राकेश रोशन यांना कॅन्सर, भावूक पोस्ट लिहून ऋतिकची माहिती

राकेश रोशन यांना कॅन्सर, भावूक पोस्ट लिहून ऋतिकची माहिती

मुंबई : दिग्दर्शक आणि सिनेनिर्माते राकेश रोशन यांना घशाचा कर्करोग झाल्याची माहिती त्यांचा मुलगा ऋतिक रोशनने दिली आहे. सोशल मीडियावर त्याने याबाबत पोस्ट केली आहे. राकेश रोशन यांना Squamous Cell Carcinoma च्या पहिल्या स्टेजचं निदान झालं आहे. म्हणजेच हा एक प्रकारचा कॅन्सर आहे. यामुळे घशात असामान्य पेशींची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. ऋतिक रोशनने जीममधील वडिलांसोबतचा […]

सचिन पाटील

| Edited By:

Jul 05, 2019 | 4:43 PM

मुंबई : दिग्दर्शक आणि सिनेनिर्माते राकेश रोशन यांना घशाचा कर्करोग झाल्याची माहिती त्यांचा मुलगा ऋतिक रोशनने दिली आहे. सोशल मीडियावर त्याने याबाबत पोस्ट केली आहे. राकेश रोशन यांना Squamous Cell Carcinoma च्या पहिल्या स्टेजचं निदान झालं आहे. म्हणजेच हा एक प्रकारचा कॅन्सर आहे. यामुळे घशात असामान्य पेशींची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते.

ऋतिक रोशनने जीममधील वडिलांसोबतचा फोटो पोस्ट केलाय. या पोस्टमध्ये तो म्हणतो, “मी आज सकाळीच पापांना जीमसाठी विचारलं. मला माहिती होतं, ते सर्जरीच्या दिवशीही व्यायाम करणं सोडणार नाहीत. नुकतंच घशात Squamous Cell Carcinoma चं निदान झालंय. आज ते याच्याशी झुंज देणार आहेत. आम्ही नशिबवान आहोत की आमच्या कुटुंबाला तुमच्यासारखा व्यक्ती मिळालाय.”

सतत कामात असणारं व्यक्तीमत्व म्हणून राकेश रोशन यांची ओळख आहे. ते सध्या क्रिश 4 सिनेमाच्या तयारीत आहेत. या सिनेमात ते पुन्हा एकदा आपला मुलगा ऋतिकला घेऊन पडद्यावर येणार आहेत. यापूर्वी या सिनेमाच्या सर्व सीरिज हिट ठरल्या आहेत.

बॉलिवूडमध्ये गेल्या काही दिवसांपासून कॅन्सर झाल्याचे अनेक वृत्त समोर आले आहेत. अभिनेता इरफान खान आणि अभिनेत्री सोनाली बेंद्रेला कॅन्सर झाल्याचंही समोर आलं होतं. दोघांनीही यावर परदेशात उपचार घेतले. सात महिने न्यूयॉर्कमध्ये उपचार घेतल्यानंतर सोनाली बेंद्रे मुंबईत परतली आहे. तर इरफान खान मार्च 2018 पासून लंडनमध्ये कॅन्सरवर उपचार करत आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें