Diwali Celebration | दिवाळीसाठी घर सजवताय? ‘या’ टिप्स नक्की फायदेशीर ठरतील!

दिवाळीच्या दिवसांत प्रत्येकाच्या घरात पाहुण्यांचे आगमन होत असते. अशावेळी आपले घर सुंदर दिसावे, यासाठी सगळ्यांचीच लगबग सुरू असते.

Diwali Celebration | दिवाळीसाठी घर सजवताय? ‘या’ टिप्स नक्की फायदेशीर ठरतील!
मलेशिया (Malaysia) : मलेशियात भारताप्रमाणेच दिवाळीला 'हरी दिवाळी' असं म्हणतात. इथे सर्व विधी आणि संस्कृती मात्र वेळगी आहे. मलेशियात फटाके विक्रीवर बंदी असल्याने ते भेटवस्तू, मिठाई आणि शुभेच्छा देत दिवळीचा आनंद घेतात.
Follow us
| Updated on: Nov 07, 2020 | 1:57 PM

मुंबई : थंडीची चाहूल लागताच प्रत्येकाच्या घरात दिवाळीच्या (Diwali 2020) तयारीची लगबग सुरू होते. घराची साफसफाई करण्यापासून, फराळ बनवणे, कंदील तयार करणे, अशा अनेक कामांची सुरुवात होते. बऱ्याच घरांमध्ये दिवाळीच्या निमित्ताने रंग काम केले जाते. दिवाळीच्या दिवसांत प्रत्येकाच्या घरात पाहुण्यांचे आगमन होत असते. अशावेळी आपले घर सुंदर दिसावे, यासाठी सगळ्यांचीच लगबग सुरू असते. नेटके सजवलेले घर सगळ्यांच्याच पसंतीस पडते. कोरोनाच्या या काळात दिवाळीमुळे लोकांमध्ये पुन्हा एकदा उत्साह संचारला आहे. स्वच्छतेची काळजी घेत, यंदाही घरात सजावटीची कामे सुरू झाली आहेत. अशावेळी आमच्या काही टिप्स तुमच्या कामी नक्की येतील…(Diwali home Decoration tips)

लाईट्स

दिवाळी आधीच सगळ्या दुकानांबाहेर लाईटिंग करून ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न दुकानदार करत असतात. चीनी मालावर बहिष्कार घातल्याने यंदा भारतीय तोरणांनी बाजारपेठ व्यापली आहे. या लाईट्सचा वापर करून आपणही आपल्या घराची बाल्कनी अथवा दरवाजे सजवू शकता. ही रंगीबेरंगी लाईटिंग तुमच्या घराच्या सौंदर्याला नक्कीच चार चांद लावेल.(Diwali home Decoration tips)

वॉल मिरर

या दिवाळीत घराला आणखी स्टायलिश लूक देण्यासाठी ‘वॉल मिरर’ अर्थात मोठ्या आकाराचा भिंतीवर लावण्यात येणारा आरसा नक्कीच खरेदी करू शकता. अर्थात त्यासाठी एका मोठ्या आणि मोकळ्या भिंतीची आवश्यकता आहे. बाजारात अनेक वेगवेगळ्या आकाराचे आणि विविध प्रकारचे आरसे उपलब्ध आहेत. या आरश्यांवर लाईट्सच्या माळा सोडून किंवा त्यासमोर छान मेणबत्यांची आरास करून तुम्ही घराचा कोपरा छान सजवू शकता.

फ्लोर लॅम्प

सध्या फ्लोर लॅम्पची फॅशन ट्रेंडीगमध्ये आहे. वेगवेगळ्या आकाराचे, उंचीचे, रंगाचे फ्लोर लॅम्प बाजारात सहज उपलब्ध होतात. या फ्लोर लॅम्पला घराच्या एखाद्या शांत, मोकळ्या कोपऱ्यात सजवून छान मंद प्रकाशत घराला उजळवू शकता. शिवाय या फ्लोर लॅम्पच्या बाजूला एखादे छानसे अत्तर किंवा रूम फ्रेशनर ठेवून या वातावरणाला आणखी प्रसन्न बनवू शकता. (Diwali home Decoration tips)

फ्लॉवर वास

‘फ्लॉवर वास’ अर्थात फुलदाणी हा घराची शोभा वाढवणारा घटक आहे. दिवाळीच्या दिवशी घर सजवण्यासाठी आपण क्रिस्टल फ्लॉवर वासमध्ये काही सुंदर, सुवासिक फुले ठेवू शकता. घराच्या लिव्हिंग रूममध्ये आणि हॉलमध्ये आपण फ्लॉवर वास ठेवू शकता. फुले केवळ घराची शोभा वाढवत नाहीत तर, बघणाऱ्याच्या मनाला आनंददेखील प्रदान करतात.

रांगोळी

दिवाळीच्या दिवसांत प्रत्येकाच्या दारासमोर छान रंगोळी काढलेली दिसते. अनेक ठिकाणी रांगोळीच्या स्पर्धादेखील आयोजित केल्या जातात. तुम्ही देखील घरासमोर, अंगणात, अथवा बालकनीत छान रांगोळी काढून, त्यात रंगीबेरंगी रंग भरून घर सजवू शकता.

(Diwali home Decoration tips)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.