AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मराठ्यांना आरक्षण देऊ नये म्हणून फडणवीस यांचा दबाव?, मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप काय?

सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे, सामान्य जनतेने एकत्र येऊन गोरगरिबांना न्याय देण्यासाठी एकत्र येणे गरजेचे आहे. आम्ही आमच्या नेत्यांचे ऐकत नाही म्हणून आज मराठा लेकरांचे कल्याण होत आहे असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

मराठ्यांना आरक्षण देऊ नये म्हणून फडणवीस यांचा दबाव?, मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप काय?
मनोज जरांगे पाटीलImage Credit source: TV9MARATHI
| Updated on: Jul 14, 2024 | 2:52 PM
Share

जालना : मराठा आरक्षण आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांनी काल संभाजीनगरात झालेल्या रॅलीत राज्य सरकारला अल्टीमेटम दिला होता. मराठ्यांना जर ओबीसीत आरक्षण दिले नाही तर आपण 20 तारखेला उपोषणाला बसू असा निर्वाणीचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत येण्याचा देखील इशारा दिला आहे. प्रकाश शेंडगे यांनी आता मनोज जरांगे यांच्या काल झालेल्या भाषणाच्या संदर्भात प्रतिक्रीया दिली आहे.आम्ही मुंबईत शांततेत का येऊ नये आणि आमचा हक्क मागू नये ? तलवारीची भाषा कोणी केली. माझा डाऊट कधी खोटा होत नाही. भुजबळाला कोणाचे पाठबळ आहे हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. एसटीतून आरक्षण भेटलं तर धनगर समाजाच्या मुलांना जास्त नोकऱ्या लागतील हे त्यांना माहिती आहे, हा लढा सामान्य धनगरांचा आहे, मात्र छगन भुजबळनी त्यांना काय शिकवलं हे माहीती नाही, प्रकाश शेंडगेंच्या बोलण्याला आम्ही गांभीर्याने घेणार नाही, कारण त्यांना आम्ही विरोधक मानलेलं नाही. धनगर आणि मराठ्यांचे काहीही वैर नाही असे मराठा नेते मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.

‘तो’ आरक्षण खाऊ देत नाही असं बंजारा बांधवांचे म्हणणं

मनोज जरांगे यांनी मराठवाड्यात मराठा आरक्षण शांतता मोर्चा काढला होता. त्याचा पहिला टप्पा संभाजीनगरात काल संपला. आता त्यांनी सोलापूरला वारीत जाण्याचे योजले आहे. जरांगे यांनी 13 तारखेपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळाले नाही तर कसं मिळावायचं ते बघतो असे म्हटले आहे. मुस्लीमांच्या आरक्षणा संदर्भात ते म्हणाले की गोरगरीब मुस्लिम आणि मराठे, लिंगायत यांच्या हातात कारभार आला पाहिजे, रजपूत समाज बारा बलुतेदार यांच्या हातात कारभार आला पाहिजे. बंजारा बांधव हे म्हणतात आम्हाला वेगळं आरक्षण द्या, आम्ही केवळ नावालाच ओबीसी आहोत असं बंजारा बांधवाचं म्हणणे आहे. छगन भुजबळ आम्हाला खाऊ देत नाही असं बंजारा बांधवांचे म्हणणं आहे असे त्यांनी मला भेटून त्यांनी सांगितले आहे.

मुस्लीमांसह इतर समाजाने नेत्याचं ऐकणं सोडावं

पुढे पश्चिम महाराष्ट्राचा दौरा खानदेशचा दौरा विदर्भाचा दौरा होणार आहे. कोकण आणि विदर्भाचा दौराही पडणार आहे,जरी तेथला मराठा कुणबी नसला तरी त्यांची आमची गणगोत संबंध आहेत, त्यांना झालेला दुःख आम्हाला सहन होत नाही.  कारण आमचं रक्त एकच आहे. ओवेसींचा भेटायचा मला कुठलाही निरोप आलेला नाही. मुस्लिम समाजासहीत इतर समाजांनी नेत्यांचं ऐकणं सोडलं तर त्यांचा कल्याण होऊ शकते, ते लोक तुमचे लोक निवडून येऊ देणार नाहीत आणि मोठे होऊ देणार नाही, निवडणुकीच्या आधी सगळ्यांनी एकत्रित येणे गरजेचे आहे निवडणुकीनंतर वेळ निघून जाणार आहे असेही मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.

फडणवीस यांचा दबाव

शंभूराजे देसाई यांनी सरकारचे काम सुरू आहे असे विधान केले आहे. यावर जरांगे म्हणाले की आम्ही कधी म्हणलं तुमचं काम सुरू नाही म्हणून, आणि कधी म्हणणारही नाही. मात्र मला माझ्या समाजासाठी काम करणं महत्त्वाचं आहे. एक महिन्याचा वेळ दिला या महिन्यात काय झालं काय केलंय हे आमच्या लक्षात आलं.आम्हाला मात्र 13 तारखेपर्यंत आरक्षण मिळणार नाही हे कळालं. बाकी आम्ही तुम्हाला दोष देत नाही आणि देऊन उपयोग ही नाही,आजपासून आमची पुढची रणनीती सुरू झाली आहे.आम्ही संयम बाळगला आहे. बहुतेक फडणवीस काम करू देत नसतील कारण त्यांना भुजबळ गरजेचे आहेत. देवेंद्र फडणवीस मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून दबाव घालत असतील असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.

'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.