बिबट्याच्या हल्ल्यात धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय नागनाथ गर्जेंचा मृत्यू, मुंडेंनी मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली

नागनाथ गर्जे यांच्या आई, पत्नी आणि बहिणींनी धनंजय मुंडे दारात येताच 'माझा भाऊ आला' म्हणत एकच हंबरडा फोडला, मुंडेंनी या परिवारास अत्यंत आपुलकीने धीर दिला (Dhananjay Mundes friend Nagnath Garje died in the leopard attack).

बिबट्याच्या हल्ल्यात धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय नागनाथ गर्जेंचा मृत्यू, मुंडेंनी मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली
घरातच कलह निर्माण झाल्यामुळे पंडितअण्णा यांनी गोपीनाथ मुंडे यांना सोडचिठ्ठी देत हे राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यानंतर खऱ्या अर्थाने मुंडे विरुद्ध मुंडे असंच समीकरण राजकारणात तयार झाले.
Follow us
| Updated on: Nov 28, 2020 | 6:55 PM

बीड : आष्टी तालुक्यात बिबट्याने धुमाकुळ घातला आहे. सुरुडी आणि किन्ही या दोन ठिकाणी बिबट्याच्या हल्ल्यात नागनाथ गर्जे, तसेच मामाच्या गावी आलेला नऊ वर्षीय यश उर्फ स्वराज भापकर अशा दोघांचा वेगवेगळ्या घटनेत मृत्यू झाला आहे. यापैकी नागनाथ गर्जे हे राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय होते. या घटनेनंतर धनंजय मुंडे यांनी आज गर्जे यांच्या कुटुंबियांची तसेच यश याच्या मामाकडे असलेल्या नातेवाईकांची भेट घेऊन सांत्वन केले (Dhananjay Mundes friend Nagnath Garje died in the leopard attack).

नागनाथ गर्जे यांच्या आई, पत्नी आणि बहिणींनी धनंजय मुंडे दारात येताच ‘माझा भाऊ आला’ म्हणत एकच हंबरडा फोडला, मुंडेंनी या परिवारास अत्यंत आपुलकीने धीर दिला (Dhananjay Mundes friend Nagnath Garje died in the leopard attack).

“नागनाथ हा माझा अत्यंत निकटवर्तीय होता, मी त्याला दाजी म्हणायचो, माझ्या बहिणीची आणि नागनाथच्या दोन्ही मुलांची जबाबदारी मी स्वीकारतो”, असं म्हणत धनंजय मुंडे यांनी नागनाथ गर्जे यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. नागनाथ यांचा मुलगा आणि मुलगी या दोन्ही अपत्याच्या शिक्षणाची जबाबदारी आपण स्वीकारत असून त्यांच्या पत्नीला शासकीय सेवेत नोकरी मिळण्यासाठीही आपण प्रयत्न करणार असल्याचे धनंजय मुंडे यांनी यावेळी सांगितलं.

मयत नागनाथ गर्जे यांच्या कुटुंबास राज्य शासनाच्या वतीने 5 लाख रुपयांचा धनादेश यावेळी वनाधिकारी तेलंग यांच्या हस्ते देण्यात आला. तसेच नागनाथ यांच्या दोन्ही मुलांच्या नावे योजनेप्रमाणे प्रत्येकी 5 लाख रुपयांचा एफडी करून त्याच्या पावत्या कुटुंबाकडे देण्याच्या सूचना मुंडेंनी केल्या. त्याचबरोबर स्वराज भापकर याच्या मावशी, काका यांसह अन्य नातेवाईकांचीही भेट घेऊन या चिमुकल्याच्या कुटुंबसही याच योजनेअंतर्गत 15 लाखांची मदत मिळवून देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी मुंडे यांच्यासह आष्टी पाटोदा शिरूरचे आमदार बाळासाहेब आजबे, साहेबराव दरेकर, बजरंग सोनवणे, शिवाजी राऊत, सतिश शिंदे, अण्णासाहेब चौधरी, रामकृष्ण बांगर, सुनील नाथ, शिवाजी नाकाडे, शिवाजी शेकडे, शिवाजी डोके यांसह तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी, वनविभागाचे अधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

दरम्यान या दोन घटनांमुळे आष्टी तालुक्यात भीतीचे वातावरण आहे. बिबट्याला तातडीने जेरबंद करण्यासाठी वन विभागाकडून आखण्यात आलेल्या उपाययोजनांचा मुंडेंनी आढावा घेतला. बिबट्याला पकडण्यासाठी शार्पशूटर, पिंजरे, सापळे यासह ड्रोनची मदत घेतली जात असल्याचे यावेळी वनाधिकारी तेलंग म्हणाले.

आपण वनमंत्री संजय राठोड यांच्याशी या गंभीर विषयी चर्चा केली आहे. बिबट्याला तातडीने पकडण्यासाठी नांदेड, जुन्नर, पुणे, औरंगाबाद, अमरावती आदी ठिकाणांहून शार्पशूटर आणि अन्य तज्ज्ञाची आणखी एक कुमक येथे दाखल होणार असल्याचे धनंजय मुंडे म्हणाले. तसेच येत्या तीन दिवसांच्या आत या बिबट्याला जेरबंद करण्यात यश आले नाही तर, आपण स्वतः शार्पशूटर मार्फत त्याला ठार करण्याची परवानगी वन्य जीव विभागाकडून घेऊ, असेही धनंजय मुंडे ग्रामस्थांशी बोलताना म्हणाले.

हेही वाचा :

भाजपला मराठवाड्याच्या मातीत असं गाडा की ते निवडणूकच विसरले पाहिजे; धनंजय मुंडेंचा घणाघात

Non Stop LIVE Update
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.