AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘हे’ पदार्थ खा आणि हिवाळ्यातही निरोगी राहा!

मुंबई:  हिवाळ्याचे दिवस सुरु झाले आहेत, वातावरणातला फरक, हवेतील गारवा जाणवायला लागला आहे. पण हिवाळा आपल्यासोबत घेऊन येतो अनेक आजार, जसे सर्दी, खोकला, ताप इत्यादी. हिवाळा सुरु होताच अनेकांच्या तब्येत बिघडायला लागते. पण यात दोष ऋतुचा नाही तर आपला आहे. कारण ऋतू बदलला मात्र आपल्या रोजनिशीत आपण काहीही बदल केला नाही. ऋतू बदलला की, आपल्या […]

'हे' पदार्थ खा आणि हिवाळ्यातही निरोगी राहा!
केवळ तीन दिवसात वजन कमी करा
| Updated on: Jul 05, 2019 | 5:02 PM
Share

मुंबई:  हिवाळ्याचे दिवस सुरु झाले आहेत, वातावरणातला फरक, हवेतील गारवा जाणवायला लागला आहे. पण हिवाळा आपल्यासोबत घेऊन येतो अनेक आजार, जसे सर्दी, खोकला, ताप इत्यादी. हिवाळा सुरु होताच अनेकांच्या तब्येत बिघडायला लागते. पण यात दोष ऋतुचा नाही तर आपला आहे. कारण ऋतू बदलला मात्र आपल्या रोजनिशीत आपण काहीही बदल केला नाही. ऋतू बदलला की, आपल्या खानपानातही बदल करायला हवा. ज्यामुळे आपण हिवाळ्यातही निरोगी राहू शकू.

हिवाळ्यात काय खाल्ल्याने आपण निरोगी आणि ताजेतवाने राहू शकतो? त्यासाठी खास टिप्स

पालक :

आवडत नसली तरी पालक ही हिरव्या भाज्यांमध्ये सर्वात उत्तम आहे. यात प्रोटीन, व्हिटॅमिन, आयर्न यांसारखे शरिराला उपयोगी असे अनेक घटक असतात. त्यामुळे हिवाळ्यात पालक सेवन शरिरासाठी खूप फायदेशीर ठरते. पालकाची भाजी करून खाण्यापेक्षा पालक सूप घेणे अधिक फायद्याचे असते.

गाजर :

हिवाळ्यात बाजारात उपलब्ध असणारे लाल गाजर हे व्हिटॅमिन आणि मिनरल्सयुक्त असतात. यामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, कॅल्शिअम आणि फायबर असते, जे शरीरातील कोलेस्ट्रॉल वाढू देत नाही. नियमितपणे गाजर ज्यूस घेतल्याने सर्दी-खोकला होत नाही.

शिंगाडा :

शिंगाडा हे फळही हिवाळ्यात मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असते. यात सायट्रिक अॅसिड, अॅमिलोज, कार्बोहायड्रेट, टॅनिन, बीटा-अॅमिलेज, प्रोटीन, फॅट, निकोटेनीक अॅसिड, रिबोफ्लेविन, थायमाईन, व्हिटॅमिन -ए, सी, मॅगनीज आणि फॉस्फॉराइलेज इत्यादी घटक असतात. हिवाळ्यात शिंगाडा आवर्जून खावा.

बीट :

बीटने शरिरातील रक्त वाढते हे तर आपल्या सर्वांना माहित आहे. त्यामुळे हिवाळ्यात आपल्या रोजच्या जेवणात बीटचा समावेश करावा. याचे नियमितपणे सेवन केल्याने शरिराची व्हिटॅमिन ए, बी, बी 1, बी 2, बी 6 आणि सी ची गरज भरून निघते.

आवळा :

आवळ्यात व्हिटॅमिन-सी मोठ्या प्रमाणात असते. ज्यामुळे शरिरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते. तसेच त्यात अनेक पोषकतत्वही असतात. हे पोषकतत्व हिवाळ्यात रोगांपासून आपला बचाव करतात. तर आवळ्यात आढळणारे अॅटिऑक्सिडंट शरिरातील हानीकारक घटकांना बाहेर टाकतो. आवळ्याच्या सेवनाने ब्लड शुगर कंट्रोलमध्ये रहाते, तसेच अॅनिमिया सारख्या आजारापासूनही बचाव होतो. जर कच्चा आवळा खाऊ शकत नसाल तर आवळ्याचा मुरांबा करून खावा.

मध :

मध हे देखील आपल्या शरिरासाठी अतिशय उपयोगी आहे. मध शरिराला निरोगी बनवतं, तसेच शरिरातील ऊर्जेचा स्तर नियंत्रित ठेवण्यास मदत करतं. मधाला आयुर्वेदात अमृत म्हटलं गेलं आहे. मधाचे सेवन हे दररोज नियमितपणे करायला हवे. हिवाळ्यात मधाचे सेवन केल्याने पचनक्रिया सुधारते आणि रोगप्रतिकारक शक्तीही वाढते.

आलं : हिवाळ्यात, तसेच रोजच्याच जेवणात आल्याचा वापर करावा. हिवाळ्यात आलं खाल्ल्याने शरिराला उष्णता मिळते तसेच पाचनतंत्र व्यवस्थित काम करते.

तीळ :

हिवाळ्याच्या दिवसांत तीळ खाल्ल्याने शरिराला ऊर्जा मिळते. तीळात अनेक प्रकारचे पोषकतत्व उपलब्ध असतात, जसे प्रोटीन, कॅलशिअम, बी-कॉम्प्लेक्स, कार्बोहायड्रेट इत्यादी.

गूळ :

हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी गूळ हा अतिशय उत्तम पर्याय आहे. हिवाळ्यात शरीरातील रक्तप्रवाह मंद होतो. ज्यामुळे ब्लड प्रेशरची समस्या उद्भवते. गूळ खाल्ल्याने ब्लड प्रेशरचा त्रास कमी होतो.

टीप: तुमची प्रकृती, अॅलर्जी किंवा तत्सम गोष्टी जाणून घेऊन, वरील पदार्थांच्या सेवनापूर्वी डॉक्टर / आहार तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.