ट्रम्प थांबणाऱ्या हॉटेलमध्ये हवेच्या गुणवत्तेचीही काळजी, अलिशान हॉटेलमध्ये ट्रम्प कुटुंबियांचा मुक्काम

मोदी सरकारकडून दिल्लीच्या चाणक्यपुरी येथील आयटीसी मौर्य (ITC Maurya) या अलिशान अशा हॉटेलमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुक्कामाची सोय करण्यात आली आहे (Donald Trump will stay in Delhi ITC Maurya hotel).

ट्रम्प थांबणाऱ्या हॉटेलमध्ये हवेच्या गुणवत्तेचीही काळजी, अलिशान हॉटेलमध्ये ट्रम्प कुटुंबियांचा मुक्काम

नवी दिल्ली : जगातील सर्वात शक्तीशाली देश मानल्या जाणाऱ्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारतात दाखल झाले आहेत. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी मेलानिया ट्रम्प, मुलगी इवांका आणि जावाई जे. कुशरदेखील भारत दौऱ्यावर आले आहेत. त्यांचा हा दोन दिवसांचा दौरा आहे. त्यामुळे आज रात्री ते भारतात मुक्कामासाठी थांबणार आहेत. मोदी सरकारकडून दिल्लीच्या चाणक्यपुरी येथील आयटीसी मौर्य (ITC Maurya) या अलिशान अशा हॉटेलमध्ये त्यांच्या मुक्कामाची सोय करण्यात आली आहे. ट्रम्प यांच्या मुक्कामानिमित्ताने आज रात्री हॉटेलमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे (Donald Trump will stay in Delhi ITC Maurya hotel).

डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या पत्नी मेलानिया ट्रम्प आयटीसी मौर्य हॉटेलच्या ग्रँड प्रेसिडेंशियल सुईट (चाणक्य सुईट) येथे मुक्काम करणार आहेत. या अलिशान हॉटेलच्या 14 व्या मजल्यावर हे चाणक्य सुईट आहे. विशेष म्हणजे या हॉटेलमध्ये मुक्काम करणारे ट्रम्प हे चौथे राष्ट्रपती ठरणार आहेत. ट्रम्प यांच्याअगोदर अमेरिकेचे माजी अध्यक्ष बिल क्लिंटन, जॉर्ज डब्ल्यू बुश आणि बराक ओबामा हे देखील याच हॉटेलमध्ये थांबले होते (Donald Trump will stay in Delhi ITC Maurya hotel).

हॉटेलच्या ग्रँड प्रेसिडेंशियल सुईटमध्ये विविध अशा खास सुविधा करण्यात आल्या आहेत. ट्रम्प आणि त्यांच्या परिवाराच्या मुक्कामाच्या धर्तीवर आकर्षक अशी सजावट हॉटलमध्ये करण्यात आली आहे. विशेष म्हणजे हॉटेलमधील हवेची गुणवत्ता ही जागतिक आरोग्य संस्थेच्या नियमांनुसार ठेवण्यात येते. जागतिक आरोग्य संस्थेच्या नियमांनुसार हवेच्या गुणवत्तेची काळजी घेणारी आयटीसी मोर्य ही देशातील एकमेव अशी हॉटेल आहे.

डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या परिवाराचं आज दुपारी बारा वाजेच्या सुमारास अहमदाबाद विमानतळावर शंखनाद करत स्वागत करण्यात आलं. त्यानंतर मोठा रोड शो काढण्यात आला. या रोड शो दरम्यान 22 राज्यांचा सांस्कृतिक चित्ररथ ट्रम्प कुटुंबियांनी पाहिला.

रोड शो नंतर डोनाल्ड ट्रम्प, त्यांच्या पत्नी मेलानिया, मुलगी इवांका आणि त्यांचे जावाई पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत साबारती आश्रमात पोहोचले. यावेळी नरेंद्र मोदी यांनी मेलानिया आणि डोनाल्ड ट्रम्प यांना चरखा चालवायचं शिकवलं. याशिवाय मोदींनी गांधीजींचे तीन माकड भेट म्हणून दिले. यासोबतच महात्मा गांधींजींच्या आत्मकथेचं पुस्तक आणि चरखा भेट म्हणून दिलं. त्यानंतर मोदी आणि ट्रम्प परिवार मोटेरा स्टेडियमवर गेले. तिथे त्यांनी जमलेल्या हजारो लोकांना संबोधित केलं.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI