृषी कायद्यांवर अनेक प्रश्न अपस्थित केले. यावेळी बोलताना, “देशात कोरोना महामारीने थैमान घातलेले असताना संसदेत तीन कृषी विधेयके मंजूर करण्याची काय गरज होती? सरकारने एवढी घाई का केली. राज्यसभेत कुठलेही मतदान न करता कृषी विधेयके मंजूर केली गेली? असा प्रकार देशात पहिल्यांदाच घडला. याच कारणामुळे मी हे तिन्ही कृषी कायदे फाडून टाकतोय,” असे केजरीवाल म्हणाले. तसेच, यावेळी केंद्र सरकारने इंग्रजांपेक्षाही क्रुर न होण्याचा सल्ला त्यांनी केंद्र सरकारला दिला.

देशातील प्रत्येक शेतकरी भगतसिंग 

“कृषी कायद्यांमुळे शेतकऱ्यांचा फायदा होणार असं केंद्र सरकार सांगतं. शेतऱ्यांना तसे समजाऊन सांगण्याचाही ते प्रयत्न करत आहेत. या कायद्यांमुळे शेतकऱ्यांच्या जमिनीवरच्या मालकी हक्कावर कसलाही परिणाम होणार नसल्याची ग्वाही उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून दिली जात आहे. मात्र, शेतकऱ्यांना काय फायदा होत आहे, ते सरकारने सांगावे, असे आवाहन केजरीवाल यांनी केले. तसेच देशातील प्रत्येक शेतकरी आता क्रांतीकारक भगतसिंग झाल्याचे सांगत त्यांनी केंद्र सरकारला धारेवर धरलं.

संबंधित  बातम्या :

Farmer Protest | शेतकरी आंदोलन थांबवण्याला सर्वोच्च न्यायालयाचा नकार, ‘या’ मुद्द्यावर सर्वाधिक जोर

‘शेतकऱ्यांना आंदोलन करण्याचा पूर्ण अधिकार, त्यांना अडवू नका’, संयुक्त राष्ट्राकडूनही मोदी सरकारला कानपिचक्या

कॅनडाच्या पंतप्रधानांचा भारतातील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा, मोदी सरकार भडकलं

(Delhi chief minister Arvind Kejriwal tears copies of farm laws)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.