AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चित्रपटाची कथा पाहिजे तर अशी, ‘देऊळ बंद 2’ने रचला इतिहास, एकूण कमाई किती?

देऊळ बंद 2 चित्रपटाने प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर प्रचंड धुमाकूळ घातला होता. आता अशातच या चित्रपटाने 26 व्या दिवशी मोठा विक्रम केला आहे.

चित्रपटाची कथा पाहिजे तर अशी, 'देऊळ बंद 2'ने रचला इतिहास, एकूण कमाई किती?
| Updated on: Jun 16, 2026 | 4:21 PM
Share

Deool Band 2 : मराठी चित्रपटसृष्टीत सध्या ‘देऊळ बंद 2’ या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. प्रेक्षकांकडून मिळत असलेल्या भरभरून प्रतिसादामुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करत असून, 2026 मधील सर्वाधिक नफा कमावणारा मराठी चित्रपट ठरला आहे. मोहन जोशी, महेश मांजरेकर आणि प्रवीण तरडे यांसारख्या दिग्गज कलाकारांच्या अभिनयाने सजलेल्या या चित्रपटाने प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षकांना अक्षरशः थिएटरकडे खेचून आणले आहे.

अवघ्या 10 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या ‘देऊळ बंद 2’ने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त यश मिळवले आहे. चित्रपटाने भारतात 68.72 कोटी रुपयांचे नेट कलेक्शन केले असून, त्याचे ग्रॉस कलेक्शन 81.08 कोटी रुपये इतके झाले आहे. विशेष म्हणजे चित्रपटाचा रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट 58.72 कोटी रुपये असून, त्याची टक्केवारी तब्बल 587.2 टक्के इतकी आहे. या शानदार कमाईमुळे चित्रपटाला ‘सुपरहिट’ असा दर्जा मिळाला आहे. तसेच 2026 मधील सर्वाधिक नफा देणाऱ्या मराठी चित्रपटांच्या यादीत त्याने पहिला क्रमांक पटकावला आहे.

‘क्रांतीज्योती विद्यालय’ला मागे टाकले

यापूर्वी सर्वाधिक नफा कमावणाऱ्या मराठी चित्रपटाचा मान ‘क्रांतीज्योती विद्यालय’ या चित्रपटाकडे होता. हा चित्रपट 4 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झाला होता आणि त्याने 27.35 कोटी रुपयांची कमाई करत 583.75 टक्के नफा मिळवला होता. मात्र, ‘देऊळ बंद 2’ ने 587.2 टक्के ROI मिळवत हा विक्रम मोडला असून, ‘क्रांतीज्योती विद्यालय’ आता दुसऱ्या क्रमांकावर आहे.

26व्या दिवशी किती झाली कमाई?

प्रदर्शनानंतर जवळपास चार आठवडे उलटूनही ‘देऊळ बंद 2’ची कमाई सुरूच आहे. चित्रपटाने 26व्या दिवशी 50 लाख रुपयांचा व्यवसाय केला. मात्र, 25व्या दिवसाच्या तुलनेत कमाईत 60.62 टक्क्यांची घसरण दिसून आली. 25व्या दिवशी चित्रपटाने 1.27 कोटी रुपयांची कमाई केली होती तर त्यानंतरच्या दिवशी कलेक्शन 50 लाखांवर आले.

या आकडेवारीवरून चित्रपटाला प्रदर्शित झाल्यानंतरही सातत्याने प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येते. हा चित्रपट 2015 मध्ये आलेल्या ‘देऊळ बंद’ या गाजलेल्या चित्रपटाचा सिक्वेल आहे. पहिल्या भागालाही प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात पसंती दिली होती आणि तो देखील बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला होता. आता ‘देऊळ बंद 2’ने त्या यशाची पुनरावृत्ती करत नवा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

Follow Us
मंदा म्हात्रे यांचे मंत्री गणेश नाईक यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप..
Manda Mhatre | मंदा म्हात्रे यांचे मंत्री गणेश नाईक यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप, भाजपाचे दोन्ही नेत्यांमध्ये मोठा वाद!
मोठी बातमी! पुण्यात भीषण आग; एकापाठोपाठ एक दुकाने...आगीचं कारण काय?
मोठी बातमी! पुण्यात भीषण आग; एकापाठोपाठ एक दुकाने...आगीचं कारण काय?
24 तास दरवाजे...सरनाईकांच्या विधानाची एकच चर्चा!
Pratap Sarnaik | ऑपरेशन टायगरबाबत मोठा गौप्यस्फोट, 24 तास दरवाजे...सरनाईकांच्या विधानाची एकच चर्चा!
याला म्हणतात धाक! सर्वत्र चर्चेत असलेले तुकाराम मुंढे छापा टाकणार या..
याला म्हणतात धाक! सर्वत्र चर्चेत असलेले तुकाराम मुंढे छापा टाकणार या आधीच... अकोल्यात घडलं असं काही की...
वंचितला पाठिंबा द्यायचा की नाही? काँग्रेसच्या भूमिकेविषयी मोठी माहिती
Amravati | वंचितला पाठिंबा द्यायचा की नाही? काँग्रेसच्या भूमिकेविषयी सर्वात मोठी माहिती; अमरावतीत नेमकं काय घडतंय?
भीमशंकर देवस्थानाबाबत मोठा निर्णय! आता VIP दर्शन बंद; नवा नियम नेमका
भीमशंकर देवस्थानाबाबत मोठा निर्णय! आता VIP दर्शन बंद; नवा नियम नेमका काय?
मद्यधुंद तरुणाच्या भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक!
Pune Hinjewadi | हिंजवडीत ड्रंक अँड ड्राइव्हचा कहर; मद्यधुंद तरुणाच्या भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक!
कॉंग्रेसमध्ये मोठं भगदड! शिंदेच्या पक्षातील इनकमिंग सुरुच, 10 नगरसेवाक
कॉंग्रेसमध्ये मोठं भगदड! शिंदेच्या पक्षातील इनकमिंग सुरुच, 10 नगरसेवाकांसह...
नीट पेपरफुटी प्रकरणी केंद्र शासनाचा मोठा निर्णय! पुनर्परीक्षा काही दिव
NEET Paper Leak | नीट पेपरफुटी प्रकरणी केंद्र शासनाचा मोठा निर्णय! पुनर्परीक्षा काही दिवसांवरच आली असता...
काँग्रेसमध्ये मोठं बंड? सपकाळ यांच्या हटवणीसाठी दिल्लीत मोर्चेबांधणी
Harshwardhan Sapkal | काँग्रेसमध्ये मोठं बंड? हर्षवर्धन सपकाळ यांच्या हटवणीसाठी थेट दिल्लीत मोर्चेबांधणी