AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्यात आतापर्यंतची मोठी कारवाई, तब्बल 20 कोटींचा एम.डी. जप्त

बॉलिवूडमध्ये ड्रग्जचा सापळा समोर आल्यानंतर आता पुण्यातही अंमली पदार्थ्यांचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे.

पुण्यात आतापर्यंतची मोठी कारवाई, तब्बल 20 कोटींचा एम.डी. जप्त
| Edited By: | Updated on: Oct 08, 2020 | 2:55 PM
Share

पुणे : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर संपूर्ण बॉलिवूड ढवळून निघालं आहे. सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाचा शोध सुरू असताना याप्रकरणात ड्रग्ज कनेक्शनही उघडकीस आलं. त्यामुळे अनेक ठिकाणी छापे मारून डॅग्जचं रॅकेट उद्ध्वस्त करण्याची कारवाई सुरू असतानाच पुण्यातही ड्रग्जचा मोठा साठा सापल्याने एकच खळबळ उडाली आहे. (drug case anti narcotics squad of Pimpri Chinchwad has seized MD worth Rs 20 crore)

चाकणजवळ शेल पिंपळगावमध्ये पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकानं विक्रीसाठी आणलेला 20 कोटी रूपयांचा मेफेड्रॉन (एम.डी.) अमली पदार्थ जप्त केला आहे. शहरातील आजपर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई आहे. हा माल नेमका कुठून आला? आणि याची खरेदी-विक्री कोण करत? याचा आता पोलीस शोध घेत असल्याची माहिती देण्यात आली आहे.

काहीजण अमली पदार्थांची विक्री करण्यासाठी शेल पिंपळगाव येथे येणार आहेत, अशी माहिती पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार बुधवारी दुपारी सापळा लावून पोलिसांनी 5 जणांना अटक केली. त्यांच्याकडून 20 कोटी रुपयांचे मेफेड्रॉन (एम.डी.) जप्त करण्यात आले. तसेच पाच लाख रुपये किंमतीची कार आणि 23 हजार 100 रुपयांची रोकड असा एकूण 20 कोटी पाच लाख 23 हजार 100 रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे.

दरम्यान, ड्रग्ज प्रकरणात अडकलेल्या अभिनेत्री रिया चक्रवर्तीला अखेर बुधवारी जामीन मंजूर करण्यात आला. तब्बल 28 दिवसांनंतर रिया भायखळा तुरुंगातून बाहेर पडली. मात्र, तिचा भाऊ शौविक चक्रवर्तीचा (Showik Chakraborty) जामीन अर्ज मुंबई हायकोर्टाने पुन्हा एकदा फेटाळून लावला आहे. शौविक ‘ड्रग्ज सिंडिकेट’चा (Drugs Syndicate) सक्रीय सदस्य असल्याचे म्हणत न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज नामंजूर केलाय.

इतर बातम्या – 

gold and sliver rate : सलग तिसऱ्या दिवशी सोनं झालं स्वस्त, 50 हजारांहूनही कमी 10 ग्रामची किंमत

ज्या मुलीवर कुटुंबाने केले अंत्यसंस्कार, ती 4 वर्षानंतर घरी परतली

(drug case anti narcotics squad of Pimpri Chinchwad has seized MD worth Rs 20 crore)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.